Lokmat Sakhi >Food > ऑलिव्ह ऑईल स्वयंपाकात वापरण्याचे 7 फायदे; पोषण आणि चव दोन्हींचा मेळ

ऑलिव्ह ऑईल स्वयंपाकात वापरण्याचे 7 फायदे; पोषण आणि चव दोन्हींचा मेळ

Olive oil benefits : आरोग्याच्या विविध तक्रारींवर उपयुक्त ऑलिव्ह ऑईल, आहारात जरुर करा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 11:57 AM2022-01-31T11:57:13+5:302022-01-31T12:20:35+5:30

Olive oil benefits : आरोग्याच्या विविध तक्रारींवर उपयुक्त ऑलिव्ह ऑईल, आहारात जरुर करा समावेश

7 benefits of using olive oil in cooking; A combination of both nutrition and taste | ऑलिव्ह ऑईल स्वयंपाकात वापरण्याचे 7 फायदे; पोषण आणि चव दोन्हींचा मेळ

ऑलिव्ह ऑईल स्वयंपाकात वापरण्याचे 7 फायदे; पोषण आणि चव दोन्हींचा मेळ

Highlightsशरीराचे पोषण होण्यास मदत होतेच पण पदार्थांना चवही येतेवजन कमी करण्यास, कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त

आहारातील तेल (Cooking oil) हा आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय महत्त्वाचा विषय आहे. अमुक तेल खाल्ल्याने आरोग्याला त्रास होतो, तर विशिष्ट तेल खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते असे आपण नेहमी ऐकतो. तेल किती प्रमाणात, कशा पद्धतीने खाल्ल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होते, याच्या टिप्सही आपण सगळे आवर्जून फॉलो करतो. ठराविक काळाने आपण नेहमी वापरत असलेले तेल बदलायला हवे हेही तितकेच खरे आहे. आहारातील तेलांमध्ये प्रामुख्याने शेंगदाणा तेल, सूर्यफूलाचे तेल, मोहरीचे तेल यांसारख्या तेलांचा वापर केला जातो. पण ऑलिव्ह ऑईलही (Benefits of olive oil) आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते आणि त्याचा आवर्जून समावेश करायला हवा. त्यामुळे शरीराचे पोषण होण्यास मदत होतेच पण पदार्थांना चवही येते. ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, लोह, ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंटस असतात. हृदयाच्या आरोग्यासाठी ऑलिव्ह ऑईल अतिशय फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. पाहूया ऑलिव्ह ऑईल रोजच्या स्वयंपाकात वापरण्याचे फायदे...

(Image : Google)
(Image : Google)

१. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त 

वाढलेले वजन कमी करणे हे अनेकांपुढील आव्हान असते. तेल, भात, गोड पदार्थ या गोष्टी वजन वाढण्यास कारणीभूत असतात असे आपण म्हणतो. यातही तळलेल्या पदार्थांमुळे कोलेस्टेरॉल वाढणे, शरीरावरील चरबी वाढणे या समस्या उद्भवतात हे आपल्याला माहित आहे. पण आपण आहारात इतर तेलांपेक्षा ऑलिव्ह ऑईलचा वापर केल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. या तेलात फॅटसही कमी असल्याने आरोग्यासाठी ते चांगले असते. 

२. कॉलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत 

ऑलिव्ह ऑईलमध्ये ७५ ते ८० टक्के मोनोसॅच्युरेटेड फॅटस आढळतात. या फॅटसमुळे चांगले कॉलेस्ट्रॉल आणि एचडीएल नियंत्रणात राहण्यास मदत होते. कोलेस्टेरॉलशी निगडीत तक्रारींमुळे आपल्याला हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो. मात्र या तेलामुळे हा धोका काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. 

३. डिप्रेशन दूर होण्यास फायदेशीर

आता तेल आणि डिप्रेशन यांचा एकमेकांशी काय संबंध आहे असे आपल्याला वाटेल. मात्र ऑलिव्ह ऑईल आपल्या मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढवण्यास मदत करते. हे रसायन आपल्या मूडवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे ऑलिव्ह ऑईल नियमित वापरल्यास आपलं एकूणच मानसिक आणि शारिरीक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

४. डायबिटीस असणाऱ्यांसाठी उपयुक्त 

डायबिटीस असणाऱ्यांमध्ये रक्तातील साखरेची पातळी जास्त असते. पण ऑलिव्ह ऑईलमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे डायबिटीस असणाऱ्यांमध्ये तब्येतीच्या गुंतागुंत होण्याची शक्यता असते. अशावेळी या रुग्णांना आहाराबाबत पथ्ये सांगितली जातात. त्यामध्ये ऑलिव्ह ऑईलचा आवश्यक समावेश करायला हवा.

५. हाय ब्लडप्रेशरपासून सुटका

ब्लडप्रेशर ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. कमी वयातही अनेकांना ब्लडप्रेशरचा त्रास असतो. ऑलिव्ह ऑईलमधील  मोनोसॅच्युरेटेड फॅट्समुळे यात फॅटी अॅसिड ओमेगा – 3 असते. ओमेगा-3 मुळे तुमचे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. ओमेगा ३ हे आपल्याला आहारातूनच मिळत असल्याने आहारातील विविध गोष्टींमध्ये त्याचा समावेश असणे आवश्यक असते. 

(Image : Google)
(Image : Google)

६. बद्धकोष्ठता दूर होण्यास फायदेशीर 

ऑलिव्ह ऑईलमध्ये आढळणाऱ्या मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि व्हिटॅमीन ई, क, लोह आणि ओमेगा- 3, 6 फॅटी अॅसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्समुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास दिवसातून दोनदा एक चमचा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल रिकाम्या पोटी घेतल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल. पण या तेलाचं सेवन करण्याआधी तुम्ही चार तास काहीही खाल्लेलं नसावं, याची काळजी घ्या.  

७. प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत

सध्या विविध संसर्गजन्य आजार वेगाने पसरत असताना आपली प्रतिकारशक्ती चांगली असणे अतिशय गरजेचे असते. ऑलिव्ह ऑईलमुळे प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते. त्यामुळे आहारात नियमित या तेलाचा वापर केल्यास तुम्ही संसर्गांपासून काही प्रमाणात दूर राहू शकता. 
 

Web Title: 7 benefits of using olive oil in cooking; A combination of both nutrition and taste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.