'आज काय भाजीला बनवतेस?' या प्रश्नाचं उत्तर शोधताना महिलांची तारांबळ उडते. भाजी बनवल्यानंतर काही लोकं नाकं मुरडतात. 'अगं हीच का भाजी बनवलीस?' असे मुलं आपल्या आईला म्हणतात. बऱ्याचदा घरातल्यांच्या म्हणण्यानुसार घरातील महिला भाजी बनवत असते (Burnt Vegetable). मात्र, कधी कधी भाजी करताना साहित्यांचे प्रमाण चुकते. किंवा पदार्थ करपतो. बऱ्याचदा भांड्याच्या तळाशी भाजी लागते (Kitchen Tips).
भांड्याचे तळ अनेकदा पातळ असते. ज्यामुळे भाजी तळाशी लागते आणि करपते. करपल्याने भाजीला वास येतो. त्यामुळे भाजी फेकून देण्याची वेळ येते. कारण करपलेली भाजी कोणी खात नाही (Cooking Tips). जर मेहनत घेऊन आणि प्रेमाने भाजी आपण तयार केली असेल तर, भाजी फेकून देण्याएवजी ४ गोष्टींचा वापर करा. यामुळे भाजीमधून करपलेला वास निघून जाईल(4 tips to fix the burnt vegetable curry).
भाजी करपल्यावर कोणते टिप्स उपयुक्त ठरतील?
दूध
दुधाचा वापर करून आपण करपलेल्या भाजीमधून गंध काढू शकता. भाजी शिजत असताना त्याकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपलं भाजीकडे लक्ष नसते. त्यामुळे भाजी शिजत असताना गॅस मध्यम किंवा कमी आचेवर ठेवा. जर तरीही भाजी तळाशी लागली असेल तर, त्यात थोडे दूध मिसळा. दुधामुळे भाजीमधून करपलेला गंध निघून जाईल.
ठेचा पाव? ऐकून आश्चर्य आणि तोंडाला पाणी सुटलं ना? झणझणीत ठेचा पाव कसा करायचा? पाहा..
दही
करपलेल्या भाजीमधून करपट गंध घालवण्यासाठी आपण दह्याचा वापर करु शकता. जर भाजी जास्त असेल आणि तळाशी लागली असेल तर, त्याची टेस्ट सुधारण्यासाठी आपण त्यात दही मिक्स करू शकता. यामुळे दह्यातील करपट गंध निघून जाईल.
तूप
जर भाजीमधून करपलेला वास येत असेल, शिवाय चवीला बेचव झाली असेल तर, त्यात आपण दूध आणि दह्याऐवजी तुपाचा वापर करू शकता. भाजीमध्ये तूप घातल्याने भाजीच्या चवीमध्ये बदल होतो. शिवाय भाजीमधून करपलेला गंधही निघून जातो.
कुकरच्या शिट्टीतून फसफसून पाणी येतं? डाळ शिजतच नाही? ५ गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू नका, कारण..
लिंबाचा रस
लिंबाचा रस, टोमॅटोचा रस आणि व्हिनेगरच्या वापराने देखील भाजीमधील करपलेला वास निघून जाऊ शकते. भाजी जर करपली असेल तर, तर या ३ पैकी एकाचा रस भाजीमध्ये मिक्स करा. या टिप्समुळे भाजीची नासाडी होणार नाही. शिवाय भाजी चवीला उत्कृष्ट लागेल.