Join us  

जेवताना तोंडी लावण्यासाठी ५ मिनिटांत करा लसणाची चमचमीत चटणी; १५ दिवस टिकणारी झटपट चटणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 4:09 PM

5 Minute Garlic Chutney ओली चटणी, सुकी चटणी, कांदा घालून, खोबरं घालून अशा वेगवेगळ्या पद्धतीनं लसणाची चटणी केली जाते.

जेवताना तोंडी लावणीसाठी लोणचं, मुरांबा, चटणी असं  काही असेल तर जेवणाची मजाच  वेगळी असते. जेवताना चटणींचे ऑपश्न्स  खाण्यासाठी असतील तर जेवणाची रंगत वाढते इतकंच नाही तर खाणारेही २ घास जास्त खातात. (How to make Lasan ki chutney) लसणाची चटणी बनवायला एकदम सोपी असते. ओली चटणी, सुकी चटणी, कांदा घालून, खोबरं घालून अशा वेगवेगळ्या पद्धतीनं लसणीची चटणी केली जाते. लसणाची झणझणीत चवदार चटणी बनण्याची सोपी रेसिपी पाहूया. (5 Minute Garlic Chutney)

लसणाची चटणी ५ मिनिटात कशी बनवायची

लसणाची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी कढईत तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात कांदे आणि लसूण तळून घ्या. एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला घाला.  चिंचेचा कोळ घालून एकत्र करा. हे मिश्रण ब्लेडरमध्ये काढून दळून घ्या. त्यानंतर कढईत हे मिश्रण घालून मोहोरी, जीरं, कढीपत्ताची फोडणी  घाला.  तयार आहे गरमागरम झणझणीत लसूण चटणी. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्य