Lokmat Sakhi >Food > अस्सल देवगड 'हापूस' कसा ओळखाल? ६ टिप्स, पैसे मोजताय तर घ्या अस्सल आंबा...

अस्सल देवगड 'हापूस' कसा ओळखाल? ६ टिप्स, पैसे मोजताय तर घ्या अस्सल आंबा...

How To Identify Authentic Hapus Mango : अस्सल देवगड हापूस आंबा विकत घेताना आपली फसवणुक होऊ नये यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवू.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2023 04:11 PM2023-04-18T16:11:16+5:302023-04-18T16:18:32+5:30

How To Identify Authentic Hapus Mango : अस्सल देवगड हापूस आंबा विकत घेताना आपली फसवणुक होऊ नये यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवू.

6 Ways To Identify Real Devgad Alphonso Mangoes | अस्सल देवगड 'हापूस' कसा ओळखाल? ६ टिप्स, पैसे मोजताय तर घ्या अस्सल आंबा...

अस्सल देवगड 'हापूस' कसा ओळखाल? ६ टिप्स, पैसे मोजताय तर घ्या अस्सल आंबा...

उन्हाळा म्हटलं की आंबा प्रेमींसाठी हा मोसम म्हणजे पर्वणीच असते. आंबा हे किती लोकप्रिय आणि अनेकांचं आवडतं फळ आहे, हे वेगळं सांगायला नको. आंबा हा फळांचा राजा आहे, असं म्हणतात. आंब्यांचा गोडवा आणि त्याची चव अनेकांची आवडती असते. या फळासाठी म्हणून अनेक लोक उन्हाळ्याची वाट पाहत असतात. उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या या फळासाठी लोक आसुसलेले असतात, वर्षभर वाट पाहतात. बाजारांत आंबा विकायला येताच तो खरेदी करण्यासाठी सगळ्यांची झुंबड उडते. 

आंब्यांच्या ऋतूंमध्ये बाजारांत वेगवेगळ्या प्रजातींचे आंबे विकायला येत असतात. हापूस, दशेरी, तोतापुरी, रायवळ, पायरी असे असंख्य प्रकारचे आंब्यांचे प्रकार बाजारात विकायला असतात. आंब्यांचे कितीही प्रकार असले तरीही सर्वजण अस्सल देवगड हापूस आंब्यांच्याच प्रेमात असतात. कोकणातील अनेक गावांमध्ये हापूस आंबे होतात. पण त्या सगळ्यांच्याच चवीमध्ये थोडाफार फरक हा असतोच. हापूस आंबा म्हटलं की तो देवगडचा असं सर्वसाधारणपणे म्हटलं जात. परंतु, रत्नागिरी, देवगड, मालवण, सिंधुदुर्ग, देवबाग या ठिकाणी मिळणारे हापूस आंबे फारच प्रसिद्ध आहेत. आपण बाजारांत आंबे विकत घेण्यासाठी जातो, तेव्हा समोर असलेल्या आंब्यांपैकी अस्सल देवगड हापूस आंबा ओळखणे फारच कठीण असते. अशावेळी आपली फसवणुक होऊ नये यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवू(6 Ways To Identify Real Devgad Alphonso Mangoes).

देवगडचा अस्सल हापूस आंबा ओळखायचा कसा ? 

१. आंब्याचा सुगंध :- अस्सल देवगड हापूस आंबा पिकला की त्याचा सुगंध इतका दरवळतो की, हा सुगंध आपल्याला लांबूनही ओळखता येतो. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या अस्सल देवगड हापूस आंब्याचा सुगंध गोडसर, मधाळ असा सुवास येतो. खोलीत असा एखादाच आंबा असला तरीही त्याचा तीव्र घमघमाट सुटतो, आणि त्याचा सुवास इतका सुंदर असतो की आपण हा आंबा न कळत कधी हातात घेतो हे समजत नाही. याउलट कृत्रिम पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांचा सुगंध घेण्यासाठी तो आंबा देठाशी खरवडावा लागतो. हा हापूस आणि इतर प्रजातींमधला फरक आहे, आणि हा फरक भारताच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध केले आहे. 

२. पातळ साल :- अस्सल देवगड हापूस आंबा जर नैसर्गिकरित्या पिकवलेला असेल तर त्याची साल फक्त हातालाच नाही तर दिसायलाही पातळ असते. याउलट औषध मारून पिकवलेला हापूस किंवा दाक्षिणात्य भारतातल्या प्रजातींच्या साली या जाड असतात. तसंच सालीवर डाग, सुरकुत्या नसाव्यात. सुरकुत्या असलेला आंबा चांगला असतो असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. पण खरंतर सुरकुत्या हे फळ जास्त पिकल्याचं लक्षण आहे, त्यामुळे शक्यतो खरेदी करताना सुरकुत्या नसल्याचं पाहूनच खरेदी करावी. जर फळावर सुरकुत्या पडूनही फळ हिरवं दिसत असेल तर ते कच्चं असतानाच काढलं जातं. त्यामुळे अस्सल देवगड हापूस आंबा खरेदी करताना त्याच्या सालीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. 

महागडे टेंडर कोकोनट आईस्क्रीम आता बनवा घरच्याघरी, शहाळ्याची गारेगार जादू - व्हा फ्रेश...

३. फळाचा रंग :- फळाच्या रंगाकडे लक्षपूर्वक बघितलं तरीही प्रमुख फरक जाणवू शकतो. जर आंबा कृत्रिमरित्या पिकवला असेल तर तो पिवळाधम्मक  आणि एकाच रंगाचा वाटतो. पण चांगल्या आंब्याच्या रंगात हिरवा आणि पिवळा(पिवळाधम्मक नाही, पिवळा आणि केशरी यांच्यामधला रंग) या दोन रंगांच्या विविध छटांचं मिश्रण स्पष्ट दिसतं.

४. फळाचा आकार :- अस्सल देवगड हापूस आंब्यांच्या आकारातही फरक असतो. नैसर्गिकरित्या पिकलेला अस्सल हापूस आंबा हा खालच्या टोकाशीसुद्धा गोलाकार आणि वजनदार असतो. याउलट दक्षिणेतून किंवा गुजरातेतून आलेल्या आंब्यांचं खालचं टोक हे निमूळतं असतं.

५. फळ रसाळ :- फळांचा राजा जर आंबा असेल तर आंब्यांचा राजा हापूस आहे; याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचं रसाळ असणं.
या आंब्याची फोड इतर आंब्याच्या फोडीपेक्षा मोठी आणि जास्त रसदार असते. याउलट इतर प्रजातींच्या आंब्यात फायबर(तंतूसदृश पदार्थ)चं प्रमाण अधिक असून गर कमी असतो.

६. आंब्याची चव :- आंब्याची चव हे आंब्याच्या जगभर पसरलेल्या प्रसिद्धीचे एकमेव कारण आहे. वर्षातून फक्त दोन-चार महिने मिळणारा हा आंबा जितका नैसर्गिक चवीला तितकाच गोड आणि चवदार असतो. याउलट इतर जातीच्या फळांमध्ये इतका गोडवा नसतो, त्यातले काही आंब्यांचे प्रकार हे तर आंबटच असतात.

लालचुटूक कलिंगडाचे गारेगार आइस्क्रिम, कल्पनाच किती भारी आहे! घ्या सोपी रेसिपी- करा उन्हाळा साजरा...

शाही गुलकंद फिरनी, भर उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा पारंपरिक पदार्थ, बनवायला सोपा चवीला उत्तम...

इतर काही महत्वाच्या टिप्स :- 

१. पिकलेल्या हापूस आंब्याची साल आपण सहजरित्या हाताने काढू शकतो. तसेच या सालीला आंब्याचा गर लागत नाही.

२. एका मोठया भांड्यात पाणी घेऊन त्यात आंबा बुडवा, जर आंबा बुडाला तर तो नैसर्गिकरित्या पिकलेला आहे. मात्र जर आंबा तरंगत राहिला तर तो रसायने वापरुन पिकवलेला आहे, असे समजावे. 

३. हापूस आंब्याचा वास आणि त्याचा केशरी गर यावरून सहजरित्या ओळखू शकतो.

Web Title: 6 Ways To Identify Real Devgad Alphonso Mangoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न