सायंकाळ झाली की छोटी भूक आपल्याला सतावते. चहासह काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. आपल्याकडे तोंडाला पाणी आणणाऱ्या स्नॅक्सची कमतरता नाही. समोसे, पकोडे, टिक्की सर्वत्र मिळतात. जर आपल्याला बाहेर जायचं कंटाळा आला असेल, अथवा घरगुती स्नॅक्स खाण्याची इच्छा होत असेल तर ५ प्रोटीनयुक्त स्नॅक्स बनवून पाहा. आपण डाळीपासून ५ पदार्थ बनवू शकता. चवीला उत्कृष्ट प्रोटीनयुक्त हे स्नॅक्स हेल्दी तर आहेच यासह "शाम की चाय यादगार" बनवेल यात शंका नाही.
मूग डाळ पकोडे
मुगाच्या डाळीपासून आपण पकोडे बनवू शकता. मूग डाळ हे प्रोटीनचे उत्तम स्रोत आहे. ही हेल्दी रेसिपी झटपट बनते. मूग डाळीला भिजवून त्यात आलं लसूण पेस्ट, मिरची, कांदा घालून मिश्रणाचे पकोडे तळून घ्या. या थंडीच्या मौसमात ही रेसिपी उत्तम लागते.
मूग डाळ समोसा
आपण बटाटे, मटार आणि अगदी पनीरपासून बनवलेले समोसे खाल्ले असतील, परंतु, मूग डाळीपासून बनवलेला समोसा क्वचितच खाल्ला असेल. यात आपण मूग डाळीचे मिश्रण भरून समोसा ट्राय करू शकता. चवीला उत्तम ही रेसिपी घरातील सदस्यांना नक्की आवडेल.
उडद डाळ कचोरी
राजस्थानमधील फेमस रेसिपी कचोरी संपूर्ण भारतात आवडीने खातात. या रेसिपीत आपण उडद डाळीचा ट्विस्ट देऊ शकतो. या उडद डाळीत मसाले मिक्स करून, कचोरीमध्ये सारण भरून खाऊ शकता. ही रेसिपी झटपट आणि चवीला उत्तम लागते.
चना बटाटा टिक्की
आलू टिक्की आपण सगळ्यांनीच खाल्ली असेल, या रेसिपीमध्ये आपण चना डाळीला मिक्स करून नवीन रेसिपी बनवू शकता. याने प्रोटीन आपल्याला शरीराला मिळेल. यासह स्नॅक्स म्हणून उत्तम पर्याय ठरेल.
मूग डाळ कबाब
कबाब आपण अनेक प्रकारचे खाल्ले असतील, आता मुगाच्या डाळीपासून कबाब बनवून पाहा. छोटी पार्टी अथवा गेट टुगेदरमध्ये ही रेसिपी रंगत आणेल. हा पदार्थ झटपट आणि चवीलाही उत्कृष्ट लागते.