Lokmat Sakhi >Food > इवलेसे लालचुटुक फळं पण आरोग्यासाठी ठरते वरदान ! पाहा चेरी खाण्याचे ६ फायदे...

इवलेसे लालचुटुक फळं पण आरोग्यासाठी ठरते वरदान ! पाहा चेरी खाण्याचे ६ फायदे...

6 Impressive Health Benefits of Cherries : 6 Amazing Benefits Of Eating Cherries : लाल रंगाचे हे नाजूक फळ देते आपल्याला भरपूर ताकद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2024 09:14 AM2024-07-12T09:14:47+5:302024-07-12T09:15:01+5:30

6 Impressive Health Benefits of Cherries : 6 Amazing Benefits Of Eating Cherries : लाल रंगाचे हे नाजूक फळ देते आपल्याला भरपूर ताकद...

6 Amazing Benefits Of Eating Cherries All the Health Benefits of Eating Cherries Impressive Health Benefits of Cherries | इवलेसे लालचुटुक फळं पण आरोग्यासाठी ठरते वरदान ! पाहा चेरी खाण्याचे ६ फायदे...

इवलेसे लालचुटुक फळं पण आरोग्यासाठी ठरते वरदान ! पाहा चेरी खाण्याचे ६ फायदे...

लालचुटुक चेरी ही सर्व फळांमध्ये आकाराने सर्वात लहान असणारे फळं आहे. पावसाळा सुरु झाला की, मार्केटमधील ठेले या लालचुटुक फळांमुळे अधिकच आकर्षक व उठून दिसतात. चेरी हे फळ दिसायला जरी खूप छोटे असले तरी आरोग्यासाठी मात्र खूप गुणकारी आहे. साधारणपणे केक, आईस्क्रीम, पेस्ट्री  यांसारख्या गोड पदार्थांना सजवण्यासाठी या चेरीचा वापर केला जातो. शक्यतो आपण चेरी अशा गोड पदार्थांसोबतच खातो, खास विकत घेऊन अशी क्वचितच खातो(6 Impressive Health Benefits of Cherries).

चेरीमध्ये भरपूर पोषक घटक असतात, म्हणूनच चेरीचा समावेश आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या पदार्थांमध्ये केला जातो. लाल रंगाचे हे इवलुसे फळं अनेक पोषणयुक्त गुणांनी भरलेले आहे. चेरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते , म्हणून रोजच्या डाएटमध्ये चेरीचा अवश्य समावेश करणे गरजेचे आहे. चेरी खाल्ल्याने त्याचे आपल्याला नेमके कोणते फायदे होतात ते पाहूयात(6 Important Health benefits of cherries).

चेरी खाण्याचे नेमके फायदे कोणते आहेत ? 

१. त्वचा आणि केसांसाठी :- चेरीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, तांबे, लोह, मॅंगनीज, फॉस्फरस आणि कॅल्शियम सारखे अनेक पोषक असतात. हे पोषण तुमच्या निरोगी शरीरासाठी खूप महत्वाचे असते. चेरी खाल्ल्याने त्वचेला आणि केसांनाही फायदा होतो. चेरीमध्ये व्हिटॅमिन सी असते जे त्वचेसाठी खूप चांगले असते. शरीरातील पाण्याची कमतरता देखील व्हिटॅमिन सीद्वारे पूर्ण होते. चेरीमध्ये व्हिटामिन सी आणि भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडन्टस् असतात. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो. चेरी नियमित खाल्ल्यास चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाहीत. चेरीचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्याची त्वचा चमकदार बनते.

२. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी :- चेरीमध्ये असलेले व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. मजबूत रोगप्रतिकारक शक्ती असल्‍याने तुम्‍हाला संसर्ग आणि सामान्य रोगांचा धोका कमी होतो. चेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. अनेक आजारांवर चेरी ही गुणकारी आहे. चेरीमध्ये फायबर असते. हे आपल्या चयापचय क्रियेत मदत करते. चेरी पचन समस्यांसाठी देखील फायदेशीर आहे.

दिवसभरात किती कप कॉफी पिणं योग्य? सवय आणि स्ट्रेस म्हणून कॉफीचे मग रिचवत असाल तर..

३. स्ट्रेस कमी करण्यासाठी :- चेरीचे सेवन केल्याने तणाव कमी होतो. तुमच्या मानसिक आरोग्यासाठी हे सर्वोत्तम अन्न आहे. याच्या सेवनाने मेंदूतील मूड रिलेक्संट हार्मोन्स वाढतात. चेरीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे पचन सुधारण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही पुरेशा प्रमाणात फायबर खाता तेव्हा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर होतात. 

४. वजन कमी करण्यासाठी :- चेरीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन सी आणि फायबर असतात. ते वजन कमी करण्यात मदत करतात. आपण आपल्या आहारात चेरीचा समावेश करू शकता. चेरीमध्ये ७५% पाणी असतं आणि विशिष्ट प्रकारचे विरघळणारे फायबर असतात. चेरीतील फायबर हे शरीरातील फॅट्स शोषून घेतात. त्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत मिळते.

पावसाळ्यात आजारी पडून दवाखान्यात ॲडमिट व्हायचं नसेल तर करा ५ गोष्टी, आहारतज्ज्ञ सांगतात...

५. झोप येण्यासाठी फायदेशीर :- चेरीमध्ये मेलाटोनिन असते. हे झोपेच्या समस्येसाठी उपयुक्त आहे. जे झोपेच्या सायकलचे नियमन करते. निद्रानाशाचा त्रास असल्यास दररोज सकळी आणि संध्याकाळी चेरीचा एक ग्लास ज्यूस प्यायल्यास निद्रानाशापासून मुक्ती मिळते. 

६. हृदयरोगामध्ये फायदेशीर :- हृदयरोगासाठी चेरी खूप लाभदायी आहे. चेरीमध्ये झिंक, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, मँगनिज ही तत्वे असतात, जी आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात. यात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे चेरी हे फळ हृदयरोगासाठी आरोग्यदायी आहे.

Web Title: 6 Amazing Benefits Of Eating Cherries All the Health Benefits of Eating Cherries Impressive Health Benefits of Cherries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.