पोहे हे महाराष्ट्रीयन सुप्रसिद्ध डिश आहे (Cooking Tips). नाश्त्याला अनेक जण पोहे आवडीने खातात. सकाळी गरमा गरम कांदेपोहे त्यावर लिंबू, कोथिंबीर, किसलेलं खोबरं आणि शेव भुरभुरून खाल्ल्यावर पोट आणि मन दोन्ही भरते (Food). कांदे पोहे अनेक प्रकारचे केले जातात. काही जण कांदे पोह्यामध्ये टोमॅटो, बटाटा, मटार किंवा इतर भाज्या घालतात. पण इतर साहित्य घालूनही पोहे परफेक्ट झाले तर ठीक नाहीतर, पोहे खाण्याची इच्छा होत नाही.
काही वेळेला पोहे भिजत घालण्यातही काही चुका होतात. ज्यामुळे पोह्याचा गिचका होतो. तर काही वेळेला कडक होतात. पोहे करताना कोणत्या चुका टाळाव्या? पोहे मोकळे आणि परफेक्ट करण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्या? पाहूयात(6 tips to keep in mind while making Poha).
उपमा करताना रव्याच्या गुठळ्या होतात? १ भन्नाट ट्रिक; नाश्ता सेंटरला मिळतो तसा उपमा होईल भन्नाट
परफेक्ट कांदे पोहे करण्यासाठी लागणारं साहित्य
- पोहे तयार करताना ते भिजवणे सर्वात महत्वाची आणि पोहे करण्याची पहिली स्टेप. पोहे भिजत घालताना काही चुका होतात. कधी जास्त पाणी पडतं, ज्यामुळे पोह्याचा गिचका होतो. पोहे भिजत घालताना, एक चालण घ्या, त्यात पोहे चाळून, त्यात पाणी घालून धुवून घ्या. त्यात जास्त पाणी घालणं टाळा.
- कांदे पोहे करताना जाड किंवा पातळ पोहे घेऊ नये. मध्यम आकाराचे पोहे, जे बाजारात कांदे पोह्यासाठी मिळतात, तेच घ्यावे.
- पोहे धुतल्यानंतर काही वेळासाठी तसेच ठेवा, हात लावू नका. काही वेळा हाताने गुठळ्या फोडा.
- पोह्यांसाठी शेंगदाणे आधी तळून घ्या आणि नंतर तेलात जिरे आणि मोहरी घाला. तळलेले शेंगदाणे एका बाऊलमध्ये काढून घ्या.
खिचडी - वडे खाऊन कंटाळलात? कपभर साबुदाण्याच्या करा खमंग खुसखुशीत पुऱ्या; उपवासासाठी बेस्ट
- मोहरी, जिरे तडतडल्यानंतर त्यात कडीपत्ता, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा घालून भाजून घ्या. आपण त्यात आवडीच्या भाज्या घालू शकता. हवं असल्यास बटाटे देखील घालू शकता.
- साहित्य भाजून घेतल्यानंतर त्यात थोडी हळद, भिजलेले पोहे आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. आपण फोडणी देताना त्यात टोमॅटो देखील घालू शकता.
- शेवटी चमच्याने हळुवारपणे मिक्स करा. शेवटी कोथिंबीर भुरभुरून गॅस बंद करा. ५ मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा. सर्व्ह करताना पोह्यावर तळलेले शेंगदाणे, लिंबू पिळून खायला द्या, व स्वतः देखील पोह्याचा आस्वाद लुटा.