Join us  

फ्रेंच फ्राईज परफेक्ट होण्यासाठी शेफ पंकज भदोरिया सांगतात ५ स्टेप्स, उपवासाला खा रेस्टाॅरण्टसारखे कुरकुरीत फ्रेंच फ्राईज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2023 10:00 AM

How to make Perfect French Fries : घरी केलेले फ्रेंच फ्राईज रेस्टाॅरण्टसारखे कुरकुरीत होण्यासाठी सोप्या युक्त्या वापरल्यास घरचे फ्रेंच फ्राइज खाताना मूड जात नाही, मास्टरशेफ पंकज भदौरिया यांच्या खास टिप्स...

आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्रीचा सण आणि उपवास या गोष्टी ठरलेल्याच आहेत. उपवास असला की हमखास आठवण येते ती उपवासांच्या पदार्थांची. उपवासाच्या पदार्थात आपण मोजक्याच साहित्याचा वापर करुन झटपट होणारे पदार्थ तयार करतो. उद्यापासून सुरु होणाऱ्या या शारदीय नवरात्र उत्सवाच्या उपवासाची जय्यत तयारी सगळ्यांनीच एव्हाना सुरू केली असेल. नऊ दिवसांच्या या उपवासासाठी कोणते पदार्थ खावेत याची यादी देखील ठरली असेल. उपवासाच्या पदार्थांच्या यादीत साबुदाणा आणि बटाटा (What are the steps to make perfect french fries?) यांचे सगळ्यात पहिले स्थान असते. कोणताही उपवासाचा पदार्थ बनवायचा म्हटला की त्यात बटाटा आणि साबुदाणा हे दोन घटक महत्वाचे असतातच(5 Cooking Tips To Make Perfect Crispy French Fries At Home).

उपवासाच्या पदार्थांच्या यादीत साबुदाणा खिचडी, खीर, वडे, रताळ्याचा किस, बटाट्याची सुकी भाजी, बटाट्याचे फ्रेंच फ्राईज, (How to make french fries like restaurants?)बटाट्याचा चिवडा असे असंख्य पदार्थ येतात. उपवासाच्या वेळी पटकन भूक लागल्यास कमी साहित्यात झटपट होणारा पदार्थ म्हणजे (What is the secret to restaurant french fries?) बटाट्याचे फ्रेंच फ्राईज. आपण एरवी सुद्धा बाहेर हे फ्रेंच फ्राईज खातोच. परंतु असे फ्रेंच फ्राईज आपण घरी बनवण्याचा प्रयत्न केल्यास ते बाहेरच्या सारखे होत नाहीत. कधी ते मऊ होतात, तर कधी कच्चे राहतात असे फ्रेंच फ्राईज खायला कुणालाच आवडत नाहीत. विकतसारखे क्रिस्पी, क्रंची, हलके - फुलके फ्रेंच फ्राईज यंदाच्या उपवासाला घरीच बनवण्यासाठी मास्टरशेफ पंकज भदौरिया (Perfect Frozen French Fries By Pankaj Bhadouria) सांगतात काही खास टिप्स. या टिप्स फॉलो करुन आपण परफेक्ट विकतसारखे मिळणारे फ्रेंच फ्राईज घरच्या घरी बनवू शकतो. 

विकतसारखे परफेक्ट फ्रेंच फ्राईज घरी कसे बनवावेत ? 

१. फ्रेंच फ्राईज बनवताना बटाटा कापून घेताना बटाटा उभा धरुन बटाट्याचे १/४ या साईजचे परफेक्ट तुकडे करुन घ्यावेत. १/४ साईज ही फ्रेंच फ्राईजची परफेक्ट साईज आहे. त्यानंतर हे फ्रेंच फ्राईज पाण्यांत बुडवून स्वच्छ धुवून घ्यावेत. बटाट्याचे उभे काप पातळ चिरल्यास फ्रेंच फ्राईज कुरकुरीत होतात. 

२. फ्रेंच फ्राईज प्री - कुक करण्याआधी पाण्यातून बुडवून काढून घ्यावेत. त्यानंतर १ लिटर पाणी घेऊन त्यात १ टेबलस्पून व्हिनेगर व चवीनुसार मीठ घालूंन त्यात हे फ्रेंच फ्राईज ७ ते ८ मिनिटे उकडवून घ्यावेत. 

उपवास करताना तब्येत बिघडू नये म्हणून कोणते मीठ खावे ? तज्ज्ञ सांगतात, मीठ खाणार असाल तर...

३. ७ ते ८ मिनिटानंतर हे फ्रेंच फ्राईज एका किचन टॉवेल वर काढून पसरवून घ्यावेत. त्यानंतर या फ्राईजना एकदम कडक गरम तेलांत ३ मिनिटे अर्धवट तळून घ्यावेत. 

नवरात्र स्पेशल : नेहमीची तीच ती साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात ? त्याच पारंपरिक साबुदाणा खिचडीला द्या हटके ट्विस्ट...

उपवासाला खा पौष्टिक मखाणा खीर, ५ मिनिटांत होणारी मखाणा खीर खा - मिळेल इन्स्टंट ताकद...

४. हे अर्धवट तळून घेतलेले फ्राईज एका टिश्यू पेपरवर काढून संपूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवावेत. हे फ्राईज संपूर्ण थंड झाल्यानंतर एका प्लॅस्टिकच्या कंटेनर मध्ये भरुन फ्रिज करण्यासाठी फ्रिजरमध्ये ठेवावेत. जोपर्यंत हे फ्रेंच फ्राईज संपूर्णपणे फ्रिज होत नाहीत तोपर्यंत त्यांना फ्रिजरमध्ये फ्रिज होण्यासाठी ठेवावेत. असे हे फ्रिज करून ठेवलेले फ्रेचं फ्राईज दीर्घकाळ टिकतात व आपण आपल्याला हवे तेव्हा फ्रिजरमधून काढून तळून खाऊ शकतो.  

नवरात्रात उपवास करताना थकवा आला, गळाल्यासारखं झालं तर खा ५ पदार्थ, मिळेल इन्स्टंट एनर्जी...

५. फ्रेंच फ्राईज व्यवस्थित फ्रिज झाल्यानंतर ते फ्रिजरमधून काढून अजिबात डी - फ्रोझन न करता लगेच आहेत तसेच कडक गरम तेलांत घालून खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यावे. याचबरोबर हे फ्राईज तळून बाहेर काढल्यावर लगेच आपल्या आवडीनुसार त्यावर मीठ घालावे, म्हणजे त्यांना व्यवस्थित मीठ लागले जाते.         

या सोप्या ५ स्टेप फॉलो करुन आपण विकतसारखे फ्रेंच फ्राईज झटपट घरच्या घरी बनवू शकतो.

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्रीअन्नकिचन टिप्स