Join us  

डाळ खाल्ल्याने पोटाच्या समस्या होऊ नये म्हणून डाळ शिजवण्याची योग्य पद्धत, डाळ खाऊन पित्त होणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2023 6:02 PM

How do you cook lentils to prevent bloating problem : डाळ पूर्णपणे न पचल्या अपचन, अ‍ॅसिडिटी, ब्लोटिंग यांसारख्या समस्या होऊ नयेत म्हणून डाळ शिजवण्याची योग्य पद्धत...

डाळ हा आपल्या रोजच्या जेवणातला सर्वात महत्वाचा पदार्थ आहे. भात किंवा पोळी सोबत आपण भाजी तर खातोच पण यासोबत डाळही लागतेच. भारतीय अन्नपदार्थांमध्ये डाळींना विशेष असे स्थान आहे. जेवणाच्या ताटात डाळ असल्याशिवाय आपले जेवणच पूर्ण होत नाही. अनेक घरांमध्ये भाज्यांपेक्षा डाळ जास्त आवडीने खाल्ली जाते. डाळ - भात खाल्ल्याशिवाय अनेकांचा दिवसच पूर्ण होत नाही. असे असले तरीही काहीवेळा डाळ खाल्ल्याने आपल्याला गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटी, पोटात दुखणे, करपट - आंबट ढेकर येणे असे अशा अनेक समस्या उद्भवतात(How do you cook lentils to prevent bloating problem).

आपल्या रोजच्या जेवणात तूर, मसूर, मूग अशा वेगवेगळ्या डाळी व कडधान्य यांची उसळ, आमटी असतेच. परंतु आपल्यापैकी काहीजणांना रोज डाळ खाल्ल्याने पोटाचे अनेक लहान - मोठे विकार होतात. डाळ खाल्ल्याने आपल्याला अनेक प्रकारचे पोटाचे आजार, गॅसेस, अपचन, अ‍ॅसिडिटी होण्यामागे एक मुख्य कारण आहे ते म्हणजे आपण डाळ नेमकी कोणत्या पद्धतीने शिजवतो. डाळ बनवण्याची (How do you prevent gas after eating lentils?) प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. परंतु डाळ शिजवताना व  डाळ बनवताना आपण काही अशा छोट्या - छोट्या चुका हमखास करतो , ज्याच्यामुळे डाळ खाल्ल्याने पोटाच्या अनेक तक्रारी उद्भवतात. त्यामुळे डाळ खाण्यासाठी कितीही पौष्टिक असली तरीही पोटाच्या अनेक समस्या होऊ नयेत म्हणून ती नेमकी बनवण्याची योग्य पद्धत समजून घेऊयात(6 tips to make beans and lentils less gassy and easier to digest). 

डाळ शिजवण्याची योग्य पद्धत ठेवा लक्षात... 

१. डाळ शिजवण्याआधी जरुर भिजत ठेवा :- कोणत्याही प्रकारची डाळ ही शिजवण्याआधी जरुर भिजत ठेवावी. डाळींना शिजवण्यापूर्वी किमान ४ ते ६ तास आधी पाण्यांत भिजत ठेवावे. या डाळी पाण्यांत भिजत ठेवल्यामुळे त्या शिजण्याआधी संपूर्णपणे हायड्रेटेड होतात आणि त्यांचा कोरडेपणा कमी होतो. असे केल्याने डाळ लवकर शिजल्या जातात. चणे, राजमा इत्यादी कडधान्य देखील शिजवण्यापूर्वी पाण्यांत भिजत ठेवाव्यात. 

२. डाळ कधीही आंबट पदार्थांसोबत शिजवू नका :- डाळी व कडधान्य कधीही आंबट पदार्थांसोबत शिजवू नये. जर आपण डाळी व कडधान्य आंबट पदार्थांसोबत शिजवले तर या डाळी व्यवस्थित शिजत नाहीत, काहीवेळा त्या कच्च्याच राहतात. यामुळे डाळ कधीही आंबट पदार्थांसोबत शिजवू नका. डाळ व्यवस्थित न शिजून जर ती कच्ची राहिली तर अशी डाळ खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या निर्माण होतात. डाळींना आंबट पदार्थांसोबत शिजवल्याने अशी डाळ खाल्ल्यास काहींना गॅस, अपचन व अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. 

३. डाळीत मीठ घालण्याची योग्य वेळ :- डाळ बनवताना त्यात मीठ घालण्याची देखील योग्य वेळ असते. आपण बरेचदा डाळ बनवत असताना त्यात मीठ घालतो. परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. डाळ बनवत असताना कधीही चुकून मीठ घालू नये. डाळ बनून संपूर्णपणे तयार झाल्यावर त्यात सगळ्यात शेवटी मीठ घालावे.    

४. डाळींसोबत या गोष्टी कधीही खाऊ नका :- रोजच्या आहारात डाळी खाणे हे कितीही पौष्टिक असले तरीही डाळींसोबत काय खावे व काय खाऊ नये, हे देखील लक्षांत घेतले पाहिजे. दूध, अंडी, दही, चीज, मासे अशा पदार्थांसोबत डाळी, शेंगा, कडधान्य खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. 

५. डाळी शिजवताना त्यात भरपूर मसाले वापरावे :-  डाळी अधिक चविष्ट व खमंग होण्यासाठी आपण त्यात वेगवेगळ्या प्रकारचे मसाले तर आवर्जून घालतोच. डाळीत भरपूर मसाले घातल्यामुळे डाळ चवीला स्वादिष्ट लागण्यासोबतच डाळ खाल्ल्याने होणारे गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटी अशा समस्या दूर केल्या जातात. डाळीत भरपूर मसाले वापरण्यासोबतच हिंग, तमालपत्र, तूप किंवा तिळाचे तेल वापरणे फायदेशीर ठरते. यामुळे पचनक्रिया बरोबर राहते आणि अपचन होत नाही.  ६. शिजवण्यापूर्वी डाळ चांगली धुवून घ्यावी :- आपल्यापैकी बरेचजण पॅकेजिंग केलेल्या पॅकबंद डाळी विकत आणतात. या पॅकिंग केलेल्या डाळी अधिक आकर्षक दिसण्यासाठी त्यांना पॉलिश केलेले असते त्याचबरोबर त्यांवर भरपूर केमिकल्सचा वापर केलेला असतो. त्यामुळे या डाळी वापरण्याआधी त्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घेणे गरजेचे असते. डाळी किमान २ ते ३ वेळा तरी स्वच्छ धुवून मगच त्या शिजवण्यासाठी ठेवाव्यात. याचबरोबर डाळी शिजवत असताना त्यावर येणारा पांढरा फेस काढून टाकावा.

टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्स