Lokmat Sakhi >Food > किचनमधील 'हे' ५ पदार्थ कधीही खराब होत नाही, कालबाह्य म्हणून अजिबात फेकून देऊ नका; योग्य साठवून ठेवा

किचनमधील 'हे' ५ पदार्थ कधीही खराब होत नाही, कालबाह्य म्हणून अजिबात फेकून देऊ नका; योग्य साठवून ठेवा

5 Kitchen Ingredients That Do Not Expire : तुम्हीही 'हे' ५ पदार्थ स्वयंपाकघरातून फेकून देता का? ज्यांची एक्स्पायरी डेट जवळ आली आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2024 04:19 PM2024-10-07T16:19:47+5:302024-10-07T16:21:47+5:30

5 Kitchen Ingredients That Do Not Expire : तुम्हीही 'हे' ५ पदार्थ स्वयंपाकघरातून फेकून देता का? ज्यांची एक्स्पायरी डेट जवळ आली आहे?

5 Kitchen Ingredients That Do Not Expire | किचनमधील 'हे' ५ पदार्थ कधीही खराब होत नाही, कालबाह्य म्हणून अजिबात फेकून देऊ नका; योग्य साठवून ठेवा

किचनमधील 'हे' ५ पदार्थ कधीही खराब होत नाही, कालबाह्य म्हणून अजिबात फेकून देऊ नका; योग्य साठवून ठेवा

आजकाल आपण आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक होत चाललो आहे (Health Tips). वैश्विक महामारी कोरोनानंतर आपण आहाराकडे विशेष लक्ष द्यायला लागलो आहे (Kitchen Ingredients). कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी आपण त्यातील दोष, वैशिष्ट्ये आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट (Expiry Date) तपासतो. सध्या बऱ्याच गोष्टी पॅक करून विकल्या जातात. त्यावर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. आपण एक्सपायरी डेट पाहूनच वस्तू खरेदी करतो. पण असेही काही पदार्थ आहेत, जे सहसा खराब होत नाही. त्या पदार्थाची योग्य काळजी घेतल्यास, वर्षभर आरामात टिकतात.

आपल्या घरात असे अनेक वस्तू असतात, जे जुने झाल्यानंतर आपण फेकून देतो. पण असे देखील काही पदार्थ असतात, जे लवकर खराब होत नाही. वर्षभर आरामात टिकतात. या पदार्थांना एक्सपायरी डेट नसते(5 Kitchen Ingredients That Do Not Expire).

किचनमध्ये ठेवलेल्या या ५ गोष्टी कधीही खराब होत नाहीत

तूप

देशी तूप प्रत्येकाच्या घरात असतेच. तूप ही अशी गोष्ट आहे जी वर्षानुवर्षे खराब होत नाही. पूर्वी लोक एकाच वेळी वर्षभर तूप खरेदी करून साठवून ठेवत असत. तुपाची चव किंवा वास बदलत आहे, असे वाटत असल्यास ते पुन्हा एकदा गरम करून गाळून घ्या. अशा प्रकारे तूप दीर्घकाळ वापरता येते.

भाजीसोबत फुकट मिळणारी 'ही' पानं वेट लॉससाठी बेस्ट; चमचाभर चटणी रोज खा; पोटाची चरबी झरकन घटेल

मध

असे म्हटले जाते, मध जितके जुने, तितके फायदेशीर ठरते. आपण अधिक दिवस साठवून ठेवलेला नैसर्गिक मध खाऊ शकता. पण आजकाल मधामध्येही भेसळ केली जाते. ज्यामुळे मध लवकर खराब होते. त्यामुळे मध खरेदी करताना काही खबरदारी घेणं गरजेचं आहे.

व्हिनेगर

व्हिनेगर कितीही जुना झाला तर लवकर खराब होत नाही. आपण वर्षानुवर्षे व्हिनेगर वापरु शकता. लोणचे बनवण्यासाठी किंवा खाद्यपदार्थांमध्ये आपण व्हिनेगर वापरू शकता. अधिक काळ व्हिनेगर टिकावे म्हणून रेफ्रिजरेटरमध्ये साठवून ठेवा.

लोणचे

व्हिनेगरप्रमाणे लोणचेही कधीच खराब होत नाही. लोणचे चांगले ठेवले तर वर्षानुवर्षे खराब होत नाही. लोणचे खराब होऊ नये म्हणून, उन्हामध्ये ठेवा. लोणच्यामध्ये आपण त्यात मोहरीचे तेल घालूनही गरम करू शकता. यामुळे लोणचे वर्षानुवर्षे खराब होणार नाही.

चपाती खाऊन वजन वाढतं? 'या' पिठाच्या चपात्या खा; वेट लॉस होईल - भुकेवरही राहील कंट्रोल

मीठ

मसाले कधी कधी खराब होतात पण मीठ लवकर खराब होत नाही. मिठाच्या पॅकेजवर एक्सपायरी डेट लिहिली असली तरी, ते लवकर खराब होत नाही. योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने मीठ साठवून ठेवल्यास मीठ लवकर खराब होत नाही. मीठामध्ये ओलसरपणा नसल्यास, आपण ते कितीही दिवस वापरू शकता.

Web Title: 5 Kitchen Ingredients That Do Not Expire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.