कुरकुरीत खमंग डोसा हा अनेकांच्या आवडीचा. बच्चे कंपनीपासून मोठ्या मंडळींपर्यंत सगळ्यांनाच तो आवडतो. त्यामुळे अगदी हौशेने डोसा करण्याचा बेत आखला जातो. पण शेवटी जे व्हायचं तेच होतं आणि डोसा तव्यावर चिकटू लागतो. कधी कधी तर वाटीने किंवा चमच्याने तव्यावर पसरवताना फाटून जातो आणि काही ठिकाणी जाड तर काही ठिकाणी फाटलेला दिसू लागतो. असे अतरंगी डोसे पाहिले की मग ते खाण्याची इच्छाही निघून जाते आणि जेवणाचा सगळाच पचका होतो. (5 tips for making delicious crispy dosa)
बऱ्याचदा असंही होतं की डोसा करण्यासाठी आपण जे पीठ भिजवलेलं असतं, ते अगदी परफेक्ट असतं. डाळ- तांदूळाचं माप आपण अगदी अचूक घेतलेलं असतं. किंवा कधी कधी तर पीठ विकतचंही असतं.
करिनासोबत व्यायाम करतोय तिचा छोटा मुलगा जेह.. बघा दोघांचा सुपरक्यूट व्हायरल व्हिडिओ
पण असं असूनही एखादीला त्याच पिठाचे उत्तम डोसे जमतात आणि त्याचवेळी आपले मात्र सगळेच फेल ठरतात. अनेकदा तर नॉनस्टिक पॅन घेऊनही उपयोग होत नाही. याचं कारण म्हणजे आपण डोसा करताना नकळत काही चुका करतो. याच चुका टाळण्यासाठी आणि अगदी हॉटेलसारखे परफेक्ट कुरकुरीत, खमंग डोसे करण्यासाठी या काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून बघा.
तव्यावर न चिकटणारा खमंग- कुरकुरीत डोसा करण्यासाठी....
१. ज्या तव्यावर डोसा करणार आहात, तो एकदा स्वच्छ घासून घ्या. अनेकदा तवा खराब असल्यानेही डोसा जमत नाही.
२. तवा जेव्हा चांगला तापेल तेव्हा त्याच्यावर सगळ्या बाजूने साधारण एक टेबलस्पून तेल सोडा. नंतर गॅस बंद करा. वाफा निघू लागल्या की तेल सावकाशपणे कपड्याने पुसून घ्या. त्यानंतर मग पुन्हा गॅस चालू करा.
तिशी येताच त्वचेवर सुरकुत्या दिसू लागल्या? आल्याचा फेसपॅक लावून पाहा.. पिंपल्सही होतील कमी
३. यानंतर तेलकट झालेल्या तव्यावर पाणी शिंपडा आणि नंतर गॅस मंद आचेवर असतानाच त्यावर पीठ टाकून ते अलगद गोलाकार फिरवा.
४. खूप गरम तवा असेल किंवा गॅस मोठा असेल तरीही डोसा चिकटून बसतो किंवा फाटतो.
५. डोसा तव्यावर टाकल्यानंतर त्याच्या गोलाकार तेल सोडावे.