Join us

इडली- डोशाचं पीठ आंबविण्यासाठी वेळ लागतो? ६ टिप्स, ४ तासांतच होईल मस्त फर्मेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2025 17:00 IST

Cooking Tips For The Fast Fermentation Of Idli Dosa Batter: कधी कधी इडली डोशाचं पीठ लवकर आंबविण्याची खूपच गडबड असते. अशावेळी या ट्रिक्स तुमच्या नक्कीच उपयोगी येऊ शकतात...(how to speed up fermentation of idli dosa batter?)

ठळक मुद्देतुमच्याकडे जर खूप वेळ नसेल आणि तुम्हाला लवकर या पदार्थाचे फर्मेंटेशन करायचं असेल तर....

इडली, डोसा, उत्तप्पा, आप्पे हे दक्षिणात्य पदार्थ अनेक लोकांचे अतिशय आवडीचे. त्यामुळे सकाळी नाश्त्यामध्ये असो किंवा रात्री जेवणात असो, अनेक जण हे पदार्थ अगदी आवडीने खातात. हे पदार्थ करताना सगळ्यात जास्त वेळ घेणारी प्रक्रिया म्हणजे फर्मेंटेशन किंवा हे पदार्थ करण्यासाठी पीठ आंबविण्याची प्रक्रिया. पीठ व्यवस्थित फर्मेंट झालं तरच इडली- डोसा चांगला लागतो. पण तुमच्याकडे जर खूप वेळ नसेल आणि तुम्हाला लवकर या पदार्थाचे फर्मेंटेशन करायचं असेल (Cooking Tips For The Fast Fermentation Of Idli Dosa Batter) तर त्यासाठी खालील टिप्स नक्कीच उपयोगी येऊ शकतात.(how to speed up fermentation of idli dosa batter?)

 

इडली- डोशाचे पीठ लवकर आंबविण्यासाठी टिप्स 

१. भिजवलेले डाळ आणि तांदूळ जेव्हा तुम्ही मिक्सरमधून वाटाल तेव्हा त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घाला. यामुळे पीठ आंबविण्याची प्रक्रिया अधिक जलद होते. पण लक्षात ठेवा की पाणी खूप कडक असू नये. 

२. इडली आणि डोशाच्या पिठात १ ते २ चमचे दही घाला. दह्यामध्ये असणारे बॅक्टेरिया इडली आणि डोशाचं पीठ लवकर आंबविण्यासाठी मदत करतात. 

हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं? भरपूर लोह देणारी ७ फळं खा, शरीरातील रक्त वाढेल

३. इडली- डोशाचं पीठ जेव्हा तुम्ही आंबविण्यासाठी ठेवता, तेव्हा त्यात मीठ घालू नका. कारण मीठ घातल्यावर फर्मेंटेशनची क्रिया खूप हळूवार होते.

४. उडदाची डाळ भिजत घालतानाच त्यात चमचाभर मेथीचे दाणेही घाला. यामुळे पीठ आंबविण्याची प्रक्रिया अधिक जलद होते. 

 

५. ज्या भांड्यात तुम्ही पीठ ठेवलेलं आहे ते भांडं मायक्रोवेव्हमध्ये ठेवा आणि काही वेळासाठी मायक्रोवेव्ह सुरू करून त्यातला लाईट चालू ठेवा. त्या लाईटच्या उष्णतेमुळे पीठ लवकर आंबविण्यास मदत होते.

'लकी' म्हणून घरी आणलेलं बांबू प्लांट काही दिवसांतच सुकतं- पानं पिवळी पडतात? ४ सोप्या टिप्स

६. जर मायक्रोवेव्ह नसेल तर कुकरचा वापरही तुम्ही करू शकता. कुकर २ ते ३ मिनिटे गॅसवर ठेवून गरम करा. त्यानंतर गॅस बंद करा आणि त्या गरम झालेल्या कुकरमध्ये इडली- डोशाचं पीठ असणारं भांड ठेवा. कुकरचं झाकण लावून घ्या आणि ते घरातल्या एखाद्या उबदार जागेत ठेवा. कुकरच्या आतमध्ये जी उष्णता तयार होते त्यामुळे पीठ लवकर आंबतं.

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती