दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण दूध तापवणे हे मोठं टास्क म्हणावं लागेल (Kitchen Tips). कारण दूध तापवत असताना, लक्ष देऊनही दूध भांड्यातून उतू जातं (Boiling milk). त्यानंतरची आवराआवरी करणं खूप कठीण जातं. दुधाचं भांडं गॅसवर ठेवलं की ते तापेपर्यंत ओट्याजवळच उभं राहाणं शक्य नसतं. थोडंसं लक्ष इकडे तिकडे गेलं की दूध उतू गेलंच म्हणून समजा.
मग ओटा स्वच्छ करा, दुधाची नासाडी होते ती वेगळी. दुधाची नासाडी झाली की, घरच्यांकडून आपल्याला टोमणे ऐकावे लागतं ते वेगळं. दूध जर वारंवार उतू जात असेल तर, वेळीच ५ टिप्स फॉलो करा. यामुळे दुधाला व्यवस्थित उकळी फुटेल. शिवाय दूधही उतू जाणार नाही(4 Quick Tips to prevent milk boiling over).
दूध उतू जाऊ नये म्हणून..
- दूध उकळल्यानंतर, दुधाच्या भांड्यावर स्टीलचा चमचा ठेवा. असे केल्याने दुधाच्या भांड्यातून बाहेर पडणाऱ्या वाफेला बाहेर येण्याचा मार्ग मिळेल आणि भांड्याबाहेर दूध उतू जाणार नाही. भांड्याच्या आकारानुसार आपण दुधाच्या भांड्यावर चमचा ठेवू शकता.
बैठ्या कामामुळे पोट नुसतं सुटलंय? जेवल्यानंतर १० मिनिटे 'ही' गोष्ट करा; लवकरच पोट सपाट
- दुधाच्या भांड्यात दूध घालण्यापूर्वी, दुधाच्या भांड्याच्या कडेने तूप किंवा लोणी लावा. तूप किंवा लोणीच्या गुळगुळीतपणामुळे दूध उकळून बाहेर येणार नाही. या युक्तीमुळे दुधाला उकळी फुटली तरी भांड्याबाहेर दूध येणार नाही.
- जेव्हा गॅसवर दुधाचे भांडे ठेवाल तेव्हाच, त्यावर एक लाकडी स्पॅटुला ठेवा. जर आपल्याकडे स्पॅटुला नसेल तर, आपण त्यावर लाटणं देखील ठेऊ शकता. यामुळे दूध उकळल्यानंतर भांड्यातून बाहेर पडणार नाही.
हातापायांना सतत मुंग्या; हाडं कडकड वाजतात? रोज खा ५ पैकी १ पदार्थ; दिवसभर राहाल एनर्जेटिक
- दुधाला उकळी फुटल्यानंतर, दुधाच्या फेसावर थोडं पाणी शिंपडावं. त्यामुळे वर आलेलं दूध लगेच खाली जाईल. यामुळे दूध उतू जाणार नाही.
- दूध उतू जाऊ नये म्हणून बाजारात स्पिल स्टॉपर्स मिळतात. याचाही वापर आपण करू शकता. स्पिल स्टॉपर्स सिलिकॉन पासून तयार झालेली एक रबर तबकडी असते. आपण स्पिल स्टॉपर दुधाच्या भांड्यावर ठेऊ शकता. यामुळे दूध उतू जाणार नाही. दुधाला व्यवस्थित उकळी फुटेल.