जेवण बनवणं वाटतं तेव्हढं सोपं नाही. छोट्या छोट्या चुका स्वयंपाकासाठी महागात पडू शकतात. यामुळे अन्नाची चव बिघडते आणि घरातील माणसं व्यवस्थित न जेवल्यामुळे अन्न वाया जातं. जेवण बनवताना जर तुम्ही कढईत किंवा कुकरमध्य चुकून जास्त मीठ घातलं नंतर पदार्थाची चवही बिघडू शकते.(How to Neutralize Salt in Food)
जर तुम्ही पहिल्यांदाच स्वंयपाक बनवत असाल अशी चूक होण्याची शक्यता असते. एकवेळ मीठ कमी पडलं तर पुन्हा ते वरून घालता येतं. पण जास्त मीठ झाल्यानंतर ऐनवेळी ते पदार्थाची चव कशी बदलायची हेच कळत नाही. काही सोपे किचन हॅक्स तुम्ही ट्राय करू शकता. (Easy five hacks to reduce excess salt from food)
जेवणात जास्त मीठ पडलं तर काय करायचं?
जेवणात मीठ जास्त झालं तर त्याची चव बिघडू नये म्हणून तुम्ही त्यात लिंबू किंवा एप्पल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) घालू शकता. हे दोन्ही उत्तम पर्याय आहेत. पण अनेकदा लिंबू आणि व्हिनेगर घातल्यानं पदार्थाची चव बिघडू शकते. तुम्ही दुसरे उपायही करून पाहू शकता.
विकतसारखे खारे शेंगदाणे घरीच करा झटपट, गरमागरम खारे शेंगदाणे खाण्याची मजाच काही और
टोमॅटो
टोमॅटोचा अनेक भाज्यामध्ये चव वाढवण्यासाठी वापर केला जातो. टोमॅटोमुळे पदार्थाला आणखी चव येते. जास्त मीठामुळे चव बिघडल्यास तुम्ही भाजीत टोमॅटो घालू शकता किंवा टोमॅटो सॉस घाला.
मसाले
जर तुम्ही जेवणात चुकून मीठ जास्त घातलं असेल तर तुम्ही त्या भाजीत किंवा डाळीत अजून पाणी घालून मसाले एड करू सकता. यामुळे मीठाची खारट चव लागणार नाही. पदार्थांची चव बॅलेंन्स होईल.
तांदूळ
जेव्हा डाळ किंवा ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये जास्त मीठ पडतं आणि कोणताही उपाय सुचत नाही तेव्हा तुम्ही भात ओलसर करून त्याचे मध्यम आकाराचे गोळे करून काहीवेळासाठी भाजी किंवा डाळीत बुडवून ठेवा. थोड्यावेळाने तांदळाच्या गोळ्यानं मीठ शोषून घेतलेले असेल.
साबुदाणा वडे करताना पीठात १ पदार्थ घाला, वडे फुटणार नाहीत -तेलही पिणार नाहीत
कांद्याची पावडर
जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि पदार्थाचा खारटपणा कमी करण्यासाठी कांद्याची पावडर हा उत्तम पर्याय आहे. यासाठी कांदे चिरून याचे बारीक काप उन्हात सुकवा. सुकवलेला कांदा तळून मिक्सरला लावून पावडर बनवून घ्या. गरजेनुसार ही पावडर डाळ किंवा भाजीत घालून मिठाचं प्रमाण कमी करू शकता.