Join us

चहा बनवताना नेमकी कधी घालायची साखर आणि दूध?; ९०% लोकांना माहितीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:54 IST

चहा चांगला बनवला गेला नसेल तर तो प्यायची मजाच निघून जाते. 

वाफाळलेल्या चहाने अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते. ऋतू कोणताही असो चहाची एक वेगळ्याच प्रकारची क्रेझ दिसून येते. काही लोक इतक्या वेळा चहा पितात की दिवसातून ६ ते ८ कप देखील त्यांच्यासाठी पुरेसे नसतात. तर काहींना दिवसातून दोन वेळा तरी चहा लागतोच. पण जर चहा चांगला बनवला गेला नसेल तर तो प्यायची मजाच निघून जाते. 

चहाची चव जर आपल्याला आवडली नाही तर पूर्ण मूड खराब होतो. चहा बनवताना, बरेच लोक साखर, चहापावडर, आलं आणि दूध एकत्र उकळतात, जी खरंतर योग्य पद्धत नाही. जर तुम्हाला चहा बनवण्याची योग्य पद्धत माहित असेल तर चहाची चव आणखी जास्त चांगली होते आणि तुमच्या घरी आलेले पाहुणेही हमखास तुमची प्रशंसा करतात. चहा बनवण्याची योग्य पद्धत आणि त्यात साखर आणि आलं नेमकं कधी घालायचं हे जाणून घेऊया...

चहामध्ये साखर कधी घालावी?

सर्वप्रथम, एका भांड्यामध्ये एक कप पाणी घाला आणि ते उकळू द्या. पाणी उकळू लागताच, तुमच्या आवडीनुसार, एक किंवा दोन चमचे चहापावडर घाला. चहापावडरचा स्वाद पाण्यात चांगला मिसळण्यासाठी ते काही मिनिटं उकळू द्या. आता त्यात एक कप गरम दूध घाला आणि ते हळूहळू उकळवा. यानंतर त्यात साखर घाला. साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार असावं. साखर चांगली मिसळली आणि चहाला उकळी आली की, तो गाळून कपमध्ये ओता. 

चहा बनवताना आलं कधी घालावं?

चहा बनवताना, चहापावडर, दूध आणि साखर टाकल्यानंतर आलं घालावं. म्हणजे ते अगदी शेवटी घाला. लक्षात ठेवा की, चहाला एक उकळी आल्यानंतरच आलं घाला.

करू नका 'ही' चूक 

सहसा चहा बनवताना लोक सर्वप्रथम पाण्यात चहापावडर घालतात. नंतर साखर आणि दूध घालून चहा उकळतात. प्रत्येकाची चहा करण्याची स्वतःची वेगळी पद्धत असते. पण योग्य पद्धत म्हणजे हे सर्व घातल्यानंतर त्याला चांगली उकळी येण्याची वाट पाहणे आणि त्यानंतरच आलं टाकणे. आल्याचे छोटे तुकडे करून किंवा किसून घातल्यास त्याचा रस चहामध्ये चांगला मिसळतो आणि चहा चांगला होतो. 

टॅग्स :अन्न