Join us  

पावसाळ्यात मिळणारा ओला खजूर खा भरपूर, फायदे ५ ; वाचा ओला खजूर खाण्याची योग्य पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 4:52 PM

5 Benefits of Eating fresh Dates in Monsoon : ओला खजूर पावसाळ्याच्या दिवसांत आवर्जून खायला हवा...

ठळक मुद्दे फायबर आणि अँटीऑक्सिडंटस रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात. हाडांच्या ठिसूळपणाची समस्या असेल तर खजूराचा चांगला उपयोग होतो. 

आपण अनेकदा खजूर खातो. खजूर हे फळ असलं तरी ते वाळवलेले असल्याने ते सुकामेव्यामध्ये मोडतं. खजूर आरोग्यासाठी अतिशय चांगला असल्याने हिमोग्लोबिन वाढण्यासाठी, लोह वाढण्यासाठी किंवा विविध खनिजे आणि व्हिटॅमिन्स मिळण्यासाठी खजूर फायदेशीर असतो असे आपण ऐकतो (Diet Tips). आहारतज्ज्ञही अनेकदा लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सगळ्याना आवर्जून खजूर खाण्याचा सल्ला देतात. खजूरामध्येही काळा खजूर, लाल खजूर, खूप कोरडा खजूर, चिकट खजूर असे बरे प्रकार पाहायला मिळतात. (Monsoon Special) यातही आणखी एक प्रकार जो खास पावसाळ्यात बाजारात येतो, तो म्हणजे ओला खजूर, साधारण पिवळा, तांबूस रंगाचा दिसणारा हा ओला खजूर पावसाळ्याच्या दिवसांत आवर्जून खायला हवा असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे (5 Benefits of Eating fresh Dates in Monsoon). 

(Image : Google)

ओला खजूर खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. हा खजूर ताजा असेल तर त्याचे आणखीनच फायदे होतात. मात्र आरोग्यासाठी उपयुक्त असणारी कोणतीही गोष्ट आपण चुकीच्या स्वरुपात खाल्ली तर त्याचा फायदा तर होतच नाही पण तोटा होण्याचीही शक्यता असते. अशावेळी ओला खजूर खाण्याची योग्य पद्धत कोणती हे माहित असणे आवश्यक आहे. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजिकल इन्फर्मेशनने प्रकाशित केलेल्या एका माहितीनुसार, खजूर अँटीऑक्सिडंट विशेषत: कॅरोटीनॉयड आणि फेनोलिक्सचा एक उत्तम स्त्रोत आहे. तसेच खजूरात फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर, मँगनिज, लोह, व्हिटॅमिन बी १२ यांसारखी पोषक तत्त्वे असतात. 

Recipe : त्याच त्या भाज्या, आमट्या खाऊन कंटाळलात? करा गरमागरम कढी वडे, झटपट-पौष्टीक रेसिपी...

पावसाळ्यात होणाऱ्या विविध अॅलर्जी किंवा इन्फेक्शनसाठी हा खजूर फायदेशीर ठरतो. अॅसिडीटीवरील रामबाण उपाय असून एनर्जी टिकून राहावी यासाठीही या खजूराचा फायदा होतो. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर यांच्या म्हणण्यानुसार, सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाणे फायद्याचे असते. आतड्यांशी निगडित समस्या, हार्ट आणि लिव्हरशी निगडीत समस्या दूर करण्यास याचा चांगला फायदा होतो. महिलांमध्ये साधारणपणे हिमोग्लोबिन कमी असण्याची समस्या असते. अशावेळी जेवण झाल्यानंतर ओला खजूर खाणे फायदेशीर ठरते. 

ओल्या खजूराचे फायदे 

१. नैसर्गिक गोडवा 

खजूर हे फळ असल्याने त्यामध्ये फ्रुक्टोज असते. साखरेपेक्षा हा नैसर्गिक गोडवा केव्हाही चांगला. त्यामुळे साखरेला उत्तम पर्याय ठरु शकतो. यामध्ये असणारे फायबर आणि अँटीऑक्सिडंटस आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. 

भर पावसात गरमागरम सूप प्यावंसं वाटतंच ना, घ्या मंचाव सूपची ही सोपी रेसिपी...

२. मेंदूचे कार्य चांगले होण्यास उपयुक्त 

खजूराचे नियमित सेवन केल्यास भविष्यात मेमरी लॉस किंवा मेंदूशी निगडीत समस्या होण्यापासून आपण वाचू शकतो. खजूरात मेंदूला बूस्ट करणारे घटक असतात. तसेच सूज कमी करण्यासाठीही याचा उपयोग होत असल्याने मेंदूच्या एकूण कार्यासाठी खजूर चांगला असतो. 

३. हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर 

खजूरात फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ही खनिजे चांगल्या प्रमाणात असतात. हाडांचे कार्य सुरळीत व्हावे यासाठी ही खनिजे उपयुक्त असल्याने हाडांच्या मजबुतीसाठी खजूर उपयुक्त असतो. हाडांच्या ठिसूळपणाची समस्या असेल तर खजूराचा चांगला उपयोग होतो. 

(Image : Google)

४. गर्भवतींसाठी फायदेशीर

गर्भवती महिलांचे पोषण चांगले झाले तरच अर्भकाचे चांगले पोषण होते. तसेच कळांचा कालावधी कमी करण्यासाठी खजूर फायदेशीर असतो. 

५. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रण

खजूराचा ग्लायसेमिक इंडेक्स अतिशय कमी असतो. यातील फायबर आणि अँटीऑक्सिडंटस रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे डायबिटीसचे प्रमाण एकीकडे वाढत असताना ओला खजूर खाणे फायद्याचे ठरते. 

टॅग्स :अन्नआहार योजनाहेल्थ टिप्सफळे