Lokmat Sakhi >Food > हिवाळ्यात आहारात शिंगाडा हवाच, वाचा शिंगाडा खाण्याचे ६ पौष्टिक फायदे

हिवाळ्यात आहारात शिंगाडा हवाच, वाचा शिंगाडा खाण्याचे ६ पौष्टिक फायदे

6 Surprising Benefits of Water Chestnuts : शिंगाड्यामध्ये अँटिऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचे प्रमाण भरपूर असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2022 11:28 AM2022-12-23T11:28:55+5:302022-12-23T11:32:30+5:30

6 Surprising Benefits of Water Chestnuts : शिंगाड्यामध्ये अँटिऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचे प्रमाण भरपूर असते.

6 Surprising Benefits of Water Chestnuts | हिवाळ्यात आहारात शिंगाडा हवाच, वाचा शिंगाडा खाण्याचे ६ पौष्टिक फायदे

हिवाळ्यात आहारात शिंगाडा हवाच, वाचा शिंगाडा खाण्याचे ६ पौष्टिक फायदे

हिवाळ्याच्या सिजनमध्ये आपण बाजारात गेलो की, टोपल्यांमध्ये आणि ठेल्यावर एक काळया रंगाच्या सालीचे फळ हमखास दिसते. या फळाला मराठीत शिंगाडा तर इंग्रजीत वॉटर चेस्टनट (Water Chestnut) असे म्हणतात. खरं तर शिंगाडा ही पाण्यातील एक भाजी आहे. पाण्यामध्ये उगवणारी ही फळभाजी कुरकुरीत आणि चवीला गोड लागते. शिंगाड्यामध्ये अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आढळून येतात. या शिंगाड्यामध्ये अँटिऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचे प्रमाण भरपूर असते. शिंगाडा हे असं फळ आहे जे खूप आवडीने खाल्लं जातं. हे फळ खाण्यास चविष्ट तर आहेच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हे फळ कच्चं किंवा उकडून खाल्लं जातं. हे फळ शरीराला अनेक गंभीर विकारांपासून वाचवते. शिंगाडा खाण्याने आपल्या आरोग्याला काय काय फायदे होतात ते समजून घेऊयात(6 Surprising Benefits of Water Chestnuts).

नक्की काय आहेत फायदे ?

१. वजन कमी करण्यासाठी - शिंगाड्यामध्ये ७४% पाण्याचे प्रमाण असते. शिंगाड्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही या फळाचे सेवन अवश्य करु शकता. या फळामुळे आपले पोट लवकर भरते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

२. दातांच्या व हाडांच्या मजबुतीसाठी - शिंगाड्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वात जास्त असते. त्यामुळे दातांच्या आणि हाडांच्या मजबुतीसाठी शिंगाडा खाणे फायदेशीर ठरते. 

३. त्वचा व केसांसाठी फायदेशीर - शिंगाडे आपल्या शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स म्हणून कार्य करते. तसेच आपल्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर  काढून टाकते. यामुळे तुमचे शरीर आतून निरोगी राहते. तुमची त्वचा आणि केस देखील चमकदार आणि निरोगी दिसतात.

४. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते - अनेकांना फळं खाल्ल्यामुळं रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची भीती वाटते. मात्र, शिंगाड्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. मधुमेही रुग्णही याचं सेवन सहज करू शकतात.

५. निद्रानाशाची समस्या दूर होते - तुम्ही फळ म्हणून दररोज शिंगाड्याचं सेवन करू शकता. तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होत असेल, तर या समस्येवर मात करण्यासाठी तुम्हाला शिंगाडे उपयुक्त ठरू शकतं. याचं सेवन केल्यानं तुम्हाला चांगली झोप लागण्यास सुरुवात होईल.

६. हृदय निरोगी राहतं - रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल वाढल्याने स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. शिंगाड्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असून ते खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसंच पोटॅशियम हृदयविकाराचा धोका कमी करतं. शिंगाडा खाल्ल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

 

Web Title: 6 Surprising Benefits of Water Chestnuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.