Lokmat Sakhi >Food > भातातून जळका वास - भाजीत जास्त मीठ पडलं? ५ किचन हॅक्स; स्वयंपाक होईल परफेक्ट

भातातून जळका वास - भाजीत जास्त मीठ पडलं? ५ किचन हॅक्स; स्वयंपाक होईल परफेक्ट

5 Best Cooking Hacks to Save Time, Hassle and Money : पदार्थ करताना काही चुका झाल्या असतील तर घाबरू नका; ५ किचन हॅक्स फॉलो करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2024 10:05 AM2024-09-10T10:05:21+5:302024-09-10T17:22:36+5:30

5 Best Cooking Hacks to Save Time, Hassle and Money : पदार्थ करताना काही चुका झाल्या असतील तर घाबरू नका; ५ किचन हॅक्स फॉलो करा

5 Best Cooking Hacks to Save Time, Hassle and Money | भातातून जळका वास - भाजीत जास्त मीठ पडलं? ५ किचन हॅक्स; स्वयंपाक होईल परफेक्ट

भातातून जळका वास - भाजीत जास्त मीठ पडलं? ५ किचन हॅक्स; स्वयंपाक होईल परफेक्ट

स्वयंपाकघरात आपण बरेच पदार्थ करतो (Cooking Tips). पण पदार्थ कधी फसतात, तर कधी साहित्यांच गणित चुकतं. ज्यामुळे पदार्थ कधी परफेक्ट तर, कधी त्यात थोड्या फार चुका होतात (Kitchen Hacks). ज्यामुळे पदार्थाची चवही बिघडते. पदार्थ करताना अचानक करपतो. किंवा जास्त मीठ पडल्यामुळे खारटही होतो. पदार्थ करताना जर आपलंही गणित चुकलं असेल आणि पदार्थ फसला असेल तर, ५ किचन हॅक्स फॉलो करून पाहा.

या किचन हॅक्समुळे पदार्थ करणं सोपं होईल. पदार्थाची चव बिघडली तर, व्यवस्थित होईल. या ५ किचन हॅक्स प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवायला हव्या. या टिप्समुळे पदार्थ करताना चूक घडली तरी, चूक सुधारली जाऊ शकते. पदार्थ व्यवस्थित तयार होईल(5 Best Cooking Hacks to Save Time, Hassle and Money).

५ किचन हॅक्स गृहीणींना माहीत असायलाच हवे


- बऱ्याचदा भाजीमध्ये जास्त मीठ पडतं. ज्यामुळे भाजी खारट होते. खारट भाजी कोणालाही खायला आवडत नाही. जर मिठाच प्रमाण भाजीमध्ये जास्त झालं असेल तर, बटाट्याचा वापर करून पाहा. भाजीमध्ये बटाट्याचे काही तुकडे घालून पुन्हा गरम करा. आपण त्यात पाणीही घालू शकता. बटाटा मीठ शोषून घेईल. ज्यामुळे भाजीतील खारटपणा कमी होईल.

व्यायामाला वेळ नाही - तोंडाचाही ताबा सुटतो? ४ स्मार्ट गोष्टी करा; दिसाल सुडौल - राहाल कायम फिट

- अनेकदा भात किंवा वरण करपते. भांड्याचे तळ पातळ असेल तर, भात खाली करपतो. जर भात करपला असेल तर, भातावर कांद्याचे स्लाईज ठेवा. त्यावर झाकण ठेवा. यामुळे जळका वास निघून जाईल.

- भात जास्त शिजला असेल किंवा त्यात जास्त प्रमाणात पाणी पडलं असेल तर, ब्रेड स्लाईजचा वापर करून पाहा. ब्रेड स्लाईज भातावर ठेवा, आणि झाकण लावा. काही वेळानंतर ब्रेड काढा. ब्रेड भातातील अतिरिक्त पाणी शोषून घेईल.

सुनील शेट्टी सांगतो ३ नियम, वयासोबत फिटनेसही वाढेल आणि आजार जवळपास फिरकणार नाहीत

- जर वरण किंवा भाजीमध्ये जास्त तेल झालं असेल तर, बर्फाचा वापर करून पाहा. एका चमच्यामध्ये बर्फाचे तुकडे घ्या. ग्रेव्हीमध्ये बर्फाचे तुकडे घालून लवकर बाहेर काढा. बर्फाला अतिरिक्त तेल गोठेल आणि चिकटेल. या ट्रिकद्वारे भाजीद्वारे अतिरिक्त तेल काढणं सोपं होईल.

- भाजी किंवा ग्रेव्हीमध्ये जास्त तिखट पावडर पडली असेल तर, त्यात डेअरी प्रॉडक्ट्स मिक्स करा. दूध, दही किंवा क्रीम मिक्स केल्याने भाजीतील तिखटपणा कमी होईल. 

Web Title: 5 Best Cooking Hacks to Save Time, Hassle and Money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.