Join us  

कोफ्ते मऊ आणि मस्त होण्यासाठी ४ टिप्स, रेस्टॉरंट स्टाइल परफेक्ट कोफ्ते बनवण्याचं सिक्रेट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2023 3:12 PM

Tips To Make Soft & Delicious Koftas : हाैसेने कोफ्ते करायला जावं तर कधीकधी ते फार कडक होतात, त्यावर उपाय काय?

रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण मेन्यू कार्डमध्ये मलाई कोफ्ता, पनीर कोफ्ता यांसारख्या कोफ्ता प्रकारातल्या डिशेजची नाव वाचतो. काही वेळा बऱ्याचशा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळणारी कोफ्ता डिश खूप महागडी असते. अशा वेळी आपण घरीच मलाई कोफ्ता, कढी कोफ्ता, पनीर कोफ्ता यांसारख्या डिशेज बनवतो. मलाई कोफ्ता ही रेसिपी खाण्यासाठी अप्रतिम लागते तसेच ही रेसिपी एक प्रसिद्ध व्हेजिटेरियन डिश आहे. हे कोफ्ते क्रिमी ग्रेव्हीमध्ये बुडवल्यामुळे त्यांना एक वेगळीच चव येते. ही चव एवढी टेस्टी असते की, त्याच्यामुळे कोफ्ते खाण्याचा मोह कोणालाही आवरला जात नाही. हॉटेल किंवा रेस्टॉरंट सारखीच चविष्ट व ग्रेव्हीदार कोफ्ते रेसिपी आपण अगदी कमी वेळात घरी तयार करू शकतो. घरच्या घरी कोफ्ते बनवताना ते रेस्टॉरंट स्टाईल सॉफ्ट, कुरकुरीत चविष्ट बनवण्यासाठी काही खास टीप्स समजून घेऊयात(Tips To Make Soft & Delicious Koftas).

नक्की काय करता येऊ शकते... 

१. ब्रेड्सक्रम्सचा वापर करा - ब्रेडक्रम्सचा वापर केल्याने कोफ्त्यांना बाईंडिंग करण्यास मदत होते. कोफ्ता बनवताना त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा उकडलेले बटाटे घातले जातात. या भाज्यांचे बाईंडिंग करण्यासाठी ब्रेड्सक्रम्सचा वापर करा. कोफ्ता बनवताना ब्रेड्सक्रम्सचा वापर केल्याने कोफ्ते तळताना त्यांना भेगा पडून ते फुटत नाहीत.  

२. कोफ्त्याची ग्रेव्ही -  कोफ्त्याची ग्रेव्ही हा या डिशमधील मुख्य आणि महत्वाचा भाग आहे. कोफ्ते ग्रेव्हीमध्ये सोडल्यांनंतर ते भिजून मऊ होण्यासाठी ग्रेव्हीची कन्सिस्टंसी योग्य असणे गरजेचे असते. कोफ्त्याची ग्रेव्ही ही नेहमी थोडी जाडसर आणि घट्ट असावी.  

३. स्टफिंगमध्ये पनीरचा वापर -   व्हेज कोफ्ता बनवत असताना त्याचे स्टफिंग तयार करताना त्यात पनीर कुस्करून घाला. पनीर घातल्याने कोफ्त्याची केवळ चवच नाही वाढणार तर ते मऊ आणि क्रिमी होण्यासाठी मदत होईल. 

४. तळताना विशेष काळजी - कोफ्ते तळताना त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. कोफ्ते तळताना ते गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंतच तळावेत. कोफ्ते तळताना ते ओव्हर फ्राय करू नयेत.

टॅग्स :अन्न