Lokmat Sakhi >Food > 88 लाख डोसे, 50 लाख समोसे, 21 लाख गुलाबजाम..  2021मधे भारतीयांनी पार्सल काय मागवलं? 

88 लाख डोसे, 50 लाख समोसे, 21 लाख गुलाबजाम..  2021मधे भारतीयांनी पार्सल काय मागवलं? 

2021 मधे आपल्या देशातील लोकांना सर्वात जास्त काय खायला आवडलं ? असा प्रश्न विचारला तर उत्तर काय देणार? असं उत्तर देणं अवघडच. पण ऑनलाइन फूड डिलेव्हरी कंपन्यांचे आकडे वाचलेत तर याच काय पण अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सहज मिळतात. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 02:45 PM2021-12-30T14:45:45+5:302021-12-30T14:55:17+5:30

2021 मधे आपल्या देशातील लोकांना सर्वात जास्त काय खायला आवडलं ? असा प्रश्न विचारला तर उत्तर काय देणार? असं उत्तर देणं अवघडच. पण ऑनलाइन फूड डिलेव्हरी कंपन्यांचे आकडे वाचलेत तर याच काय पण अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सहज मिळतात. 

88 lakh Dosas, 50 lakh Samosas, 21 lakh Gulabjamun .. What did the Indians order food by online in 2021? | 88 लाख डोसे, 50 लाख समोसे, 21 लाख गुलाबजाम..  2021मधे भारतीयांनी पार्सल काय मागवलं? 

88 लाख डोसे, 50 लाख समोसे, 21 लाख गुलाबजाम..  2021मधे भारतीयांनी पार्सल काय मागवलं? 

Highlightsऑनलाइन ऑर्डर करुन मागवलेल्या पदार्था पहिला नंबर बिर्याणीचा आहे. डोसा हा तर खरं हाॅॅटेलमधे जाऊन खाण्याचा पदार्थ. पण  ऑनलाइन फूड ऑर्डरमधे याचा नंबर दुसरा आहे. रात्रीच्या जेवणानंतरची भूक भागवण्यासाठी ऑनलाइन ऑर्डरचा आधार घेतला गेला.  

लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी किती आणि कशा बदलल्या, लोकांना काय आवडतं हे समजून घेण्यासाठी लोकांच्या जाऊन मुलाखती घ्याव्या लागत नाही. वर्षाच्या शेवटी काही कंपन्या काही आकडे प्रसिध्द करतात. जे थेट लोकांच्या वागण्याच्या, खाण्या पिण्याच्या सवयींचं विश्लेषण करायला पुरे ठरतात. ऑनलाइन फूड सर्व्हिस पुरवणाऱ्या अनेक कंपन्या भारतात आहे. पण झोमॅटो आणि स्विगी या दोन कंपन्या मोठ्या प्रमाणात फूड ऑर्डरची सर्वात जास्त डिलेव्हरी करतात. या कंपन्यांनी आता वर्षअखेरीस काही आकडे प्रसिध्द केले आहेत. संपूर्ण वर्षभरात भारतीयांनी कोणते पदार्थ ऑनलाइन मागवून् खाल्लेत हे सांगणारे आकडे वाचून भारतीयांना 2021 मधे कोणते ऑनलाइन मागवून खायला आवडलं  हे तर कळतंच, शिवाय वेळ, आवड, छोट छोट्या गोष्टींचं आपल्या आवडत्या पदार्थांसोबत सेलिब्रेशन करणं या लोकांच्या वर्तनात झालेला बदलही  या आकड्यांतून वाचता येतो.

Image: Google

आज घरी जरी प्रत्येक पदार्थ बनवला जात असला तरी विशिष्ट ठिकाणी जाऊन आपल्या आवडीचा पदार्थ खाण्यातली मजा काही औरच असते. पण आता खाद्य पदार्थ पुरवण्याची सोय ऑनलाइन डिलेव्हरीने केली असल्यानं बाहेर लांब  हाॅटेलमधे जाऊन नंबर लावून बसण्याचा कंटाळा येतोच. यावर मार्ग म्हणजे घरबसल्या आपल्या आवडीच्या हाॅटेलातून आवडीचा पदार्थ मागवणे. स्विगी आणि झोमॅटो यांनी प्रसिध्द केलेले 2021चे भारतातल्या ऑर्डरचे आकडे बघितल्यावर ऑनलाइन ऑर्डर करुन खाणाऱ्यांचं प्रमाण किती वाढलंय हे तर कळतंच शिवाय कोणते पदार्थ प्रामुख्याने ऑनलाइन ऑर्डर करुन मागवले गेले हे देखील लक्षात येतं. या दोन कंपन्यांनी याबाबतचीही आकडेवारी प्रसिध्द केली आहे.

Image: Google

झोमॅटोचे आकडे काय सांगतात?

गुरुग्राम येथे मुख्य ऑफिस असलेल्या झोमॅटोने आपली वार्षिक आकडेवारी प्रसिध्द केली त्यात भारतात बिर्याणी नंतर सर्वात जास्त ऑर्डर केलेला पदार्थ डोसा असल्याचं सांगितलं . झोमॅटोनं 2021 मधे दर दोन सेकंदाला दोन बिर्याणींची ऑर्डर पोहोचवली असं सांगितलं. पण् वर्षभरात एकूण् किती बिर्याणींची डिलेव्हरी केली हा आकडा मात्र सांगितला नाही. पण बिर्याणी सर्वात जास्त म्हणजे  88 लाख डोशांच्या ऑर्डर डिलिव्हर केल्या असं म्हटलं आहे.

Image: Google

24 ऑक्टोबरला भारत पाकिस्तानची  टी 20 वर्ल्ड कप मॅच होती. त्या दिवाशी भारतात कंपनीला 10 लाख फूड ऑर्डर आल्यात. झोमॅटो कंपनीचा अहवाल सांगतो , की अहमदाबाद येथील एका ग्राहकानं सर्वात मोठी म्हणजे 33,000 किंमतीच्या पदार्थांची ऑर्डर दिली.  श्वेता नामक एका ग्राहकानं एकाच दिवसात झोमॅटोवर 12 ऑर्डर देऊन पदार्थ मागवले. या सर्व ऑर्डर आइस्क्रिमसाठीच्या होत्या. दिल्ली येथील तुषार नामक ग्राहकानं 389 पिझ्झा एका दिवसात मागवले होते.  तर प्रिती नामक ग्राहकानं वर्षभरात सर्वात जास्त म्हणजे 1,907 वेळा झोमॅटोवरुन खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली असं हा अहवाल सांगतो. पनीर बटर मसाला, बटर नान यांची एकत्रित ऑर्डरची संख्या 11 लाख एवढी भरली.  तसेच  वर्षभरात वडापावची ऑर्डर 31 लाख , समोश्यांची ऑर्डर 72 लाख तर 1 कोटी ऑर्डर देऊन मोमोज मागवले गेले. 200,000 ग्राहकांनी चीझ सारखे डिप्स मागवले. 

Image: Google

स्विगी म्हणते स्नॅक्समधे समोसा नंबर वन

बंगळूरु येथे मुख्य ऑफिस असलेली झोमॅटोची स्पर्धक कंपनी स्विगीचा अहवाल  सांगतो की त्यांच्याकडे 2021 मधे  दर मिनिटाला 115 बिर्याणीच्या ऑर्डर नोंदवल्या गेल्या. आज न्यूझिलंड या देशाची जेवढी लोकसंख्या आहे , तेवढे समोसे स्विगीला ऑर्डर देऊन मागवले गेले.  स्विगीचा अहवाल सांगतो , की वर्षभरात त्यांच्या भारतभरातल्या सेंटर्सवरचा एकूण ऑर्डरचा आकडा बघता बिर्याणी टाॅप डिश ठरली. बिर्याणीसाठी 2020 च्या तुलनेत ऑर्डर जास्त आल्या.

Image: Google

यंदाच्या वर्षी स्विगीवरुन 5 कोटी, 55 लाख बिर्याणी ऑर्डर केल्या गेल्या. मागच्या वर्षी हाच आकडा  3  कोटी  55 लाख होता.  संध्याकाळचा नाश्ता म्हणून  50 लाख समोसे वर्षभरात स्विगीवरुन ऑर्डर केले गेलेत. 21 लाख ऑर्डर पावभाजीसाठी होत्या. रात्री 10 नंतर रात्रीच्या जेवणानंतर लागणारी भूक भागवण्यासाठी चीझ गार्लिक ब्रेड, पाॅपकाॅर्न आणि फ्रेंच फ्राइज हे पदार्थ मागवलेत. स्वीट डिश म्हणून सर्वात जास्त म्हणजे 21 लाख गुलाबजामच्या ऑर्डर तर 1 लाख 27 हजार ऑर्डर रसमलाईसाठी होत्या. 

Web Title: 88 lakh Dosas, 50 lakh Samosas, 21 lakh Gulabjamun .. What did the Indians order food by online in 2021?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.