बऱ्याच जणांना दही (Curd Health Benefits) खायला आवडते. अनेकांच्या ताटात वाटीभर दही असतेच. दही खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ऋतू कोणताही असो, दही खायलाच हवे. दही हे आरोग्यदायी प्रोबायोटिक आहे. त्यातील गुड बॅक्टेरिया आरोग्याला अनेक पौष्टीक घटक प्रदान करतात. दही एक कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे हाडांना बळकटी मिळते.
कॅल्शियम व्यतिरिक्त त्यात व्हिटॅमिन बी२, व्हिटॅमिन बी१२, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. काही जण विकतचे दही खातात, तर काही जण घरात दही तयार करून खातात. दह्याच्या भांड्यात आपण पाहिलंच असेल की, घट्टसर दह्यातून बऱ्याचदा पाणीही निघते. ते पाणी काही जण फेकून देतात, तर काही दह्यात मिसळून खातात. पण हे पाणी फेकून द्यावे की खावे? त्यात काही गुणधर्म असतात का?(4 Incredible Curd Benefits & Its Nutritional Value).
यासंदर्भात, हैद्राबादस्थित यशोदा हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार फिजिशियन, डॉक्टर दिलीप गुडे सांगतात, 'दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. जे दह्यातून पाणी निघते ते ही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. दह्याच्या पाण्यात अमीनो ऍसिडस्, जीवनसत्व, खनिजे, लॅक्टोझ, व्हे प्रोटीन यासह इतर गुणधर्म असतात. व्हे प्रोटीन वजन कमी करण्यास, स्नायूंना बळकट करण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.'
५ मिनिटं अजून म्हणत गजर झाल्यावरही झोपून राहता? ३ टिप्स, पहाटे उठणं होईल एकदम सोपं
दह्याच्या पाण्याचा वापर कशात करावा?
- कणिक मळताना आपण पाण्याऐवजी दह्याच्या पाण्याचा वापर करू शकता. यामुळे पोळ्या मऊ आणि फ्लफी तयार होतील.
- जर आपल्याला प्रोटीन रीच ब्रेकफास्ट खायचं असेल तर, फ्रुट ज्यूस किंवा सूपमध्ये दह्याचे पाणी मिक्स करून प्या.
- भाजी तयार करण्यासाठी आपण दह्याच्या पाण्याचा वापर करू शकता. यामुळे त्यातील प्रोटीनचे प्रमाण वाढेल.
- कढधान्य भिजवताना आपण त्यात दह्याचे पाणी मिक्स करू शकता. यामुळे आपल्याला हाय प्रोटीन आहार खायला मिळेल.