स्वयंपाक (Cooking) करणं हे खरंतर कौशल्याचं काम. विविध साहित्यांचा वापर करून एक चविष्ट पदार्थ केला जातो. स्वयंपाक तयार करताना जर मन-चिंतन व्यथित किंवा चिंतीत असेल तर, पदार्थ हवा तसा मनासारखा तयार होत नाही. त्यामुळे स्वयंपाक करताना एकाग्रता महत्वाची. अनेकदा स्वयंपाक करताना त्यात जास्त मीठ किंवा मसाले पडतात. मसाले आणि मीठ योग्य प्रमाणात पडले तरच पदार्थ व्यवस्थित रुचकर तयार होते.
पदार्थात मीठ घालताच जेवणाची चव वाढते. पण जास्त पडल्यास बिघडते (Excess Salt in Food). ग्रेवी भाज्यांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त पडले तर, युक्त्या वापरून, त्याची चव सुधारली जाते (Cooking Tips). पण जर सुक्या भाजीत मीठ जास्त पडलं तर? सुक्या भाज्यांमध्ये मीठ जास्त पडलं तर काय करावं? पाहा(5 hacks to reduce excess salt from food).
कच्च्या बटाट्यात दडलंय उजळ त्वचेचं सिक्रेट, बटाट्याच्या रसात मिसळा एक गोल्डन गोष्ट; चेहरा उजळेल..
सुक्या भाज्यांमध्ये मीठ जास्त पडले तर काय करावे?
- ग्रेवी भाज्यांमध्ये जर मीठ जास्त पडले तर, आपण त्यात बेसन घालू शकता. बेसनामुळे खारट चव कमी होते. शिवाय, भाजीची चव वाढते.
- सुकी भाजी खारट झाली तर, आपण त्यात बेसन मिक्स करू शकत नाही. पण आपण त्यात एक्स्ट्रा भाज्या मिक्स करून त्यातील खारटपणा कमी करू शकता.
- जर आपण बटाटा, दोडका किंवा फरसबीची भाजी करत असाल तर, आणि त्यात मीठ जास्त पडलं तर, आपण भाज्या वाफवून त्यात मिक्स करू शकता. यामुळे सुक्या भाजीतील खारटपणा कमी होईल.
- जर भाजी वाफवलेली नसेल तर, आपण भाज्या स्टीर फ्राय करून भाजीमध्ये मिक्स करू शकता.
- भाजीमध्ये मीठ जास्त पडलं असेल आणि कच्ची भाजी घरात उरली नसेल तर, त्यात उकडलेला बटाटा घालून मिक्स करा. यामुळे भाजीची चव सुधारेल.