Join us  

आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून ४ टिप्स, रस दिसेल पिवळाजर्द-चवही राहील परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2023 5:04 PM

4 ways to stop Aamras from turning brown आंब्याचा रस काढून फ्रिजमध्ये ठेवला तरी तो काळा पडतो, अशावेळी काय करावं?

फळांचा राजा म्हणजेच आंबा.  उन्हाळा सुरु झाल्यानंतर अनेकजण आंब्याची वाट बघतात. विविध प्रकारचे आंबे बाजारात मिळतात.  मँगो लव्हर्सला आंब्याचा रस फार आवडतो. आंबा वर्षातून एकदाच बाजारात येत असल्यामुळे काही लोकं आमरस बनवून साठवून ठेवतात. पण काही दिवसानंतर आमरस काळपट पडू लागतो.

आंब्याचा रस अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी काही लोकं त्यात रसायनांचा वापर करतात. आंब्याचा रस रसायनांचा वापर न करता साठवून ठेवायचं असेल तर, या काही टिप्स फॉलो करा. या टिप्समुळे आमरस काळपट पडणार नाही(4 ways to stop Aamras from turning brown).

१. आमरस करण्यासाठी आंबा नेहमी पिकलेला निवडावा. व त्याला काही मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवा. आमरस करताना मिक्सरमध्ये फिरवून घेऊ नका. कारण आमरस स्टीलच्या धातूच्या संपर्कात आल्याने ॲसिडिक रिॲक्शन होते. त्यामुळे आमरस लगेच काळपट पडते.

आंबट - गोड चवीचं करा थंडगार कोकम सरबत, कमी वेळात - झटपट सरबत रेडी..

२. रस काढून घेतल्यानंतर त्यात आवडीप्रमाणे साखर मिक्स करून, रवीने साखर घुसळून एकजीव करून घ्या. आमरसामध्ये दूध घालून नका. त्यामुळे  आमरस काळा पडतो.

कलिंगड नैसर्गिक पद्धतीने पिकवले आहे की केमिकलने, कसे ओळखाल? ३ टिप्स - निवडा रसाळ कलिंगड

३. आमरस घुसळून झाल्यानंतर त्यात कोय घालून ठेवा, असे केल्याने आमरस ७ ते ८ तास काळपट पडत नाही. आपल्याला आमरस फ्रिजमध्ये ठेवायचे असेल तर, त्याच्यावर काचेचं, लाकडी किंवा मातीचं झाकण ठेऊन पॅक करा.

टॅग्स :आंबाअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स