Lokmat Sakhi >Food > मोड आलेल्या कडधान्यांचा कुबट वास येतो? ५ टिप्स; कडधान्य राहतील फ्रेश - मोडही येतील सुरेख

मोड आलेल्या कडधान्यांचा कुबट वास येतो? ५ टिप्स; कडधान्य राहतील फ्रेश - मोडही येतील सुरेख

5 Reasons Why Your Sprouts Smell Bad : कडधान्यांचा आंबट कुबट वास घालवण्यासाठी करून पाहा ५ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2024 03:31 PM2024-09-08T15:31:57+5:302024-09-08T15:33:11+5:30

5 Reasons Why Your Sprouts Smell Bad : कडधान्यांचा आंबट कुबट वास घालवण्यासाठी करून पाहा ५ टिप्स

5 Reasons Why Your Sprouts Smell Bad | मोड आलेल्या कडधान्यांचा कुबट वास येतो? ५ टिप्स; कडधान्य राहतील फ्रेश - मोडही येतील सुरेख

मोड आलेल्या कडधान्यांचा कुबट वास येतो? ५ टिप्स; कडधान्य राहतील फ्रेश - मोडही येतील सुरेख

कडधान्य खाण्याचे अनेक फायदे आहेत (Kitchen Tips). मोड आलेल्या कडधान्यात अनेक उपयुक्‍त घटक असतात. मुख्य म्हणजे यात 'क' जीवनसत्वे असतात. शिवाय यात  प्रथिनं, जीवनसत्वे, खनिजं असतात. ज्यामुळे आरोग्य उत्तम राहते (Sprouts). मोड आलेले कडधान्याचे आपण सॅलॅड किंवा उसळ तयार करून खातो. पण अनेकदा कडधान्यांना मोड येत नाही. किंवा घरात कडधान्य भिजत घातल्यानंतर त्याला कुबट वास येतो.

कुबट वासामुळे आपण कडधान्य फेकून देतो. कोणी खात नाही. जर भिजत घातल्यानंतर कडधान्याला कुबट वास येत असेल तर, एक ट्रिक करून पाहा. या ट्रिकमुळे कडधान्यातून कुबट वास येणार नाही. शिवाय चिकटपणामुळे कडधान्याची चवही बिघडणार नाही(5 Reasons Why Your Sprouts Smell Bad).

मोड आलेल्या कडधान्यातून कुबट वास येऊ नये म्हणून..

- मोड आलेल्या कडधान्याला कुबट - आंबट वास येत असेल तर, मिठाचा वापर करा. मिठाचा वापर आपण पदार्थाची चव वाढवण्यासाठी करतो. परंतु, याच्या वापराने कडधान्यातून कुबट वास येणार नाही.

पार्लरला जायला वेळच नाही? १० रुपयात फेशिअल करा घरीच; गणेश उत्सवात दिसाल मोहक

- यासाठी कडधान्य मिठाच्या पाण्यात काही वेळासाठी भिजत ठेवा. नंतर त्याच पाण्यात कडधान्य चोळून धुवून घ्या. असं केल्याने कडधान्यातून कुबट वास येणार नाही. शिवाय चिकटपणाही निघून जाईल.

-  कडधान्य चाळणीत किंवा भांड्यात भिजत घालत असाल तर, भांड्याखाली टिश्यू पेपर ठेवा. ज्यामुळे चिकटपणा शोषून घेतला जाईल. यासह वास येण्याचं प्रमाणही कमी होईल.

वारंवार घासूनही बर्नर कळकटच? ३ सोपे उपाय- बर्नर होईल साफ - सिलेंडरचीही होईल बचत

- फ्रीजमध्ये मागच्या बाजूला स्प्राऊट कंटेनर किंवा झिप-लॉक बॅग ठेवणे टाळा. फ्रिजचे तापमान काही वेळा मागच्या बाजूला थंड असते, ज्यामुळे अंकुर गोठू शकतात. कडधान्य गोठल्यानंतर त्याची चव खराब होऊ शकते. त्यामुळे फ्रीजमध्ये अधिक वेळ ठेवणं टाळा.

- कडधान्य नीट निवडून घ्या, अगोदरच खराब असलेली कडधान्ये भिजल्यावर अधिक कुजण्याचा धोका असतो. शिवाय चिकटपणामुळेही कडधान्याची चव बिघडते. 

Web Title: 5 Reasons Why Your Sprouts Smell Bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.