Join us  

५ मिनिटांत करा चटपटीत टोमॅटोची चटणी; चपाती, भात कशाही बरोबर खा- सोपी, चवदार रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 2:05 PM

5 Minute Instant Tomato Chutney (5 minitat tomato chutney) : तुम्ही जेवणात चटण्यांशिवाय इतरही काही पदार्थांचा समावेश करू शकता.

वरण भाताबरोबर किंवा चपातीबरोबर नेहमीच्या भाज्यांपेक्षा काहीतरी वेगळं असेल तर किंवा तोंडी लावण्यासाठी काही पदार्थ असतील तर जेवणाची मजाच काही वेगळी. (Tomato Chutney Recipe) भारतीय जेवणाचे ताट हे चटण्यांशिवाय अपूर्ण आहे. तुम्ही जेवणात चटण्यांशिवाय इतरही काही पदार्थांचा समावेश करू शकता. (How to Make Tomato Chutney) टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी तुम्ही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. कमी तेलात आणि कमीत कमी साहित्यात हा चवदार पदार्थ तयार होतो.  

टोमॅटोची चटणी बनवण्याचे साहित्य (Instatnt Tomato Chutney Recipe)

1) मध्यम आकाराचे टोमॅटो- ५ ते ६

2) लसूण- ७ ते ८

3) तिळाचे तेल - १ टिस्पून

4) मध्यम आकाराच कांदा - १

5) हिरव्या मिरच्या - २

6) बारीक चिरलेली कोथिंबीर- १ ते २ टिस्पून

7) मीठ- चवीनुसार

8) काळी मिरी-  १ टिस्पून

9) लाल मिरची - १ ते २ टिस्पून

10) लिंबाचा रस- १ ते २ टिस्पून

इस्टंट टोमॅटोची चटणी बनवण्याची कृती (Tomatochi chatni kashi karaychi)

१) इस्टंट टोमॅटो चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या. टोमॅटो धुतल्यानंतर स्वच्छ पुसून घ्या आणि मधोमध काप. एका कढईत तेल घालून मंच आचेवर ठेवा. त्यात लसूण आणि चिरलेले टोमॅटो घाला. 

डोशाचं पीठ फुलत नाही? डाळ-तांदूळाच्या मिश्रणात हा पदार्थ घाला; मऊ-जाळीदार होतील डोसे

२) टोमॅटोचा आतला भाग खातल्या बाजूला असायला हवा. त्यानंतर कढईवर झाकण ठेवून शिजू द्या.  एक कांदा चिरा आणि  २ ते ३ मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.  

३) १० ते १५ मिनिटांनी झाकण काढून टोमॅटोचे साल अलगद काढून घ्या. त्यानंतर टोमॅटो उलट्या बाजूने शिजवून  घ्या. टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर एका ताटात काढून घ्या. 

ढाबास्टाईल चविष्ट दाल तडका १५ मिनिटांत घरीच करा, सोपी रेसिपी-पोट भरेल, मन भरणार नाही

४) टोमॅटो आणि लसूण व्यवस्थित मॅश करून घ्या. यात चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, मीठ, काळी मिरी पावडर घालून एकजीव करून घ्या. यात तुम्ही आवडीनुसार लिंबूही घालू शकता.  तयार आहे गरमागरम इंस्टंट टोमॅटोची चटणी ही चटणी तुम्ही भात, चपाती, भाकरी, पराठा कशाही बरोबर खाऊ शकता. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न