भारतीय खाद्य संस्कृतीत तांदळाला विशेष महत्व आहे (Kitchen Tips). भात, खीर किंवा साऊथ इंडियन पदार्थ तयार करण्यासाठी तांदळाचा विशेष वापर होतो. काही लोक महिनाभर पुरेल इतके तांदूळ विकत आणून साठवून ठेवतात (Rice). तर काही जण वर्षभर पुरेल इतके तांदूळ आणून स्टोअर करून ठेवतात. पण वर्षभर साठवून ठेवल्यास तांदळाला कीड लागते.
कीड लागल्यानंतर तांदूळ आणखीन खराब होतात. सध्या पावसाळी दिवस आहेत. या दिवसात चुकून तांदळाच्या गोणीला ओला हात लागतो. ज्यामुळे तांदूळ आणखीन खराब होतात. तांदळाला कीड लागू नये आणि जास्त दिवस टिकावेत असं वाटत असेल तर, काही टिप्स फॉलो करून पाहा. या टिप्समुळे तांदूळ खराब होणार नाही(5 Handy Kitchen Tips To Keep Your Rice Insect Free).
तांदळाला कीड लागू नये म्हणून..
- तांदळाच्या डब्यात कीड किंवा अळ्या झाल्या असतील तर, कडूलिंबाचा वापर करून पाहा. कडूलिंबाच्या पानांचा वापर केल्याने तांदळाला कीड लागणार नाही. यासाठी कडूलिंबाची पानं घ्या. उन्हात वाळवून घ्या, त्याची पावडर तयार करा. तयार पावडर एका सूती कापडात गुंडाळून तांदळाच्या पेटी किंवा डब्यात ठेवा. कडूलिंबाच्या उग्र वासामुळे डब्याभोवती कीड येणार नाही.
गणपतीला वाहिलेल्या निर्माल्याचा १ जबरदस्त उपाय; झाडं हिरव्यागार पानांनी बहरेल -मुंग्याही लागणार नाही
- जर अळ्या किंवा किडे यांचं प्रमाण कमी असेल तर, तांदूळ एकदा चाळणीने चाळून घ्या. तांदूळ भरताना त्याला बोरीक पावडर लावा आणि नंतरच भरा. तांदूळ वापरताना स्वच्छ धुवूनही घ्या.
- लवंगामुळेही तांदळाच्या डब्याला कीड लागणार नाही. यासाठी तांदूळ डब्यात स्टोअर केल्यानंतर त्यात ८ - ९ लवंगा ठेवा. लवंगात असलेले तेल आणि सुगंध किडे दूर करतात.
श्री श्री रवीशंकर सांगतात, 'हा' पौष्टिक पदार्थ खा; तूप घालून खाल्ल्याने वाढते दुप्पट ताकद..
- लसणामुळेही तांदळा कीड लागत नाही. आपण लसूण सोलून तांदळाच्या डब्यात ठेवू शकता. लसणाचा उग्र गंध माइट्स आणि कीटकांना दूर करेल.
- तांदळाच्या पेटीत आपण माचिसची काडी ठेऊ शकता. मॅच बॉक्समध्ये सल्फर असते, जे कोणत्याही कीटकांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे. अशा स्थितीत आपण तांदळाच्या डब्यात माचिसच्या काड्या ठेऊ शकता.