आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपण आहारात अनेक पौष्टिक व हेल्दी अन्नपदार्थांचा समावेश करुन घेतो. याचबरोबर आहारात अशा गोष्टींचा समावेश करतो ज्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. परंतु असे असले तरीही अनेक वेळा माहितीच्या अभावामुळे आपल्याकडून काही चुका होतात ज्यामुळे कितीही पौष्टिक अन्नपदार्थ खाऊन देखील त्याचा आपल्या फायदा होत नाही. काही अन्नपदार्थ असे असतात जे आपण शिजवून त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवतो. परंतु काही मोजकेच अन्नपदार्थ असे आहेत जे शिजवल्याने त्यातील पोषणमूल्य कमी होते किंवा उरतच नाही, असे अन्नपदार्थ खाऊन त्याचा आपल्या शरीराला काहीच फायदा होत नाही(What foods lose nutrients when cooked).
आपण आपल्या रोजच्या जेवणात संतुलित आहार घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. परंतु काहीवेळा आपण काही छोट्या चुका करतो ज्यामुळे कितीही पौष्टिक अन्नपदार्थ खाऊन देखील त्यातील संपूर्ण पोषणमूल्य आपल्याला मिळत नाहीत. काही पदार्थ असे असतात की जे शिजवून खाल्ले तर त्याचे गुणधर्म व त्यातील पोषक तत्व शरीराला मिळतात. यासोबतच काही पदार्थ असे असतात की जे कच्चेच खाल्ल्याने त्यातील पोषणमूल्य आपल्या शरीराला मिळतात. यामुळेच आपल्या रोजच्या खाण्यातील काही पदार्थ असे असतात की जे शिजवून खाल्लयने त्यातील पोषणमूल्य कमी होतात. यामुळेच असे पदार्थ शिजवून खाणे टाळावे. नेमके कोणते आहेत ते पदार्थ पाहूयात(Foods You Should Eat Raw, Not Cooked).
कोणते अन्नपदार्थ शिजवून खाऊ नयेत ?
१. ब्रोकोली :- ब्रोकोली खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते, पण ती शिजवताच त्यातील सर्व पोषक तत्वे नष्ट होतात. अशा परिस्थितीत ब्रोकोली भाजी म्हणून शिजवण्यापेक्षा ती कच्चीच खाणे फायदेशीर ठरते. जेव्हा आपण ब्रोकोली शिजवून खातो तेव्हा त्यातील पोषक घटक हे संपुष्टात येतात. आपण जेव्हा ब्रोकोली शिजवतो तेव्हा त्यात असलेले व्हिटॅमिन सी आणि फोलेट सारखे जीवनसत्त्व बाहेर पडतात. यामुळे ब्रोकोली खाऊन देखील आपल्याला त्यातील पोषक घटक मिळत नाही.
गारठ्याच्या थंडीत घरगुती आवळा कँडी खाऊन ठेवा स्वतःला फिट अँड फाईन, घ्या आवळा कँडीची सोपी रेसिपी...
२. बीटरूट :- बीटरूट हा पोषक तत्वांचा खजिना आहे. जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि प्रथिने यांसारखे अनेक आरोग्यदायी पोषक घटक त्यात असतात. याशिवाय यामध्ये फायबर आणि फोलेट देखील भरपूर प्रमाणात असतात, परंतु जेव्हा आपण बीटरूट शिजवता तेव्हा त्यातील पोषक घटकांचे प्रमाण भरपूर प्रमाणात कमी होते.
दिवाळीत गोड तर खायचे पण साखर नको ? घ्या साखरेला ४ पर्याय, करा गोड फराळ...
३. टोमॅटो :- बर्याचदा आपण आपल्या जेवणात टोमॅटोचा वापर चव वाढवण्यासाठी करतो. परंतु जेव्हा टोमॅटो शिजवला जातो तेव्हा त्यात असलेले व्हिटॅमिन - सी भरपूर प्रमाणात कमी होते. अशा परिस्थितीत, जर आपल्याला टोमॅटो खाल्ल्याने त्यातील पोषक तत्वांचा पुरेपूर फायदा करुनघ्यायचा असेल, तर टोमॅटो कच्चा खाणेच फायदेशीर ठरेल. टोमॅटोचा वापर आपण कोशिंबीरीत करु शकतो.
गुलाबी थंडीत आल्याचा गरमागरम चहा पिण्याचे १० फायदे, घ्या आल्याचा चहा करण्याची ' योग्य ' पद्धत...
४. लसूण :- रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म लसणात फार मोठ्या प्रमाणात असतात. कच्चा लसूण हे पोषक तत्वांचा खजिना आहे. असे असले तरीही लसूण शिजवल्यावर त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. अशा स्थितीत जेवण करताना चिरलेला लसूण वापरा.
५. दही :- दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असल्यामुळे ते खाण्यासाठी अतिशय फायदेशीर असते. परंतु जेव्हा आपण दही पदार्थात घालून शिजवून खातात तेव्हा हे गुणधर्म नष्ट होतात. अशा स्थितीत नेहमी कच्चे दही खावे. कधीही दही शिजवून खाऊ नये. दही नेहमी गार झाल्यावर जेवणात घालून खावे. अशाप्रकारे दही खाल्ल्याने त्यांतील प्रोबायोटिक्सचे गुणधर्म आणि प्रमाण हे तसेच टिकून राहते.
६. मध :- कच्च्या मधामध्ये फार मोठ्या प्रमाणांत पोषक तत्वांचा खजिना असतो. यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. पण जेव्हा आपण मध गरम करता तेव्हा मधामधील ही सर्व पोषक तत्व नष्ट होतात. त्यामुळे चुकूनही मध शिजवून किंवा गरम करून खाऊ नये.