Lokmat Sakhi >Food > महागडे लिंबू विकत आणता, पण त्यातून रसच निघत नाही? ४ ट्रिक्स; रसाळ लिंबू विकत आणण्याची खास ट्रिक

महागडे लिंबू विकत आणता, पण त्यातून रसच निघत नाही? ४ ट्रिक्स; रसाळ लिंबू विकत आणण्याची खास ट्रिक

4 tips to find the juiciest lemon in the market : सेंद्रिय लिंबू रसाळ आणि चवदार असतात, असे लिंबू कृत्रिम रसायनांपासून मुक्त असतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2024 04:26 PM2024-05-10T16:26:07+5:302024-05-10T16:27:19+5:30

4 tips to find the juiciest lemon in the market : सेंद्रिय लिंबू रसाळ आणि चवदार असतात, असे लिंबू कृत्रिम रसायनांपासून मुक्त असतात..

4 tips to find the juiciest lemon in the market | महागडे लिंबू विकत आणता, पण त्यातून रसच निघत नाही? ४ ट्रिक्स; रसाळ लिंबू विकत आणण्याची खास ट्रिक

महागडे लिंबू विकत आणता, पण त्यातून रसच निघत नाही? ४ ट्रिक्स; रसाळ लिंबू विकत आणण्याची खास ट्रिक

उन्हाळ्यात लिंबूचे सेवन अधिक प्रमाणात केले जाते (Lemons). लिंबू सरबत असो किंवा लिंबाचा रस, बहुतांश पदार्थात लिंबाचा वापर केल्याने, पदार्थाची चव दुपट्टीने वाढते (Summer Special). लिंबाचा रस फक्त जेवणाची चव वाढवत नसून, केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. लिंबामध्ये सी व्हॅटॅमिन असल्याने ते आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते.

इतकेच नाहीतर, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते. लिंबूमध्ये अनेक पौष्टीक घटक असतात. शिवाय त्यात कार्बोहायड्रेट, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे अनेक पोषक घटक असतात. पण उन्हाळ्यात लिंबू फार महाग होतात. काही लिंबू बाहेरून दिसायला टवटवीत असतात. पण त्यातून रस निघत नाही. रसरशीत लिंबू खरेदी करताना कोणत्या टीप लक्षात ठेवाव्यात पाहूयात(4 tips to find the juiciest lemon in the market).

लिंबाची साल

लिंबू खरेदी करताना त्याची साल तपासून घ्या. पातळ, गुळगुळीत आणि चमकदार सालीच्या लिंबामध्ये जास्त रस असते. तर जाड सालीच्या लिंबामध्ये रस जास्त प्रमाणात नसते. त्यामुळे लिंबू नेहमी पातळ आणि चमकदार साल असलेले खरेदी करा.

लिंबाचं वजन

उन्हाळ्यात किचनमध्ये उभं राहवत नाही? ४ टिप्स; किचन राहील थंड - स्वयंपाकही होईल झटपट

रसाने भरलेले लिंबू रस नसलेल्या लिंबापेक्षा जास्त वजनदार असतात. त्यामुळे लिंबू खरेदी करताना जड असलेले लिंबू खरेदी करा. ज्यात रस जास्त प्रमाणात असते.

सॉफ्ट लिंबू खरेदी करा

लिंबू नेहमी दाबून खरेदी करा. जर लिंबू सॉफ्ट असेल तर, त्यात जास्त रस असेल हे समजून जा. कडक लिंबामध्ये जास्त रस नसते. त्यामुळे लिंबू नेहमी सॉफ्ट असलेले खरेदी करा.

पिवळ्या रंगाचे लिंबू

मग - बादली फुटली? पाणी गळून वाया जातं? चमचाभर बेकिंग सोड्याचा सोपा उपाय- फेकून देण्याची गरजच नाही..

लिंबू नेहमी पिवळ्या रंगाचे खरेदी करा. शिवाय वजनदार लिंबू खरेदी करा. रसाळ लिंबू खरेदी करण्यापूर्वी लिंबू थोडा दाबून किंवा पिळून पाहावा. जर लिंबू रसदार असेल तर, कडक लागणार नाही.

Web Title: 4 tips to find the juiciest lemon in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.