Lokmat Sakhi >Food > भजी - वडे खूप तेल पितात? ४ उपाय करा खमंग - अजिबात तेल न पिणारे पदार्थ

भजी - वडे खूप तेल पितात? ४ उपाय करा खमंग - अजिबात तेल न पिणारे पदार्थ

4 Reasons Why Your Pakoras Are Too Oily & Easy Ways To Fix Them : भजी, पकोडे तळताना नेहमीच्या होणाऱ्या ४ चुका कोणत्या ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2023 01:28 PM2023-03-11T13:28:13+5:302023-03-11T13:41:26+5:30

4 Reasons Why Your Pakoras Are Too Oily & Easy Ways To Fix Them : भजी, पकोडे तळताना नेहमीच्या होणाऱ्या ४ चुका कोणत्या ?

4 Reasons Why Your Pakoras Are Too Oily & Easy Ways To Fix Them | भजी - वडे खूप तेल पितात? ४ उपाय करा खमंग - अजिबात तेल न पिणारे पदार्थ

भजी - वडे खूप तेल पितात? ४ उपाय करा खमंग - अजिबात तेल न पिणारे पदार्थ

गरमागरम भजी, पकोडे खाणे कुणाला आवडत नाही. सुट्टीच्या दिवशी किंवा संध्याकाळी गरम वाफाळत्या चहासोबत भजी खाण्याचा मोह आपल्याला होतोच. वेगवेगळ्या प्रकारच्या भजी जेव्हा आंबट - गोड चटणीसोबत आपल्यासमोर सर्व्ह केल्या जातात, ते बघूनच आपल्याला फार भूक लागते. या आंबट - गोड, तिखट चवींच्या चटण्यांसोबत भजी खाणे म्हणजे स्वर्गसुखच. कांदा भजी, बटाटा भजी, मूग डाळ भजी, मेथी - पालक पकोडे असे वेगवेगळ्या प्रकारचे पकोडे आणि भजी खाणे अनेकजण पसंत करतात. 

काहीवेळा नाश्त्याला किंवा जेवणांत तोंडी लावायला म्हणून आपण भजी घरी बनवतो. घरीच भजी किंवा पकोडे बनविल्यानंतर काहीवेळा ते खूपच तेलकट होतात, जास्तीचे तेल शोषून घेतात. बहुतेकवेळा भजी हातात घेतल्यानंतर भजीने शोषून घेतलेले अधिकचे तेल आपल्या हाताला चिकटते. असे तेलकट पकोडे, भजी खाणे अनेकांना पसंत नसते. आपल्यासोबतपण बरेच वेळा असे झाले असेल की, घरी बनवलेली भजी, पकोडे फारच तेलकट झाले आहेत. भजी, पकोडे तळताना आपण हमखास होणाऱ्या ४ चुका करतो. यामुळेच आपले भजी व पकोडे तेलकट होतात. तळणीचे पदार्थ तळताना होणाऱ्या ४ चुका कोणत्या आहेत ते समजून त्यांवरील उपाय काय आहेत ते लक्षात ठेवू(4 Reasons Why Your Pakoras Are Too Oily & Easy Ways To Fix Them).     

भजी, पकोडे तळताना नेहमीच्या होणाऱ्या ४ चुका कोणत्या ? 

चूक १ : भजी बनविण्यासाठीचे बेसनचे बॅटर खूपच पातळ बनविणे. 

उपाय : भजी बनविण्यासाठीचे बेसनचे बॅटर खूपच पातळ बनविल्याने भजी जास्तीचे तेल शोषून घेतात. भजी बनविण्यासाठी बेसनाच्या पिठात काही निवडक मसाले घालून मग त्यात पाणी ओतून बेसनाचे बॅटर तयार केले जाते. या बेसनाच्या बॅटरमध्ये आपण कांदा किंवा बटाटा डिप करुन मग तो तेलात तळण्यासाठी सोडतो. परंतु बेसनाचे बॅटर खूपच पातळ झाल्यामुळे कांदा किंवा बटाटा त्या बॅटरमध्ये व्यवस्थित कोट होत नाही. अशा परिस्थितीत भजी तळताना त्यावर बेसनाच्या बॅटरचे पुरेसे कोटिंग नसल्याकारणाने भजी किंवा पकोडे जास्त तेल शोषून घेते. भजी बनवतांना जर आपले बेसनचे बॅटर खूपच पातळ झाले असेल तर त्यात अजून थोडे बेसन घालून बॅटर थोडे जाडसर करुन घ्यावे. भजीसाठी बेसनचे बॅटर तयार करताना त्यात तेलाचे ३ ते ४ थेंब घालावेत यामुळे देखील भजी किंवा पकोडे जास्तीचे तेल शोषून घेत नाहीत. 

चूक २ : भजी तळण्यासाठी चुकीच्या भांड्यांचा वापर करणे. 

उपाय : आपण कोणत्या प्रकारच्या भांड्यात भजी तळत आहेत याचा देखील विचार करणे खूप गरजेचे आहे. आपण एरवी तळणीचे पदार्थ तयार करण्यासाठी ज्या भांड्याचा वापर करतो, तेच भांडे भजी किंवा पकोडे तळण्यासाठी वापरावे. कोणतेही तळणीचे पदार्थ तळण्यासाठी शक्यतो भांड्याचा तळ खोलगट आणि मोठा असावा. भांड्याचा तळ खोलगट व मोठा असल्याकारणाने त्यांतील तेलाचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी मदत होते. जेव्हा तेलाचे तापमान स्थिर असते तेव्हा त्यात भजी, पकोडे व्यवस्थित तळून होतात आणि अधिकचे तेल शोषून घेतले जात नाही. 

चूक ३ : तळण्यासाठी भांड्यात पुरेसे तेल नसणे. 

उपाय : खरंतर ही खूप छोटी व पटकन लक्षांत न येणारी चूक आहे. तळण्यासाठी भांड्यात पुरेसे तेल नसल्याकारणाने देखील भजी तेलकट होतात. काहीवेळ   तळणीचे पदार्थ तळताना, भांड्यातील तेल हळुहळु संपत आलेले असते. अशावेळी आपण उरलेले तळणीचे पदार्थ एकदम एकाच वेळी त्या उरलेल्या तेलांत सोडून देतो. यामुळे ते पदार्थ एकमेकांना चिकटून जातात. हे पदार्थ किंवा पकोडे, भजी एकमेकांना चिकटल्यामुळे त्यांच्यावरील बेसनचे कोटिंग निघून जाते. यामुळे भजी किंवा पकोडे जास्तीचे तेल शोषून घेतात. अशा परिस्थितीत आपण भांड्यात अजून तेल घालून ते गरम होण्याची वाट बघू शकतो किंवा तळणीचे पदार्थ शॅलो फ्राय करून घेऊ शकतो.   


चूक ४ : भजी बनविण्यासाठीचे बेसनचे बॅटर खूपच जाड किंवा घट्ट बनविणे.

उपाय : भजी बनविण्यासाठीचे बेसनचे बॅटर खूपच जाड किंवा घट्ट बनविण्यानेदेखील भजी, पकोडे अधिकचे तेल शोषून घेतात. जर आपले बेसनचे बॅटर खूपच जाड किंवा घट्ट झाले असेल तर त्याची कंन्सिस्टंसी सेट करण्यासाठी त्यात थोडे पाणी घालावे. या बेसनाच्या पिठात पाणी घालून त्याची कंन्सिस्टंसी व्यवस्थित सेट करुन घ्यावी. आपल्या आवडीनुसार या बेसनच्या बॅटरमध्ये आपण थोडासा बेकिंग सोडादेखील घालू शकतो. बेकिंग सोडा घातल्याने हे बॅटर एकदम हलके - फुलके व एयरी बनेल. बेकिंग सोडा घातल्याने भजी, पकोडे जास्तीचे तेल शोषून घेत नाही, परिणामी भजी, पकोडे जास्त तेलकट होत नाहीत.

Web Title: 4 Reasons Why Your Pakoras Are Too Oily & Easy Ways To Fix Them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.