Join us  

अस्सल साऊथ इंडियन इडलीची ही घ्या रेसिपी, फक्त ६ स्टेप्स - इडली होईल कापसासारखी हलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2024 11:09 AM

6 Steps to a Perfect Idli Batter | How to make Soft Idli at Home : इडलीचं पीठ परफेक्ट आंबवण्यासाठी त्यात घाला '१' चमचा तेल, स्पाँजी इडलीची सोपी कृती

आजकाल घरोघरी साऊथ इंडिअन पदार्थांची लोकप्रियता वाढतच जात आहे (Idli Making). इडली, डोसा. मेदू वडे, अप्पे इत्यादी पदार्थ आवडीने खाल्ले जातात. ज्यात इडली हा पदार्थ हेल्थसाठीही बेस्ट आहे (Soft Idli). इडली हा एक असा पदार्थ आहे, जो सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण अथवा संध्याकाळी किंवा डिनरमध्ये देखील खाल्ला जाऊ शकतो (Cooking Tips). पण अनेकदा घरात इडली साऊथ इंडिअन स्टाईल तयार होत नाही.

मुख्य म्हणजे बॅटर नीट फुलत नाही. ज्यामुळे इडली व्यवस्थित तयार होत नाही. इडली तयार करणं हे आपल्याला जरी सोपं वाटत असलं तरी, बनवणं कठीणच. जर आपण घरी तयार करत असलेली इडली, स्पाँजी होत नसेल, किंवा बॅटर व्यवस्थित फरमेण्ट होत नसेल तर, ६ टिप्स फॉलो करा. साऊथ इंडिअन स्टाईल इडली बनेल घरच्या घरी परफेक्ट(6 Steps to a Perfect Idli Batter | How to make Soft Idli at Home).

इडली साऊथ इंडिअन स्टाईल करण्यासाठी ६ सोप्या टिप्स

- सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये ४ कप तांदूळ घ्या. त्यात पाणी घालून २ वेळा धुवून घ्या. तांदूळ धुतल्यानंतर त्यावर झाकण ठेवा. ४ तासांसाठी तांदूळ भिजत ठेवा.

अक्षय्य तृतिया स्पेशल : कपभर रवा आणि २ आंबे, करा आंब्याचा मऊसूत शिरा फक्त १० मिनिटांत

- आता एका बाऊलमध्ये एक कप उडीद डाळ घ्या. त्यात एक टेबलस्पून मेथी दाणे घालून मिक्स करा. त्यात पाणी घालून डाळ व्यवस्थित धुवून घ्या. त्यावर झाकण ठेवा. ४ तासांसाठी उडीद डाळ भिजत ठेवा.

- मिक्सरच्या भांड्यात आधी भिजलेली उडीद डाळ घालून वाटून घ्या. त्यात २ चमचे पाणी घाला. उडीद डाळीची पेस्ट तयार झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या.

- आता मिक्सरच्या भांड्यात भिजलेले तांदूळ घाला, आणि गुळगुळीत पेस्ट तयार करा.

- उडीद डाळ आणि तांदूळ व्यवस्थित दळून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून एकत्र मिक्स करा. नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि एक चमचा तिळाचे तेल घालून मिक्स करा, व त्यावर झाकण ठेवा. ८ तासांसाठी इडली बॅटर फरमेण्ट होण्यासाठी ठेवा.

टपरीवर मिळतात तशी टम्म फुगलेली बटाट्याची भजी करायची आहेत? पिठात घाला ‘हा’ पदार्थ, खा कुरकुरीत भजी

- आता स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. इडली पात्राला ब्रशने तेल लावा. त्यावर चमचाभर बॅटर ओता. इडली पात्र स्टीमरमध्ये ठेवा, १० मिनिटांसाठी इडली वाफेवर शिजवून घ्या. अशा प्रकारे स्पाँजी इडली खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स