उपवासाला फराळाच्या पदार्थांमध्ये साबुदाणा खिचडीला (Sabudana Khichdi) तोड नाही. साबुदाणा खिचडी, वडे, खीर हमखास केली जाते. साबुदाणा खिचडी करायला सोपी असली तरी, आपल्या मनासारखी जमली नाही तर मात्र मूड बिघडतो. साबुदाणा खिचडी तयार करण्यापूर्वी आपण साबुदाणा भिजत घालतो. पण साबुदाणा भिजत घालताना त्यात जास्त पाणी राहतं, किंवा साबुदाणा भिजत घालण्याचं गणित चुकतं (Food). ज्यामुळे साबुदाण्यामध्ये पाणी राहते आणि खिचडी तयार करताना लगदा होतो.
कधी कधी खिचडी करताना तवा किंवा कढईला चिकटून राहते (Cooking Tips). ज्यामुळे व्यवस्थित परतता ही येत नाही. जर आपली साबुदाणा खिचडी छान मोकळी, सुटसुटीत व्हावी असे वाटत असेल तर, साबुदाणा भिजत घालताना काही गोष्टी लक्षात ठेवा. यामुळे साबुदाण्याचे विविध पदार्थ परफेक्ट तयार होतील(6 TIPS to make NON STICKY Sabudana Khichdi Recipe).
साबुदाणा भिजत घालताना टाळायला हव्या 'या' चुका
साबुदाणा खिचडी तयार करण्याची पहिली स्टेप म्हणजे साबुदाणा भिजत घालणे. भिजलेला साबुदाणा कोरडा लागायला नको आणि तो अति भिजून पिठूळही व्हायला नको. यासाठी आपण काही टिप्स फॉलो करू शकता.
नारळाचं दूध काढायचं म्हणजे अवघड काम? फक्त १ युक्ती, थंडगार सोलकढी करा झटपट
- साबुदाणा भिजत घालताना बऱ्याचदा आपल्या हातून जास्त पाणी पडतं, किंवा पाणी घालण्याचे प्रमाण आपल्याला कळत नाही. त्यामुळे पाण्याच्या प्रमाणाकडे लक्ष द्या.
- यासाठी जर आपण एक वाटी साबुदाणा घेत असाल तर, आधी निवडून स्वच्छ धुवून घ्या. साबुदाणा धुताना पाणी घालून हातानं चोळून धुवावे. जेणेकरून साबुदाणा नीट धुतला जाईल.
- साबुदाणा भिजवताना त्यात थोडं पाणी ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे एक वाटी साबुदाण्यात पाऊण वाटी पाणी घालावं. जर त्याहून जास्त पाणी राहीलं, तर साबुदाणा चिकट होतो. जर त्यात योग्य प्रमाणात पाणी असेल तर, मोकळा भिजतो.
- जर आपल्याकडून त्यात पाणी जास्त पडलं असेल तर, आणि साबुदाणा ओलसर आणि पिठूळ झाली असेल तर, आपण एक ट्रिक याठिकाणी वापरू शकता.
गणित मुलांच्या डोक्यावरुन जातं? ५ टिप्स-मुलांना लागेल गणिताची गोडी- मिळतील पैकीच्या पैकी मार्क
- जर साबुदाणा भिजल्यानंतरही त्यात पाणी उरले असेल तर, एक चाळण घ्या. चाळणीमध्ये काढून साबुदाणे पसरवून घ्या. नंतर चाळणीच्या खाली एक स्टॅण्ड ठेवा. जेणेकरून साबुदाण्यामधून अतिरिक्त पाणी निथळून खाली पडेल. निदान अर्ध्या तासासाठी ठेवा. यामुळे साबुदाणा मोकळी भिजेल.
- अर्ध्या तासानंतर सुती कापड घ्या. त्या कापडावर साबुदाणा पसरवून फॅनखाली ठेवा. यामुळे चिकट झालेला साबुदाणा मोकळा होईल.