Lokmat Sakhi >Food > चुकूनही फ्रिजमध्ये हे ५ पदार्थ ठेवू नका, पदार्थ टिकूण्याऐवजी होतील खराब, आरोग्याला अपायच...

चुकूनही फ्रिजमध्ये हे ५ पदार्थ ठेवू नका, पदार्थ टिकूण्याऐवजी होतील खराब, आरोग्याला अपायच...

5 Foods You Should Never Store In The Fridge : Do not keep this food in fridge even by mistake : काही पदार्थ फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवल्याने पदार्थाची चव जाते आणि हे आरोग्यासाठीही घातक ठरु शकते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2024 06:38 PM2024-08-23T18:38:58+5:302024-08-23T18:47:12+5:30

5 Foods You Should Never Store In The Fridge : Do not keep this food in fridge even by mistake : काही पदार्थ फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवल्याने पदार्थाची चव जाते आणि हे आरोग्यासाठीही घातक ठरु शकते.

5 Foods You Should Never Refrigerate 5 Foods You Should Never Store In The Fridge | चुकूनही फ्रिजमध्ये हे ५ पदार्थ ठेवू नका, पदार्थ टिकूण्याऐवजी होतील खराब, आरोग्याला अपायच...

चुकूनही फ्रिजमध्ये हे ५ पदार्थ ठेवू नका, पदार्थ टिकूण्याऐवजी होतील खराब, आरोग्याला अपायच...

फ्रिज ही आपल्या स्वयंपाक घरातील एक महत्वाची गोष्ट आहे. पदार्थ ताजे, फ्रेश आणि खराब होऊ नये म्हणून सहजपणे आपण फ्रिजचा वापर करतो. पण फ्रिजमध्ये काही पदार्थ ठेवल्याने ते चांगले टिकून राहण्याऐवजी उलट खराब होतात. शिजवलेले अन्न आणि खाद्यपदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो. फ्रिजमुळे पदार्थ ताजे राहण्यास मदत होते, पण फ्रिजमध्ये अन्नपदार्थ ठेवताना खूप काळजी घेतली पाहिजे. कारण, काही गोष्टी फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर खराब होतात आणि अशा पदार्थांचा वापर केल्याने शरीरात टॉक्सिन तयार होतात. 

फ्रिज ही हल्ली इतकी सोयीची गोष्ट झाली आहे की अन्न शिळे होऊ नये म्हणून आपण सर्रास ते फ्रिजमध्ये ठेवतो आणि वापरतो. मात्र सगळेच पदार्थ फ्रिजमध्ये ठेवून खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे काही वेळा पदार्थाची चव जाते आणि हे पदार्थ आरोग्यासाठीही घातक ठरु शकतात. पाहूया कोणते ५ पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नयेत(5 Foods You Should Never Store In The Fridge).

कोणते पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नयेत ?

१. ब्रेड :- बरेचदा आपण बाजारांतून ब्रेड विकत आणतो. शक्यतो एकदा ब्रेडचे पॅकिंग फोडल्यानंतर एकाचवेळी सगळा ब्रेड संपत नाही. अशावेळी उरलेला ब्रेड आपण खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवतो. परंतु ब्रेड फ्रिजमध्ये ठेवणे योग्य नाही. यामुळे ब्रेड सुकून वातड आणि कडक होतो. त्यापेक्षा तो मोकळ्या हवेत ठेवल्यास दीर्घकाळ चांगला टिकून राहतो. 

२. मध :- मध खराब होऊ नये म्हणून आपण तो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येते. परंतु मध फ्रिजमध्ये ठेवल्याने ते लवकर गोठण्यास सुरुवात होते. त्यामुळे मध रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची चूक करू नका. मध फ्रिजमध्ये ठेवल्यास तो गाठून घट्ट होतो त्यामुळे असे गोठलेले मध वापरणे अवघड होते. मध स्टोअर करताना तो कोरड्या जागी एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करुन ठेवावा. फ्रिजमध्ये मध ठेवल्याने त्यातील साखरेचा भाग वेगळा होतो. 


 
३. कॉफी :- फ्रिजमध्ये कॉफी ठेवली तर इतर पदार्थांच्या वासामुळे कॉफीचा नैसर्गिक सुगंध खराब होईल. फ्रिजमध्ये असणारी आर्द्रता कॉफीचा मूळ सुगंध आणि चव शोषून घेते. याचा कॉफीच्या फ्लेवरवर परिणाम होतो. 

४. केळी :- केळी कच्ची असतील तर फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याची पिकण्याची प्रक्रिया बंद होते. केळी लवकर काळी होतात किंवा लगेच पिकतात म्हणून आपण ती फ्रिजमध्ये ठेवतो. परंतु केळी चांगली राहावीत यासाठी ती बाहेरच ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे केळी फ्रिजमध्ये ठेवू नयेत. फ्रिजमध्ये केळी ठेवल्यास त्याचा रंग, चव आणि पोत खराब होऊ लागतो. त्यामुळे केळी फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक करू नका, त्याऐवजी केळी बाहेरच स्टोअर करुन ठेवा. 

५. टोमॅटो :- बरेचजण टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवतात जेणेकरून ते ताजे आणि दीर्घकाळ टिकून राहावे, परंतु टोमॅटो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने त्यांचा रंग आणि पोत खराब होतो. त्यामुळे टोमॅटो फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवू नका. थंड तापमानामुळे टोमॅटोची त्वचा लवचिक होते आणि त्यानंतर ते खाण्यायोग्य राहत नाहीत.

Web Title: 5 Foods You Should Never Refrigerate 5 Foods You Should Never Store In The Fridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.