Join us  

हिवाळ्यात फक्त हे १ ज्यूस रोज प्या; चेहऱ्यावर हमखास ग्लो-पोट साफ आणि तब्येत ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2022 5:21 PM

5 Ingredient Healthy Drink Is Perfect To Keep Your Active & Your Skin Glowing : गाजर, बीट, डाळींब, सफरचंद, खजूर यांचा एकत्रित ज्यूस पिणे शरीराला फायदेशीर असते.

फळांचा रस हा आरोग्यासाठी पोषक असतो हे सर्वज्ञात आहे. वेगवेगळ्या फळांचा रस वेगवेगळ्या आरोग्य समस्यांवर गुणकारी ठरतो. सध्या धावपळीच्या युगात स्वत:ला फीट ठेवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा ज्यूस पितात. यामुळे शरीराला योग्य ती पोषक तत्वे मिळतात. त्यासोबतच शरीरातील पाण्याची कमतरताही यामुळे भरुन निघते. फळांचा रस पिणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. फळांचा रस असो किंवा भाजीचा रस असो एक ग्लास रस आपल्याला त्वरित ताजेतवाने करू शकतो. या रसांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात. बहुतेक लोक नाश्त्याच्यावेळी फळांचा ज्यूस पिणे पसंत करतात. गाजर, बीट, डाळींब, सफरचंद, खजूर यांचा एकत्रित ज्यूस पिणे शरीराला फायदेशीर असते. यामुळे तुम्ही दिवसभर अ‍ॅक्टिव्ह राहाल व तुमच्या स्किन ग्लोमध्ये फरक दिसून येईल. हा हेल्दी ज्यूस बनवायचा कसा त्याची रेसिपी समजून घेऊयात (5 ingredient Healthy drink is perfect to keep your active & your skin glowing).

SwadCooking या इन्स्टाग्राम पेजवरून ही हेल्दी ज्यूसची रेसिपी शेअर करण्यात आली आहे. 

 

साहित्य - 

१. बीट - १२. गाजर - १३. सफरचंद - १४. डाळींब - १ ५. खजूर - ३६. आलं - १ टेबलस्पून ७. काळे मीठ - १/२ टेबलस्पून ८. लिंबाचा रस - १  टेबलस्पून 

कृती - 

१. बीट, गाजर, सफरचंद यांचे लहान तुकडे करून घ्या. २. एका बाऊलमध्ये बीट, गाजर, सफरचंद आणि डाळींबाचे दाणे एकत्रित करून घ्या. ३. त्यानंतर ही एकत्रित केलेली फळ एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात खजूर, काळे मीठ, आलं, लिंबाचा रस घालून घ्या. ४. हे मिश्रण एकत्रित मिक्सरला लावून त्याचा रस होईपर्यंत बारीक वाटून घ्या. ५. आवश्यक असल्यास गरजेनुसार पाणी घाला. 

हा ज्यूस पिण्याचे फायदे...  

१. सफरचंद फायबरचा चांगला स्रोत आहे. यामुळे पचन प्रणाली सुधारते आणि अपचनाची समस्या होत नाही.

२. बीट किंवा बीटच्या रसात कमी कॅलरीज असतात तसेच ० % फॅट असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅनमध्ये याचा समावेश करणे खूप फायदेशीर ठरते. लो - कॅलरीज असणाऱ्या बीटच्या रसात लोह, कॅल्शियम, फायबर यासारखी पोषकतत्वे भरपूर असतात. 

३. तुमच्या रोजच्या जेवणात गाजराचा समावेश केल्यास तुमच्या चेहऱ्यावर चमक येते. जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास होत असेल तर हा ज्यूस तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो. 

४. डाळिंबाच्या रसात इतर फळांच्या रसापेक्षा अधिक अँटी-ऑक्सिडेंट असतात. त्याचे सेवन केल्याने पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होऊ शकते.

५. खजूरमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. नियमित पोट साफ होण्यासाठी यामुळे मदत होते.

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सअन्न