Lokmat Sakhi >Food > काकडीची कोशिंबीर खाऊन कंटाळा आलाय? ५ मिनिटात करा बीटाची पौष्टीक खमंग कोशिंबीर..

काकडीची कोशिंबीर खाऊन कंटाळा आलाय? ५ मिनिटात करा बीटाची पौष्टीक खमंग कोशिंबीर..

5-minute spicy & healthy cucumber salad बीट खाण्याचे अनेक फायदे आहेत पण नुसते उकडलेले किंवा कच्चे बीट आवडत नसेल तर ही कोशिंबीर.. खाऊन पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2023 01:54 PM2023-04-21T13:54:24+5:302023-04-21T13:55:09+5:30

5-minute spicy & healthy cucumber salad बीट खाण्याचे अनेक फायदे आहेत पण नुसते उकडलेले किंवा कच्चे बीट आवडत नसेल तर ही कोशिंबीर.. खाऊन पाहा

5-minute spicy & healthy cucumber salad | काकडीची कोशिंबीर खाऊन कंटाळा आलाय? ५ मिनिटात करा बीटाची पौष्टीक खमंग कोशिंबीर..

काकडीची कोशिंबीर खाऊन कंटाळा आलाय? ५ मिनिटात करा बीटाची पौष्टीक खमंग कोशिंबीर..

उन्हाळ्यात आपण अनेक प्रकारच्या कोशिंबीर खातो. त्यात काकडीची कोशिंबीर फार फेमस आहे. पण आपल्याला तिच - तिच कोशिंबीर खाऊन कंटाळा आला असेल तर, पौष्टीक व हटके बीटाची चटकदार कोशिंबीर करून पाहा. बीटाची कोशिंबीर आरोग्यासाठी  फायदेशीर तसेच खूप चवदार असते.

बीटमध्ये मुबलक प्रमाणात लोह आणि फॉलिक ऍसिड असते त्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते. यासह त्याचे अनेक फायदे शरीराला उपयुक्त ठरतात. बीटाची कोशिंबीर कमी साहित्यात, झटपट बनते. चला तर मग या चटकदार उन्हाळा स्पेशल बीटाची कोशिंबीरची कृती पाहूयात(5-minute spicy & healthy cucumber salad).

बीटाची कोशिंबीर करण्यासाठी लागणारं साहित्य

बीट

शेंगदाण्याचं कूट

अर्धा कप दही

तडका देण्यासाठी लागणारं साहित्य

ना चिक काढण्याची झंझट, ना जास्त मेहनत, आता घरीच करा रव्याची कुरडई, फुलते भरपूर

१ टेबलस्पून तेल

चिमुटभर हिंग

मोहरी

जिरं

हिरवी मिरची

कडीपत्ता

बीटाची कोशिंबीर करण्याची कृती

सर्वप्रथम, बीटाची साल काढून घ्या, साल काढून झाल्यानंतर त्याचा कीस तयार करा. कीस तयार झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात अर्धा कप शेंगदाण्याचं कूट, अर्धा कप दही, व चवीनुसार मीठ घालून मिश्रण मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यावर झाकून ठेऊन द्या.

परफेक्ट साऊथ इंडियन ‘कोकोनट चटणी‘ करण्याची रेसिपी, उडपीस्टाइल नारळ चटणी करा घरच्याघरी

तडका करण्यासाठी सर्वप्रथम, तडकाच्या भांड्यात तेल गरम करा, त्यात हिंग, मोहरी, जिरं, हिरवी मिरची, व कडीपत्ता घालून तडका द्या. हा तडका, बिटाच्या तयार मिश्रणात घालून मिक्स करा. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून कोशिंबीर मिक्स करा. अशा प्रकारे बीटाची खमंग कोशिंबीर खाण्यासाठी रेडी.

 

Web Title: 5-minute spicy & healthy cucumber salad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.