Lokmat Sakhi >Food > रात्रीच्या जेवणात गरमागरम खिचडी खा; वजन होईल कमी, आहारतज्ज्ञ सांगतात ८ फायदे.....

रात्रीच्या जेवणात गरमागरम खिचडी खा; वजन होईल कमी, आहारतज्ज्ञ सांगतात ८ फायदे.....

8 Reasons Why Khichdi Is Best For weight Loss : हेल्दी डाएटबरोबरच हलका, फुलका व्यायाम करत राहायला हवं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 15:22 IST2025-01-06T15:35:12+5:302025-01-07T15:22:39+5:30

8 Reasons Why Khichdi Is Best For weight Loss : हेल्दी डाएटबरोबरच हलका, फुलका व्यायाम करत राहायला हवं.

8 Reasons Why Khichdi Is Best For weight Loss : Khichdi Is Best For weight Loss | रात्रीच्या जेवणात गरमागरम खिचडी खा; वजन होईल कमी, आहारतज्ज्ञ सांगतात ८ फायदे.....

रात्रीच्या जेवणात गरमागरम खिचडी खा; वजन होईल कमी, आहारतज्ज्ञ सांगतात ८ फायदे.....

वाढतं वजन आणि लठ्ठपणामुळे बरेच लोक त्रस्त असतात. लठ्ठपणा एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे आत्मविश्वासही कमी होतो. फिट व्यक्ती वाढतं वजन नियंत्रणात कसं ठेवायचं याबाबत चिंतेत असतात (Why Khichdi Is Best For weight Loss). वजन वाढणं अनेकदा जेनेटिकली असते. कमी खाल्ल्यावर वजन  वाढू लागते. फिट राहण्यासाठी हेल्दी डाएट  घेणं गरजेचं असतं. हेल्दी डाएटबरोबरच हलका, फुलका व्यायाम करत राहायला हवं. शारीरिक वजन कमी करण्यासाठी तुम्ही खिचडीचे सेवन करू शकता. आहारतज्ज्ञांनी ८ कारणांमुळे खिचडी खाण्याचा सल्ला दिला आहे. (8 Reasons Why Khichdi Is Best For weight Loss)

आहारतज्ज्ञ सांगतात की खिचडी शरीराला डिटॉक्स करते. बराचवेळ भूकही लागत नाही. खिचडी खाल्ल्यानं ओव्हरइटींगचा धोका टाळता येतो. जे लोक जास्त  लठ्ठ असतात त्यांचे दिवसभर तोंड सुरू असते त्यांनी खिचडी खायला हवी. खिचडी एक लोक कॅलरी फूड आहे. खिचडीमुळे एक्स्ट्रा फॅट वाढत नाही.

फायबर्स

खिचडीत फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. पचनक्रिया चांगली असल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होतं. आहारतज्ज्ञ रोज खिचडी खाण्याचा सल्ला देतात.

मायक्रोन्युट्रिएंट्स

खिचडी डाळ आणि तांदूळांपासून तयार होते. तांदूळात कार्बोहायड्रेट्स असतात. डाळीत प्रोटीन्स असतात. खिचडी खाल्ल्यानं मांसपेशी मजबूत होतात आणि शरीरात पोषक तत्वांचे संतुलन राहते.

ग्लायसेमिक इंडेक्स कमी

ग्लायसेमिक इंडेक्स वाढणं म्हणजे  वजन वाढणं. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे हळूहळू  ग्लुकोज प्रवाहित ठेवणं. खिचडीचा  ग्लायसेमिक इंडेक्स  कमी असतो. खिचडी ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर ठरते. 

कोलेस्टेरॉल नियंत्रात राहते

खिचडी एक लो फॅट फूड आहे यात कोलेस्टेरॉल नसतेच. कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये हार्टशी संबंधित हेल्थमध्ये सुधारणा होते. हार्ट रिलेडेट आजार असतील तर खिचडीचे सेवन करू शकता. 

आतडे हेल्दी राहतात

खिचडीत फायबर्स मोठ्या प्रमाणात असते. आतड्यांची हेल्थ चांगली राहते. खिचडीमुळे आतड्यांमध्ये हेल्दी बॅक्टेरियांची ग्रोथ होते.

पचायला हलकं

खिचडी एक मऊ अन्न आहे. ज्यामुळे अन्न पचणं सोपं होतं. पचनाशी संबंधित समस्या उद्भवत नाही, गॅस, एसिडीटीची समस्याही उद्भवत नाही. 

प्रोटीन्स भरपूर असतात

खिचडीत डाळ प्लांट बेस्ड प्रोटीन्स असतात.  खिचडी खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते, याशिवाय प्रोटीन इन्टेकनं बराचवेळ पोट भरलेलं राहतं. 

Web Title: 8 Reasons Why Khichdi Is Best For weight Loss : Khichdi Is Best For weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.