Join us  

सकाळी कामाच्या गडबडीत नाश्ता करायला वेळ नाही? खा ५ हेल्दी पदार्थ, पोट भरेल - राहाल फिट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2024 8:34 PM

Easy & Quick Tiffin Recipes For Working Women Must Try Once : 5 Min Healthy Breakfast Recipes for the week For Working Women : कामाच्या गडबडीत नाश्ता स्किप होतो, अशावेळी फिट राहण्यासाठी खावेत असे खास पदार्थ...

वर्किंग वुमन असो किंवा गृहिणी दिवसभराच्या कामात सगळ्याचजणी फार बिझी असतात. घरच्या स्त्रीला घराची तसेच इतरही अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या एकदम एकाचवेळी पार पाडाव्या लागतात. यात तिला तिचा असा स्वतःसाठी थोडाही वेळ मिळत नाही. या सगळ्या कामात आणि जबाबदाऱ्यांमध्ये तिचे नेहमी स्वतःकडे फार दुर्लक्ष होते. कौटुंबिक ते ऑफिसपर्यंतच्या असंख्य जबाबदाऱ्या रोज पार पाडत असताना त्या स्त्रीला तिच्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला   फार कमी वेळ मिळतो. असे असले तरीही जर स्वतः निरोगी राहून ऑफिसचे काम आणि घरातील जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या असतील, तर निरोगी आहाराचे पालन करणे फार महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही दिवसभर जे काही खात आहात त्याच्या पौष्टिकतेकडे लक्ष देणे गरजेचे असते(Easy & Quick Tiffin Recipes For Working Women Must Try Once).

काहीवेळा सकाळच्या कामाच्या गडबडीत सकाळचा नाश्ता करण्यासाठी पुरेसा वेळ आपल्याकडे नसतो. अशावेळी झटपट काहीतरी पदार्थ नाश्त्यासाठी तयार करता येतील तसेच ते आपल्या आरोग्यासाठी तितकेच पौष्टिक असतील. सकाळच्यावेळी नाश्ता, टिफिन घरातील इतर काम आवरणे यात आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही. अशावेळी आपण काही झटपट तयार होणारे इन्स्टंट पण तितकेच हेल्दी पदार्थ नाश्त्याला करु शकतो. असे हेल्दी पदार्थ खाऊन आपण स्वतःसोबतच घरातील सगळ्यांच्याच आरोग्याची काळजी घेऊ शकता. यासोबतच हेल्दी नाश्ता केल्याने आपल्या आरोग्याला आवश्यक अशी पोषक तत्व देखील मिळतात(5 Min Healthy Breakfast Recipes For The Week For Working Women).

झटपट करता येतील असे इन्स्टंट पण पौष्टिक पदार्थ... 

१. कटलेट आणि टिक्की :- कटलेट आणि टिक्की हा एक अतिशय सोपा आणि इन्स्टंट तयार होणारा पदार्थ आहे. आपण आदल्या रात्रीच टिक्की किंवा कटलेट्सचे बॅटर तयार करून फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवू शकता. तुम्ही पोह्यांची टिक्की, मिक्स व्हेज कटलेट, बीटरूट कटलेट, राजमा टिक्की, मटर पनीर टिक्की, साबुदाणा टिक्की, रताळ्याची टिक्की, दही कबाब, ओट्स मूग डाळ टिक्की, पालक कॉर्न चीज कटलेट असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कटलेट्स टिक्की तयार करु शकता.  त्याचबरोबर उरलेल्या भातामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून  तुम्ही अगदी सहज त्याचे कटलेट बनवू शकता.  

फक्त १ कप सीताफळाचा गर वापरून १० मिनिटांत करा सीताफळ फ्रुट क्रिम, मुलांसाठी खास पदार्थ...

२. आंबवलेले पदार्थ :- इडली, मिनी इडली, व्हेज फ्राईड इडली, उत्तपम, डोसा हे आंबवलेले पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हे फरमेंटेड केलेले पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे पीठ तुम्ही एकदाच जास्त प्रमाणात तयार करुन फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवू शकता. त्याचबरोबर जेव्हा पाहिजे तेव्हा फ्रिजमधून थोडे आधी काढून रुम टेम्परेचरला आणून मग त्यापासून इडली, डोसा, अप्पे असे अनेक पदार्थ नाश्त्याला करु शकता. 

३. भात :- भात हा सकाळच्या नाश्त्याला एक उत्तम पर्याय आहे. भातामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून त्याला अधिक पौष्टिक करु शकतो. मटार पुलाव, राजमा राइस, लेमन राईस, फ्राईड राईस, जीरा राइस किंवा दही राईस हे झटपट आणि इन्स्टंट तयार होणारे भाताचे हेल्दी पर्याय आहेत. 

मेथीचा थेपला दोन-तीन दिवसांनीही मऊ राहण्यासाठी ६ टिप्स- थेपला राहील मऊ-लुसलुशीत!

४. पराठा :- पराठा हा सकाळच्या घाईगडबडीतही झटपट होणारा एक सोपा पर्याय आहे. पराठा तयार करताना आपण त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा अनेक डाळींची पीठ वापरुन पराठा अधिक पौष्टिक करु शकतो. पराठ्याच्या आत लागणारे स्टफिंग आपण रात्रीच तयार करुन फ्रिजमध्ये स्टोअर करुन  ठेवू शकतो. सकाळी पटकन कणीक मळून त्यात ते स्टफिंग घालून झटपट तयार होणारे पराठे करु शकतो. आलू पराठा, पनीर पराठा, चीज पराठा, मेथी पराठा, पालक पराठा, असे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आपण तयार करु शकता.

 भाज्या लवकर शिळ्या - खराब होऊ नयेत म्हणून पाहा  सोपी पद्धत, आठवडाभर भाज्या राहतील एकदम फ्रेश... 

५. चिला :- आपण सकाळच्या नाश्त्याला वेगवेगळ्या प्रकारचे हेल्दी चिला तयार करुन खाऊ शकता. रवा ओट्स, दही चिला, मूग डाळ पालक चिला, नाचणी चिला, मूग डाळीचा चिला, ज्वारी चिला, ओट्स चिला, बेसन चिला किंवा क्विनोआ चिला हे अतिशय आरोग्यदायी नाश्त्याचे उत्तम पर्याय आहेत.

टॅग्स :अन्नआहार योजनास्त्रियांचे आरोग्य