Join us  

पावसाळ्यात बिस्किट्स सादळू नयेत म्हणून ६ सोप्या टिप्स, बिस्किटं मऊ पडणार नाहीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2023 3:47 PM

6 Easy Tips To Maintain Crispiness Of Biscuits In Rainy Season : पावसाळ्यातला नेहमीचा प्रश्न, बिस्किटं लगेच सादळतात, मग खावीशी वाटत नाही त्यासाठी हे उपाय

धो - धो कोसळणाऱ्या पावसात मस्त घराच्या बाल्कनीमध्ये बसून गरमागरम वाफाळता चहा व बिस्कीट खाणे याहून मोठा आनंद नाही. आपण काहीवेळा सकाळच्या छोट्या नाश्त्यासठी चहा सोबत बिस्किट्स खाणे पसंत करतो. परंतु पावसाळ्यात वातावरणातील ओलाव्यामुळे व आर्द्रतेमुळे काहीवेळा बिस्किट्स मऊ पडते. अशी मऊ पडलेली बिस्किटस खाणे यात काहीच मजा नाही. एखाद्या बिस्कीट्सचा पुडा फोडला की त्यातील सगळीच बिस्कीट आपण एकाचवेळी खात नाही. अशी उरलेली बिस्कीट आपण एका डब्यांत भरून ठेवतो. परंतु पुन्हा पुढच्या वेळी जर आपण ही बिस्कीट खाण्यासाठी डबा उघडला तर ही बिस्कीट आपल्याला मऊ पडलेली दिसतात. 

ही मऊ पडलेली व सादळलेली बिस्कीट्स खाणे कुणालाही पसंत नाही. पावसाळ्यात बहुदा अनेक साठवणीचे पदार्थ हे खराब होतात. त्यांना बुरशी लागते किंवा ते मऊ पडू लागतात. त्यामुळे पावसाळ्यात, बिस्कीट्स, वेफर्स, चिवडा, शेव इत्यादी साठवणीचे पदार्थ खराब होऊ शकतात. असे पदार्थ मऊ पडले की ते सरळ फेकून देण्याशिवाय काही उपाय नसतो. अशावेळी काही सोप्या घरगुती टिप्स फॉलो केल्या तर बिस्कीट्स, वेफर्स, चिवडा यांसारखे पदार्थ पावसाळ्यात मऊ पडण्यापासून आपण त्यांना वाचवू शकतो(6 Smart ways to keep biscuits and cookies crispy in rainy weather).

पावसाळ्यात बिस्किट्स ओलाव्यामुळे मऊ पडू नयेत यासाठी काही खास टिप्स.... 

१. एअर टाईट कंटेनरचा वापर करावा :-  बहुतेक घरांमध्ये, बिस्किटे आणि कुकीज ठेवण्यासाठी प्लास्टिकचे बॉक्स किंवा अॅल्युमिनियम कंटेनर वापरतात. अशा स्थितीत ओलाव्यामुळे ते मऊ होतात आणि त्यांचा कुरकुरीतपणा संपतो. यासोबतच त्यांची चवही निरुपयोगी ठरते, त्यामुळे ते खाण्यास योग्य नसतात. अशा परिस्थितीत, बिस्किटे आणि कुकीज ठेवण्यासाठी एअर टाइट कंटेनर वापरणे चांगले. यामुळे ते बराच काळ कुरकुरीत राहतात.

महागडा सुकामेवा पावसाळ्यात सादळू नये म्हणून ४ टिप्स, बदाम-काजू-अंजीर टिकतील छान...

२. टिश्यू पेपर वापरा :- पावसाळ्यात बिस्किटे किंवा कुकीज कुरकुरीत राहण्यासाठी आपण टिश्यू पेपरचीही मदत घेऊ शकतो. यासाठी डब्यात बिस्किटे किंवा कुकीज ठेवण्यासाठी आधी टिश्यू पेपरचे दोन ते तीन थर पसरवा. यानंतर त्यात बिस्किटे किंवा कुकीज ठेवा आणि वरून टिश्यू पेपरचे काही थर लावून झाकून ठेवा. यानंतरच, कंटेनरचे झाकण घट्ट बंद करून ते व्यवस्थित स्टोअर करुन ठेवा. यामुळे ते बराच काळ कुरकुरीत राहतात.    

नॉनस्टिक भांड्यांचं कोटिंग भरपूर दिवस टिकावं म्हणून ५ टिप्स, भांडी राहतील वर्षानूवर्षे चांगली...

३. झिप पाउच उपयोगी पडेल :- आपण कुकीज आणि बिस्किटे साठवण्यासाठी झिप पाउच देखील वापरू शकता. हे झिप पाउच बिस्किटे आणि कुकीजला हवेच्या संपर्कात येण्यापासून रोखू शकता. त्यांना झिप पाऊचमध्ये ठेवल्याने ते ओलसर होत नाहीत आणि त्यांची चवही खराब होत नाही. जर झिप पाउच उपलब्ध नसेल तर आपण बिस्किटे आणि कुकीज कुरकुरीत ठेवण्यासाठी सामान्य प्लास्टिक पाउच देखील वापरू शकता. 

डोसा तव्याला चिकटू नये म्हणून ७ सोप्या टीप्स, डोसा तव्याला न चिकटता होईल हॉटेलसारखा कुरकुरीत...

४. काचेच्या कंटेनरमध्ये करा स्टोअर :- काचेच्या कंटेनरचा वापर कुकीज आणि बिस्किटांना मऊ किंवा नरम होण्यापासून संरक्षण करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. त्यांना काचेच्या डब्यात ठेवल्याने त्यांचा कुरकुरीतपणा कमी होत नाही तसेच त्यांची चव देखील खराब होत नाही. म्हणूनच या पावसाळ्यात बिस्किटे आणि कुकीज काचेच्या डब्यात साठवणे हा उत्तम पर्याय ठरु शकतो.  

५. बिस्किट,कुकीज फ्रिजमध्ये ठेवा :- बिस्किटे किंवा कुकीज रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने ते दीर्घकाळ चांगले राहाते. मात्र हे बहुतेकांना माहीत नसते. यासाठी झिपलॉक पिशवीत कुकीज ठेवून ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. यामुळे कुकीजचा कुरकुरीतपणा आणि शेप दीर्घकाळ आहे तसाच राहातो.

६. मऊ पडलेले बिस्किट्स, कुकीज पुन्हा कुरकुरीत कसे बनवाल ?

पॅकेट जास्त वेळ उघडे ठेवल्यानंतर बिस्किट्स किंवा कुकीज मऊ झाल्या असतील तर ते पुन्हा कुरकुरीत करण्यासाठी ओव्हन किंवा एअर फ्रायरमध्ये ५ ते १० मिनिटे बेक करा. नंतर वर नमूद केलेल्या पद्धतीने साठवा. यामुळे पावसाळ्यात सादळलेले बिस्किट्स व कुकीज बराच काळासाठी कुरकुरीत राहतात.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स