Lokmat Sakhi >Food > दिवाळीत फराळाचे पदार्थ तळताना लक्षात ठेवा ५ टिप्स - तेलही फार उरणार नाही - पदार्थही तळून होतील खमंग मस्त...

दिवाळीत फराळाचे पदार्थ तळताना लक्षात ठेवा ५ टिप्स - तेलही फार उरणार नाही - पदार्थही तळून होतील खमंग मस्त...

5 tips to keep in mind while frying snacks on Diwali : दिवाळीतील फराळ तळताना तो परफेक्ट तळून त्याला योग्य तो रंग व चव येण्यासाठी खास टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2023 05:47 PM2023-11-09T17:47:08+5:302023-11-09T18:03:49+5:30

5 tips to keep in mind while frying snacks on Diwali : दिवाळीतील फराळ तळताना तो परफेक्ट तळून त्याला योग्य तो रंग व चव येण्यासाठी खास टिप्स...

5 tips to keep in mind while frying snacks on Diwali, Diwali Faral Frying Tips, How to minimize the absorption of oil while deep frying | दिवाळीत फराळाचे पदार्थ तळताना लक्षात ठेवा ५ टिप्स - तेलही फार उरणार नाही - पदार्थही तळून होतील खमंग मस्त...

दिवाळीत फराळाचे पदार्थ तळताना लक्षात ठेवा ५ टिप्स - तेलही फार उरणार नाही - पदार्थही तळून होतील खमंग मस्त...

दिवाळी (Diwali 2023) आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. सगळ्यांच्या घरी दिवाळीच्या फराळ बनवण्याची लगबग सुरु असेलच. काहींच्या घरी तर फराळाचे सगळे पदार्थ बनून तयार असतील, तर काहीजण अजून फराळ बनवत असतील. वर्षभरातून एकदा येणाऱ्या या दिवाळीला फराळ हा आवर्जून बनवला जातोच. फराळ म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे गोडधोड, तिखट, मसालेदार पदार्थ आलेच. सगळ्यांकडेच फराळ करण्याचा मोठा घाट घातला जातो. फराळ करण्यापूर्वी सर्व जिन्नस बनवण्यासाठी तयारी करावी लागते. ही फराळ बनवण्याची पूर्व तयारी केलेली असेल तर फराळ झटपट बनून तयार होतो(5 tips to keep in mind while frying snacks on Diwali)

फराळ करायचा म्हटलं की तळण हे आपसूक आलंच. फराळातील एकूण सगळेच पदार्थ हे तळणीचे असतात. तळणाशिवाय फराळ होणे शक्यच नाही. चकली, चिवडा, शंकरपाळे, करंजी, चिरोटे असे अनेक फराळाचे पदार्थ हे तळणीचेच असतात. हे पदार्थ तळताना खूप काळजी घ्यावी लागते. फराळाचे पदार्थ हे योग्य पद्धतीने तळून काढले तरच ते चवीला व दिसायला उत्तम लागतात. जर का फराळ बनवताना तळणात काही लहान - सहान चुका झाल्या तर तो पदार्थ आपल्याला हवा तसा बनत नाही. काहीवेळा हे पदार्थ अधिक तळले गेले तर करपून त्यांची चव बिघडते, याउलट जर ते तळताना नीट तळले गेले नाही तर कच्चे राहतात. यासाठी दिवाळीचे पदार्थ (Diwali Faral Frying Tips) बनवताना तळणाच्या काही महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवूयात(How to minimize the absorption of oil while deep frying).

फराळ बनवताना तळणाच्या कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्यात ? 

१. चिरोटे किंवा शंकरपाळे तळताना गॅसची आच मध्यम ठेवावी. हे दोन्ही पदार्थ तळताना तेल मध्यम गरम असावे. एकदम कडकडीत गरम तेल केल्यास चिरोटे, शंकरपाळे, यांसारखे पदार्थ करपून खराब होऊन फुटू शकतात किंवा त्यांचा रंग बदलू शकतो. 

२. आपण कोणतीही गोष्ट तळतो तेव्हा कढईत पुरेशा प्रमाणात तेल घ्यायला हवे. जो पदार्थ तळणार आहोत तो पूर्णपणे या तेलात बुडला जायला हवा. तसेच एखादा पदार्थ तेलात तळत असताना त्याच्या बाजुने बुडबुडे आले की मगच तो पदार्थ उलटा करावा आणि दुसऱ्या बाजूने तळावा. तसेच पदार्थ तळून झाल्यानंतर कढईतून बाहेर काढताना तेल पूर्ण निथळले जाईल याची काळजी घ्यायला हवी.

ना भाजणी बनवायचे टेंन्शन, ना तेलात चकली विरघळण्याची झंझट, १० मिनिटात करा, स्पिन्याच बटर चकली...

कोण म्हणतं बुंदीचा लाडू घरी करणं जमतच नाही ? ही घ्या सोपी रेसिपी - करा बुंदीचे लाडू आता घरी...

३. चकली, शेव, शंकरपाळे किंवा फराळाचा इतर कोणताही पदार्थ तळताना त्याला येणाऱ्या रंगाची विशेष काळजी घेतली पाहिजे. चकली, शेव, शंकरपाळे तळताना आपण साधारण त्याचा गुलाबीसर रंग आला की अजून थोडे तळूया असा विचार करून ते पदार्थ तसेच कढईत ठेवून तळतो. परंतु हे चुकीचे आहे, कोणताही तळणीचा पदार्थ तळताना त्याला हलका गुलाबी किंवा लालसर रंग आल्यावर तो पदार्थ कढईतून बाहेर काढून घ्यावा. आपण बरेचदा तो पदार्थ आणखीन तळून घेतो त्यामुळे असे पदार्थ तेलातून बाहेर काढल्यावर त्याचा रंग बदलून ते गडद रंगाचे होतात. पदार्थ हलका गुलाबी रंगाचा झाल्यास तो काढून घ्यावा, काढून  त्यात जास्तीचे तेल हे असतेच तसेच त्या पदार्थात उष्णता देखील असते त्यामुळे कढईतून बाहेर काढल्यानंतर तो पदार्थ तळणाची प्रक्रिया ही थोड्याफार प्रमाणात सुरुच असते. त्यामुळे पदार्थ हलका गुलाबी झाल्यावर कढईतून बाहेर काढून घ्यावा. 

४. योग्य आकाराची कढई असेल तर त्यात तेल फारसे उरत नाही. अशा तेलात गरम पाणी घालून ते टाकून द्यावे किंवा झाडांना घालावे. मात्र हे तेल परत वापरणे योग्य नाही. मात्र तूपामध्ये तळत असाल तर हे तूप कणीक भिजवायला किंवा पराठ्यांना लावायला आपण निश्चितच वापरु शकतो.

फराळाची राणी नाजूक चंपाकळी ! पारंपरिक सुंदर गोड पदार्थ दिवाळीत करा नक्की, पाहा रेसिपी...

आता अनारसे फसणार नाहीत तर हसणार ! कुरकुरीत, जाळीदार, हलके - फुलके अनारसे होतील सहज सोपे...

५. चकली, शेव, शंकरपाळे असे पदार्थ तळून झाल्यावर आपण जेव्हा हे पदार्थ कढईतून बाहेर काढून खातो, तेव्हा ते पदार्थ मऊ लागतात. या पदार्थांचा रंग जरी अतिशय चांगला खरपूस आला असेल तरीही ते खाताना मऊ लागतात म्हणून आपण ते पुन्हा तळतो. परंतु अशी चूक करु नका. हे पदार्थ जेव्हा आपण कढईतून बाहेर काढतो तेव्हा देखील त्यात असणाऱ्या गरम तेलामुळे आत तळण्याची प्रक्रिया सुरुच असते. त्यामुळे हे पदार्थ थोडे थंड होऊ द्यावे. जसजसे हे तळणीचे पदार्थ थंड होतात तसे ते कुरकुरीत व खुसखुशीत होतात.

Web Title: 5 tips to keep in mind while frying snacks on Diwali, Diwali Faral Frying Tips, How to minimize the absorption of oil while deep frying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.