Lokmat Sakhi >Food > डोसा तव्याला चिकटू नये म्हणून ७ सोप्या टीप्स, डोसा तव्याला न चिकटता होईल हॉटेलसारखा कुरकुरीत 

डोसा तव्याला चिकटू नये म्हणून ७ सोप्या टीप्स, डोसा तव्याला न चिकटता होईल हॉटेलसारखा कुरकुरीत 

Simple Tips To Ensure Your Dosa Come Out Crispy & Perfect Every Time : डोसा कधीच कोणत्याही तव्यावर चिकटणार नाही आणि मस्त कुरकुरीत होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2023 07:53 PM2023-02-03T19:53:15+5:302023-02-03T20:03:08+5:30

Simple Tips To Ensure Your Dosa Come Out Crispy & Perfect Every Time : डोसा कधीच कोणत्याही तव्यावर चिकटणार नाही आणि मस्त कुरकुरीत होईल.

7 simple tips to prevent dosa from sticking to the pan | डोसा तव्याला चिकटू नये म्हणून ७ सोप्या टीप्स, डोसा तव्याला न चिकटता होईल हॉटेलसारखा कुरकुरीत 

डोसा तव्याला चिकटू नये म्हणून ७ सोप्या टीप्स, डोसा तव्याला न चिकटता होईल हॉटेलसारखा कुरकुरीत 

आपल्यापैकी बऱ्याचशा घरात नाश्त्याला इडली, डोसा असे लोकप्रिय दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ केले जातात. बरेच लोक नाश्त्याला हे पदार्थ आवडीने खातात. तांदूळ व डाळीचे पीठ आंबवून तयार केला जाणारा हा डोसा चवीला अतिशय उत्तम लागतो. रवा डोसा, मसाला डोसा, मुगाचे डोसे असे याचे विविध प्रकार असतात. सहसा आपण हा पदार्थ बटाट्याची भाजी, सांबार आणि चटणीबरोबर आवडीने खातो.

डोसा जितका कुरकुरीत असेल तितकी खायला मजा येते. पण जेव्हा तुम्ही घरात असा कुरकुरीत डोसा बनवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हांला खास डोसा तवा लागतो. नॉन स्टिकच्या डोसा तव्यावर असे कुरकुरीत डोसे नक्कीच बनवता येतात. पण जर तुमच्याकडे खास डोसा तवा नसेल तरी तुम्ही कोणत्याही तव्यावर म्हणजे अगदी लोखंडी तव्यावरही हॉटेलप्रमाणे कुरकुरीत डोसा बनवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त या काही टिप्स फॉलो करण्याची गरज आहे. ज्यामुळे डोसा कधीच कोणत्याही तव्यावर चिकटणार नाही आणि मस्त कुरकुरीत होईल(Simple Tips To Ensure Your Dosa Come Out Crispy & Perfect Every Time).

डोसा पॅनला चिकटू नये म्हणून या काही टीप्स करा फॉलो... 

टीप १ : सर्वप्रथम, तव्यावर डोसा घालण्याआधी थोडेसे पाणी हातांनी तव्यावर शिंपडून घ्यावे. ज्यामुळे तवा डोसा बॅटरसाठी तयार आहे हे समजेल.

टीप २ : डोसा तव्यावर घालण्याआधी, तव्यावर चमचाभर तेल सोडून घ्या. आता एक कांदा सोलून तो अर्धा कापून, कांदा काटा चमच्याला अडकवून घ्यावा. या काटा चमच्याला अडकवलेल्या कांद्याने तव्यावरील तेल संपूर्ण तव्यावर पसरवून घ्यावेत. यामुळे तुमचा डोसा तव्याला खालून चिकटणार नाही. 

टीप ३ : काही डोसे बनवल्यानंतर तवा चिकट झाला असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी तुम्ही एखादी नारळाची शेंडी तेलात बुडवून त्याने तवा स्वच्छ करू शकता.       

टीप ४ : डोसा जर सारखाच तव्याला चिकटत असेल तर असेल तर थोडं पीठ तव्यावर भुरभुरा आणि ते कापडाने स्वच्छ करून घ्या.

टीप ५ : डोसा बनवण्यापूर्वी तुमचा लोखंडी तवा स्वच्छ करून घ्या. डोसा बॅटर तव्यावर टाकताना तव्याला कोणताही चिकट पदार्थ चिकटलेला नसावा. यामुळे तुमचा डोसा तव्याला न चिकटता हॉटेलसारखा मऊ, कुरकुरीत होतो. 

टीप ६ : सर्वात आधी तव्याला तेल लावून घ्या आणि तवा गरम करा. त्यानंतर गॅस बंद करा आणि तवा थंड होऊ द्या. थंड झाल्यावर गॅस पुन्हा सुरू करा आणि तवा गरम करून घ्या. तव्यावरील सर्व तेल टिश्यू पेपर अथवा कोरड्या फडक्याने पुसून घ्या. या ट्रिकमुळे तवा तेलकट होईल आणि त्यावर डोसा चिकटणार नाही.

टीप ७ : डोसा तव्यावर टाकल्यानंतर त्याच्या गोलाकार तेल सोडावे.

 

Web Title: 7 simple tips to prevent dosa from sticking to the pan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.