Join us  

स्वयंपाकाला फार तेल लागतं? ५ टिप्स- कमी तेलात भाज्या होतील चमचमीत, वडे-पुऱ्याही फुगतील टम्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2024 3:18 PM

5 smart ways to cook with less oil for your health's sake! : कमी तेलातही वडे-पुऱ्या तळायच्या काही युक्त्या

उन्हाळा असो किंवा हिवाळा. प्रत्येक ऋतूमध्ये आपण आवर्जुन भजी, वडे फ्राईड-क्रिस्पी पदार्थांचा आस्वाद घेतो. अगदी डाएट करणारी मंडळीही तळकट - मसालेदार पदार्थांवर ताव मारतात. पण जास्त तळकट पदार्थ आरोग्यासाठी योग्य नाही. यामुळे वजन तर वाढतेच, शिवाय बॅड कोलेस्टेरॉल, ब्लड शुगर आणि हृदयाच्या निगडीत समस्या वाढतात.

अनेकदा तळकट पदार्थ तेल अधिक शोषून घेतात. यामुळे पदार्थाची चव सुद्धा बिघडते (Cooking Tips). जर जिभेचे चोचले पुरवायचे असेल, शिवाय आजारांची लाईन मागे लावून घ्यायची नसेल तर, तळकट पदार्थ तयार करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. या टिप्समुळे भजी, वडे जास्त तेल शोषून घेणार नाही. शिवाय झटपट तळून क्रिस्पी तयार होतील(5 smart ways to cook with less oil for your health's sake!).

पॅनचा करा वापर

पदार्थ तळण्यासाठी आपण कढईचा वापर करतो. डीप फ्राय करताना पदार्थ जास्त तेल अॅब्सॉर्ब करण्याची शक्यता असते. ज्यामुळे पदार्थाची चव तर बिघडतेच, शिवाय पदार्थातून तेलाचा गंध ही येतो. त्यामुळे तळण्यासाठी कढईचा वापर न करता आपण  पॅनमध्ये पदार्थ फ्राय करू शकता. पॅनमध्ये तळताना पदार्थ जास्त तेल अॅब्सॉर्ब करत नाही.

डाळ-तांदूळ न भिजवता, कपभर रव्याचे करा इन्स्टंट ताकातले अप्पे..चवीला भारी-बनतील १० मिनिटात

कोटिंग

बरेच जण तळताना पदार्थाची कोटिंग जाडसर ठेवतात. उदारणार्थ बटाटे वडे तयार करताना आपण बेसनाचे सरसरीत बॅटर तयार करतो. पण काही जण बॅटर जाडसर ठेवतात. ज्यामुळे वडे लवकर तळून तयार होत नाही. शिवाय वडे जास्त तेल अॅब्सॉर्ब करतात. त्यामुळे बॅटर नेहमी पातळ ठेवा, कोटिंग जास्त जाडसर ठेवू नका.

भाज्या शिजवून घ्या

काही लोकं वांगी, बटाटे किंवा फ्लॉवरची भजी तयार करतात. बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवून आपण भजी तळतो. पण बऱ्याचदा भाज्या कच्च्या राहतात. त्यामुळे भजी तळण्यापूर्वी भाज्या शिजवून घ्या. यामुळे कमी तेलात भजी झटपट तयार होतील.

कांदवणी हा पारंपरिक पदार्थ तुम्ही खाल्ला आहे का? ५ मिनिटांत करा चमचमीत भाजी

तापमान तपासा

तळकट पदार्थ तळताना गॅसची फ्लेम नेहमी मध्यम किंवा कमी ठेवा. यामुळे पदार्थ कुरकुरीत तयार होतील. जर गॅसची फ्लेम हाय ठेवली तर, तेलाचे तापमान बिघडते, शिवाय पदार्थही करपतो. यासह व्यवस्थित शिजत नाही. जर पदार्थ कुरकुरीत तळून तयार व्हावे असे वाटत असेल तर, तळताना गॅसची फ्लेम कमी किंवा मध्यम ठेवा.

टिश्यू पेपर

आपण पदार्थ तळून झाल्यानंतर डायरेक्ट ताट किंवा एका बाऊलमध्ये काढून ठेवतो. पण पदार्थ तळून झाल्यानंतर एका टिश्यू पेपरवर काढून ठेवा. यामुळे पदार्थातील अतिरिक्त तेल टिश्यू पेपर अॅब्सॉर्ब करून घेईल. शिवाय पदार्थ अधिक वेळ कुरकुरीत राहील.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स