'वांग' हे जवळपास सगळ्याच घरात अतिशय आवडीने खाल्लं जात. वांग्याचे अनेक पदार्थ केले जातात. वांग्याची भाजी, वांग्याचे काप, भरली वांगी, वांग्याचे भरीत असे एक ना अनेक पदार्थ वांग्यापासून तयार केले जातात. वांग्याचे असे अनेक पदार्थ करताना आपण अगदी हौसेने बाजारांतून वांगी आणतो. ही गडद जांभळ्या रंगाची वांगी दिसायला इतकी सुंदर असतात की कधी आपण त्या वांग्याचे काहीतरी बनवून खातो असे अनेकांना होतेच. अनेकदा बाजारांत विकण्यासाठी ठेवलेली जांभळी चमकदार वांगी बघून आपण ती लगेच खरेदी करतो. परंतु काहीवेळा अशी बाहेरुन दिसायला चांगली असणारी वांगी आतून खराब असतात(How to find good brinjal).
बाहेरून अगदी चांगल्या दिसणाऱ्या या वांग्यात आतून किडे असतात तर कधी हे आतून कुजलेले असते. अशा परिस्थितीत, ते विकत आणलेले वांगे फेकून देण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. यामुळे बाजारांत वांगी विकत घेतानाच आपण जर थोडीशी काळजी घेतली तर ही समस्याच उद्भवणार नाही. यासाठी बाजारांत वांगी विकत घेताना काही विशेष गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. काही सोप्या टिप्स फॉलो करुन आपण अगदी सहजपणे ओळखू शकतो की वांग आतून चांगले आहे की नाही. या टिप्स फॉलो केल्याने वांग आतून कसं निघणार आहे ते तुम्हाला आधीच समजू शकते(5 Things to Look for When Buying Eggplant at the Grocery Store).
वांगे आतून खराब आहे की चांगले हे कसे ओळखावे ?
१. वांग्याचा रंग तपासावा :- वांग खरेदी करताना सर्वात आधी त्याचा रंग तपासून पाहा. जर वांग्याचा रंग फिका असेल तर असे वांगे घेऊ नये. त्याचबरोबर जर वांग्यावर बाहेरुन सुरकुत्या पडल्या असतील तर अशी वांगी आतून खराब असतात. ही वांगी खूप दिवसांपासून स्टोअर करुन ठेवलेली असतात. त्यामुळे अशी वांगी घेणे शक्यतो टाळावे. फक्त गडद रंग आणि गुळगुळीत-चमकदार साल असलेलीच वांगी खरेदी करा, अशी वांगी नेहमी ताजी असतात.
साखर आणि मैदा अजिबात न वापरता करा विकतसारखा चोको लाव्हा केक, मुलांच्या आवडीचा खास पदार्थ...
२. वांग्याला छिद्र किंवा तडे नसावेत :- वांग खरेदी करण्याआधीच ते कुठेही चिरलेलं किंवा त्याला छिद्र पडलेलं नाही हे तपासून घ्या. कारण अशा वांग्यांमध्ये किडे असण्याची शक्यता असू शकते. वांगी खरेदी करण्यापूर्वी, सर्व बाजूंनी काळजीपूर्वक पहा आणि जर तुम्हाला छिद्र किंवा भेगा दिसल्या नाहीत तरच अशी वांगी खरेदी करा. यासोबतच कायम देठ असलेलीच वांगी खरेदी करा.
३. मऊ वांगी घेऊ नका :- वांगी खरेदी करताना ती आधी हातांनी दाबून पाहावीत. जर वांगी थोडी कडक असतील तरच अशी वांगी विकत घ्यावी. दाबल्यानंतर जर वांगी हाताला मऊ लागत असतील तर वांगी खरेदी करु नये, अशी वांगी आतून खराब निघण्याची शक्यता असते. मऊ वांगी आतून लवकर खराब होऊ शकतात आणि त्यात किडेही असू शकतात. ही मऊ वांगी दीर्घकाळासाठी स्टोअर करुन ठेवता येत नाही, म्हणून नेहमी काळजीपूर्वक तपासल्यानंतरच थोडी कडक असणारी वांगीच खरेदी करा.
मसाला एक भाज्या अनेक ! फक्त ३ पदार्थ वापरुन करा मल्टीपर्पज मसाला, ग्रेव्ही होईल चविष्ट...
४. वांग्याचे वजन :- वांग्याचे वजन करून, बिया कमी आहेत की नाही हे कळू शकते. जर वांगी वजनाने हलकी असतील तर ती आतून चांगली असतात. पण याउलट जर ती वजनाने जड असेल तर त्यात खूप बिया असू शकतात. अशा वांग्याची चवही चांगली नसते. कधीकधी जड वांग्यांमध्येही किडे येतात, त्यामुळे नेहमी वजनाने हलकी वांगी खरेदी करा.
५. वांग्याचा आकार :- खूप मोठ्या आकाराची वांगी विकत घेतल्यास त्यात अधिक बिया असण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी मध्यम किंवा लहान आकाराचीच वांगी खरेदी करा.