खजूर हे एक सुपरफूड मानलं जातं. कारण यात भरपूर फायबर, आयर्न आणि अनेक आवश्यक पोषक तत्व असतात. पण अनेकांना खजूर खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ माहीत नसते. अशात चुकीच्या पद्धतीनं खजूर खाल्ल्यास आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. अनेक लोक उपाशीपोटी खजूर खातात आणि त्यामुळे शरीराला फायदा मिळण्याऐवजी नुकसान होतं.
लॉन्जेव्हिटी एक्सपर्ट प्रशांत देसाई यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, खजूरासोबतच चार अशाही गोष्टी आहेत ज्या सकाळी उपाशीपोटी खाऊ नये. या गोष्टी चुकीच्या वेळी खाल्ल्यानं आरोग्याचं नुकसान होऊन आजारांचं कारण ठरतं.
उपाशीपोठी खजूर खाणं नुकसानकारक?
खजुरामध्ये जवळपास ९० टक्के शुगर असते. उपाशीपोटी खजूर खाल्ल्यानं शरीरात ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढू शकते. जे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. त्याशिवाय उपाशीपोटी खजूर खाल्ल्यानं पोटात गॅस आणि अॅसिडिटीची समस्याही होऊ शकते.
जर तुम्हाला खजूर खायचं असेल, तर उपाशीपोटी खाऊ नका. एक्सपर्टनुसार, खजूर देशी तुपासोबत खाल्ल्यास शरीराला अधिक फायदे मिळतात. त्याशिवाय बदाम, काजूसारखे नट्स खाणंही फायदेशीर ठरतं.
सकाळी उपाशीपोटी काय खाऊ-पिऊ नये?
1) साखरेचा चहा-कॉफी
सकाळी सगळ्यात आधी साखरेचा चहा किंवा कॉफी पिणं आरोग्यासाठी नुकसानकारक अससतं. साखर अधिक खाल्ल्यानं शरीरात इन्सुलिनचं प्रमाण प्रभावित होतं आणि वजन वाढण्याचं कारण ठरू शकतं.
२) चहासोबत बिस्कीट
चहासोबत बिस्कीट खाणं अनेक लोकांना आवडतं. पण उपाशीपोटी असं केल्यानं पचन तंत्रावर वाईट प्रभाव पडतो. बिस्कीटांमधील रिफाइंड शुगर आणि फॅट शरीरासाठी नुकसानकारक असते.
३) माल्ट बेस्ड ड्रिंक
बाजारात मिळणारे माल्ट बेस्ड ड्रिंक्स जे शक्ती आणि मसल्स वाढवण्याचा दावा करतात, हे शरीरासाठी फायदेशीर नसतात. यात शुगर आणि आर्टिफिशियल फ्लेवर्सचं प्रमाण अधिक असतं. लहान मुलांना कोमट दूध द्या. त्यात हळद किंवा मध टाकू शकता.
सकाळच्या हेल्दी सवयी
- सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिणं एक चांगली सवय आहे. याने पचन तंत्र चांगलं राहतं आणि पोटही साफ होतं.
- जर नाश्त्यात तुम्हाला काही गोड खाण्याची सवय असेल तर, मध आणि बदाम खाऊ शकता.
- ताजी फळं आणि नट्स खाऊन दिवसाची सुरूवात करणं चांगलं मानलं जातं. फक्त सकाळी उपाशीपोटी आंबट फळं खाऊ नये.