फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गेनाइजेशन (FAO) च्या एका रिपोर्टनुसार भारतात दरवर्षी सुमारे ४० टक्के अन्न वाया जाते. भूक आणि अन्न सुरक्षेच्या समस्येबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी जागतिक अन्न दिवस साजरा केला जातो. उरलेलं अन्न सकाळी फेकण्याची अनेकांना वाईट सवय असते. हे अन्न खराब नसतानाही, लोक अनावधानाने डस्टबिनमध्ये फेकतात. अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO) अहवालानुसार, भारतात दरवर्षी सुमारे ४० टक्के अन्न वाया जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शिळ्या चपातीच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत. (5 Health Benefits of Basi Roti)
शिळी चपाती खाल्ल्यानं अन्न वाया तर जातच नाही याशिवाय आरोग्याला अनेक फायदे मिळतात. सध्याच्या काळात अनियमीत जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे एसिडिटीची समस्या अनेकांना जाणवत असते. या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी दुधासोबत शिळी चपाती खा. तसंच अशक्तपणा जाणवत असेल तर शिळ्या चपातीच्या सेवनाने अशक्तपणा कमी होतो.
डायबिटीस रुग्णांसाठी फायदेशीर
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार डायबिटीसच्या रुग्णांसाठी शिळ्या चपातीचा नाश्ता फायदेशीर ठरतो. रोज सकाळी दुधाबरोबर शिळी चपाती खाल्लानं शरीरातील साखरेचं प्रमाणत नियंत्रणात राहतं. याशिवाय छातीतील जळजळीचा त्रासही कमी होतो.
हाय ब्लड प्रेशर
ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठीही शिळी चपाती फायदेशीर ठरते. सकाळच्यावेळी थंड दुधासह शिळी चपाती खाल्ल्यानं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते
अॅसिडीटीपासून आराम
गॅस, अॅसिटीटी यांसारख्या पोटाच्या समस्यांवर शिळी चपाती गुणकारी ठरते. सकाळच्यावेळी दुधासह शिळ्या चपातीचं सेवन केल्यानं अॅसिडीटी आणि अपचनाची समस्या नियंत्रणात ठेवता येते.
व्यायामासाठी फायदेशीर
जिमला जात असलेल्या लोकांनी शिळी चपाती खाल्ली तर फायदेशीर ठरते. अनेक फिटनेस सेंटरमध्ये सकाळी शिळी चपाती खाण्याचे फायदे दिले जातात. यात असणारे बॅक्टिरीया शरीर निरोगी ठेवण्यासाठी लाभदायक ठरत असतात. नियमित शारीरिक कसरत किंवा व्यायाम भरपूर करतात. अश्या व्यक्तींसाठी शिळ्या चपातीचे सेवन हे शरीराला त्वरित उर्जा देणारे आहे.