जेवण बनवताना अनेक वेळा अन्न उरते. आपण ते अन्न साठवून ठेवतो. बऱ्याचदा चपातीचे कणिक शिल्लक राहते. पण कधी कधी हे कणिक साठवून ठेवल्यानंतर लगेच काळपट पडते. मग ते कणिक वापरावं की नाही? असा प्रश्न गृहिणींच्या मनात उद्भवते. कणिक साठवून ठेवल्यानंतर त्याच्या चवीमध्ये देखील बदल जाणवते. त्यामुळे काही जण हे कणिक फेकून देतात.
जर आपल्याला कणिक अधिक काळ साठवून ठेवायचे असेल तर, काही टिप्स फॉलो करा. या टिप्समुळे कणिक काळपट पडणार नाही यासह, सॉफ्ट आणि फ्रेश राहेल. कोणते आहेत ते टिप्स पाहूयात(4 Tips To Keep Chapati Dough Fresh For Long).
पिठात मीठ मिक्स करा
पीठ काळे होण्यापासून रोखण्यासाठी, आपण त्यात थोडे मीठ घालू शकता. पीठ मळत असतानाच त्यात मीठ घालून मळा. ज्यामुळे पिठात सूक्ष्म जिवाणू हळूहळू वाढतील, व पीठ लवकर काळपट पडणार नाही.
पीठ मळताना गरम पाणी वापरा
पिठाचा ताजेपणा टिकवण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करू शकता. पीठ मळताना कोमट पाणी किंवा दुधाचा वापर करा. या ट्रिकमुळे पीठ मऊ राहील व लवकर काळपट पडणार नाही. खरे तर थंड पाण्याने मळून घेतल्यावर पीठ काही वेळाने घट्ट होते. जर आपल्याला तातडीने चपात्या हव्या असतील तर आपण थंड पाण्याचा वापर करू शकता.
उन्हाळयात सोलकढी प्यायली की आत्मा तृप्त होतो, पाहा सोलकढीची पारंपरिक रेसिपी
तेल लावून पिठाला ग्रीस करा
पीठ मळून झाल्यानंतर शिल्लक राहिले असेल तर, आपण तेल किंवा तुपाचा वापर करू शकता. शिल्लक राहिलेले कणिक एका डब्यात ठेवा, त्यावर तेलाने किंवा तुपाने ग्रीस करा, व डबा झाकून फ्रिजमध्ये ठेवा. असं केल्याने पीठ अधिक काळ ताजे व फ्रेश राहेल.
मोकळा-चविष्ट परफेक्ट पुलाव करण्यासाठी योग्य तांदूळ कसा निवडायचा? कोणता तांदूळ पुलावासाठी चांगला
एअर टाईट कंटेनरमध्ये पीठ ठेवा
शिल्लक राहिलेले कणिक अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून एअर टाईट डब्यात ठेवा, व हा डबा फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे पीठ काळे होणार नाही आणि दोन दिवस ताजे राहील.