Lokmat Sakhi >Food > ताकाचेही असतात ६ प्रकार, प्रत्येक ताकाचे फायदे वेगळे! तुम्ही नक्की कोणतं ताक पिता? तपासा लगेच..

ताकाचेही असतात ६ प्रकार, प्रत्येक ताकाचे फायदे वेगळे! तुम्ही नक्की कोणतं ताक पिता? तपासा लगेच..

6 Types Of Buttermilk With Different Health Benefits: ताक हे एकाच प्रकारचं असतं असं आपल्याला वाटतं. पण आयुर्वेदानुसार ताकाचे ६ प्रकार आहेत. बघा ते नेमके कोणते आणि कोणत्या प्रकारचं ताक कधी पिणं अधिक योग्य असतं...(ayurvedic method of making buttermilk)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2024 01:08 PM2024-08-09T13:08:45+5:302024-08-12T18:03:02+5:30

6 Types Of Buttermilk With Different Health Benefits: ताक हे एकाच प्रकारचं असतं असं आपल्याला वाटतं. पण आयुर्वेदानुसार ताकाचे ६ प्रकार आहेत. बघा ते नेमके कोणते आणि कोणत्या प्रकारचं ताक कधी पिणं अधिक योग्य असतं...(ayurvedic method of making buttermilk)

6 types of buttermilk with different health benefits, how to make different types of buttermilk as per ayurveda, ayurvedic method of making buttermilk | ताकाचेही असतात ६ प्रकार, प्रत्येक ताकाचे फायदे वेगळे! तुम्ही नक्की कोणतं ताक पिता? तपासा लगेच..

ताकाचेही असतात ६ प्रकार, प्रत्येक ताकाचे फायदे वेगळे! तुम्ही नक्की कोणतं ताक पिता? तपासा लगेच..

Highlightsआयुर्वेदानुसार ताकाचे ६ प्रकार सांगण्यात आले आहेत. ते कोणते आणि कोणतं ताक कधी प्यावं ते पाहा..

दह्यापासून तयार केलेलं ताक अतिशय आरोग्यदायी मानलं जातं. दह्यापेक्षाही ताकामध्ये अधिक गुणधर्म असतात. दही एकवेळ बाधतं. पण ताक प्यायल्याने त्रास होत नाही, असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात. दह्यामध्ये पाणी टाकायचं. त्यात मीठ, जिरेपूड किंवा इतर काही मसाल्याचे पदार्थ टाकायचे आणि त्याचं ताक तयार करायचं, हे आपल्याला माहिती आहे (6 types of buttermilk with different health benefits). शिवाय ताक एकाच पद्धतीचं असतं असंही आपल्याला वाटतं (how to make different types of buttermilk as per ayurveda). पण आयुर्वेदानुसार ताकाचे ६ प्रकार सांगण्यात आले आहेत. ते कोणते आणि कोणतं ताक कधी प्यावं ते पाहा..(ayurvedic method of making buttermilk)

 

आयुर्वेदानुसार ताकाचे ६ प्रकार कोणते?

१. अर्धतक्र

यामध्ये पाणी आणि दही समप्रमाणात घेऊन ताक तयार केलं जातं. हे ताक प्यायल्याने पचनक्रिया चांगली होते. पित्त, वात आणि कफ हे तिन्ही दोष संतुलित ठेवले जातात. तसेच शरीर योग्य प्रमाणात हायड्रेटेड ठेवण्यासाठी हे ताक चांगलं असतं.

रोपांसाठी फ्लॅटमध्ये जागाच नाही, बाल्कनीत ऊनही येत नाही? ३ टिप्स- घराचा १ कोपरा होईल हिरवागार

२. द्वीअंशतक्र

याप्रकारच्या ताकामध्ये पाणी आणि दह्याचं प्रमाण २: १ असं घेतलं जातं. ॲसिडीटी कमी करण्यासाठी या ताकाचा उपायोग होतो.

फॅटी लिव्हरचा त्रास? तज्ज्ञ सांगतात ५ सोपे उपाय, जेवणातले छोटेसे बदल लिव्हर ठेवतील ठणठणीत.. 

३. त्रीअंशतक्र

पाणी आणि दही ३: १ या प्रकारात घेऊन हे ताक तयार केलं जातं. वरील दोन्ही ताकांच्या तुलनेत हे ताक पातळ असतं. ज्यांना वारंवार गॅसेस होण्याचा त्रास होतो त्यांनी हे ताक प्यावं.

 

४. चर्तुअंश तक्र

नावामध्ये सुचविल्याप्रमाणेच पाणी आणि दही ४:१ या प्रमाणात घेऊन हे ताक तयार केलं जातं. हे ताक पचनक्रिया चांगली होण्यासाठी अतिशय चांगलं असतं. पचन चांगलं करून शरीर नॅचरली डिटॉक्स करण्यासाठी हे ताक उपयुक्त ठरतं.

हात, बोटं खरखरीत होऊन काळे पडले? रविना टंडनचा खास उपाय- १५ मिनिटांत हात होतील मऊ

५. पंचअंश तक्र

या प्रकारात पाणी आणि दही ५: १ याप्रमाणात असतात. हे ताक अतिशय पातळ आणि पचायला खूपच हलकं असतं. हे शरीराला थंडावा देण्यासाठी अतिशय चांगलं असतं. तुम्हाला उष्णतेचा त्रास होत असेल किंवा उष्ण प्रकृती असेल तर तुम्ही या पद्धतीचं ताक प्यायला पाहिजे. 

६. शुद्ध तक्र

या ताकामध्ये अजिबात पाणी घातलं जात नाही. संपूर्ण दही घालून तयार केलेलं हे ताक अतिशय घट्ट असतं. तुम्ही यात काळं मीठ, रॉक सॉल्ट घालून पिऊ शकता. त्यामुळे त्याची पाचकता वाढते. 


 

Web Title: 6 types of buttermilk with different health benefits, how to make different types of buttermilk as per ayurveda, ayurvedic method of making buttermilk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.