Lokmat Sakhi >Food > गरमागरम खिचडी वर साजूक तुपाची धार ! पाहा पौष्टिक खिचडी खाण्याचे ५ फायदे, पचायला हलका आहार...

गरमागरम खिचडी वर साजूक तुपाची धार ! पाहा पौष्टिक खिचडी खाण्याचे ५ फायदे, पचायला हलका आहार...

5 Surprising Health Benefits Of Eating Khichdi : तांदूळ व मुगाच्या डाळीपासून तयार केलेली खिचडी खाण्याचे फायदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2024 07:28 PM2024-08-08T19:28:21+5:302024-08-08T19:38:01+5:30

5 Surprising Health Benefits Of Eating Khichdi : तांदूळ व मुगाच्या डाळीपासून तयार केलेली खिचडी खाण्याचे फायदे...

5 Surprising Health Benefits Of Eating Khichdi | गरमागरम खिचडी वर साजूक तुपाची धार ! पाहा पौष्टिक खिचडी खाण्याचे ५ फायदे, पचायला हलका आहार...

गरमागरम खिचडी वर साजूक तुपाची धार ! पाहा पौष्टिक खिचडी खाण्याचे ५ फायदे, पचायला हलका आहार...

पिवळी मुगाची डाळ आणि तांदूळ यांपासून तयार केली जाणारी पिवळी खिचडी सगळ्यांना आवडते. कधी जेवणाचा कंटाळा आला किंवा कामाच्या गडबडीत झटपट स्वयंपाक करायचा असेल तर आपण शक्यतो खिचडी करतो. गरमागरम खिचडी त्यावर भरभरुन टाकलेलं तूप, सोबत लोणच्याची फोड, ताक, कुरकुरीत पापड असा बेत असेल तर आणखीन काय हवं ? खिचडी हा घरांतील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. करायला सोपी आणि पचायला हलकी असणारी ही बहुगुणी खिचडी खाण्याचे अनेक फायदे असतात. भारतीय आहारातील अनेक लोकप्रिय पदार्थांपैकी खिचडी हा सर्वात सर्वात जास्त खाल्ला जाणारा हेल्दी व टेस्टी पदार्थ आहे. डाळ आणि भात एकत्र शिजवून त्यात आपल्या आवडीनुसार साजूक तूप, भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जात असल्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी, झटपट होणारी व रुचकर असते(5 Surprising Health Benefits Of Eating Khichdi).

एखादी व्यक्ती आजारी पडली की त्या व्यक्तीला हमखास मूगाची खिचडी खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. कारण अशक्तपणा, अपचनाच्या त्रासात मूगाची खिचडी विशेष फायदेशीर ठरते. परंतु, खिचडी ही फक्त आजारी व्यक्तींसाठीच फायदेशीर नसून लहानपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनीच खिचडीचा आहारात समावेश करणं आवश्यक असतं. अनेक पोषक तत्वांसोबतच पचण्यास हलकी असणारी ही खिचडी खाण्याचे अनेक फायदे कोणते आहेत ते पाहूयात.  

खिचडी खाण्याचे फायदे कोणते आहेत ? 

१. पोषक तत्वांचे प्रमाण अधिक असते :- कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, कॅल्शिअम, फायबर, मॅग्नेशियम आणि पोटेशियम यासारखी अनेक पोषक तत्वे खिचडी मध्ये असतात. विविध प्रकारच्या डाळी, तांदूळ आणि हिरव्या भाज्या, मसाले मिसळून खिचडी तयार केली जाते, त्यामुळे खिचडीला अनेक पोषक तत्वांचे पॉवर हाऊस म्हणता येईल. अशाप्रकारे खिचडी ही पौष्टिक पूर्णान्न असा पदार्थ आहे. 

२. पचायला हलकी असते :- खिचडी ही पचायला अतिशय हलकी असते. पोटाच्या समस्या असलेल्यांसाठी खिचडी खाणे खूप फायदेशीर असते. जिरे, हळद, आले आणि लसूण यांसारख्या मसाल्यांचा वापर करुन खिचडी तयार केली जाते. ज्यामध्ये दाहक - विरोधी गुणधर्म असतात जे पचनसंस्थेला आराम देतात. यासाठीच खिचडीला नेहमी निरोगी अन्न म्हणून मानले गेले आहे. खिचडी योग्य पचन राखण्यास मदत करते. ज्यमुळे आपल्या पोटाचे आरोग्य चांगले राहते आणि यामुळे आपण आजारांना बळी पडत नाही. 

ब्रेड  शिळा झाला म्हणून फेकून देता? ३ भन्नाट ट्रिक्स, शिळा ब्रेड होईल फ्रेश - आणि खाताही येईल पटकन...

३. ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे :- खिचडीमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते, जे रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते. हे इन्सुलिनची पातळी नियंत्रित करते आणि टाइप - २ मधुमेहाचा धोका कमी करते. 

४. वजन कमी करण्यास फायदेशीर असते :- खिचडीमध्ये असणारे फायबर, प्रथिन आणि कर्बोदकांमुळे खिचडी खाल्ल्याने आपले पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते. तृप्ततेची भावना निर्माण करते आणि अतिरिक्त भूक टाळण्यास मदत करते, जे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते. खिचडी खाल्ल्याने आपले पोट बराच वेळ भरलेले राहते यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. यामुळे आपले वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. 

५. वात, पित्त आणि कफ दोष दूर होतात :- आपल्या रोजच्या आहारात खिचडीचा समावेश केल्याने वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचे संतुलन साधण्यास मदत होते. एवढेच नाही तर शरीराला डिटॉक्सिफाय करण्याबरोबरच ते आपल्या शरीराची ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी आणि रोग प्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते.

नागपंचमी स्पेशल : हळदीच्या वाफाळत्या पातोळ्या, दिंड- गव्हाची खीर, पारंपरिक गरमागरम पदार्थ - तुम्ही कोणता करणार?

 

Web Title: 5 Surprising Health Benefits Of Eating Khichdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.