कुरकुरीत भेंडी खायला अप्रतिम लागते. कोणाला भेंडी आवडते तर, कोणाला नाही. भेंडीचे अनेक पदार्थ करण्यात येतात. जसे की भेंडीची भाजी, कुरकुरीत भेंडी, भेंडी मसाला, भेंडी मलाई, भेंडी फ्राय, हे पदार्थ चवीने खाल्ले जातात. पण काही वेळेला भेंडी चिकट असल्यामुळे भाजीची चव बदलते.
भेंडी चिरताना देखील हात चिपचिपित होतात. भेंडी चिरताना अनकेदा चिडचिड होते. भेंडी भाजल्यानंतर त्यामधील चिकटपणा कमी होतो. पण ती आकाराने लहान होते. भेंडीमधील चिकटपणा कमी करण्यासाठी काही टिप्स फॉलो करा. यामुळे भेंडीची भाजी चिकट होणार नाही. व चवीलाही उत्कृष्ट लागेल(A Brilliant Trick for Avoiding Slimy Okra).
भेंडीमधील चिकटपणा कमी करण्यासाठी काही टिप्स
- बाजारातून जेव्हा भेंडी निवडता तेव्हा कच्ची भेंडी खरेदी करा. भेंडी मऊ आहे की कडक हे तपासून पाहा. भेंडीचे देठ तोडून पाहा, यातून भेंडी कच्ची आहे की कोवळी हे कळेल.
- मॉइश्चर किंवा पाण्यामुळे भेंडीमधील चिकटपणा वाढतो. त्यामुळे कच्ची भेंडी धुतल्यानंतर लगेच एका कापडाने पुसून घ्या.
आंबट - गोड चवीचं करा थंडगार कोकम सरबत, कमी वेळात - झटपट सरबत रेडी..
- भेंडी भाजताना त्यात एक चमचा दही घालून भाजून घ्या. याने भेंडी चिकट होणार नाही. व भेंडीची आंबट - गोड चव तुम्हाला नक्की आवडेल. जर तुम्हला दही आवडत नसेल तर, त्याजागी लिंबाच्या रसाचा देखील वापर करू शकता.
- भेंडी भाजताना आपण त्यात बेसन पीठ देखील मिक्स करू शकता, असे केल्याने भेंडी चिकट होणार नाही.
- आपण व्हिनेगरचा वापर देखील करू शकता. भेंडी चिरण्यापूर्वी व्हिनेगर आणि पाण्याच्या मिश्रणात भिजत ठेवा. चिरण्यापूर्वी भेंडी स्वच्छ कापडाने पुसून चिरा. यामुळे भेंडीमधील चिकटपणा कमी होईल.
- भेंडी पॅनमध्ये भाजताना त्यावर झाकण ठेऊ नका. यामुळे भेंडीला मॉइश्चर पकडेल, व ती आणखी चिकट होईल.
२ कांदे - मुठभर शेंगदाण्याची करा चवदार चटणी, चव अशी की भाजी खायला विसराल
- भेंडी करताना शेवटी मीठ घाला, कारण मीठ भाजीमध्ये ओलावा तयार करते, ज्यामुळे भेंडीमध्ये पाणी सुटू शकते. त्यामुळे शेवटी मीठ घालावे.
- भेंडी चिरताना ती मोठ्या तुकड्यांमध्ये चिरा. यामुळे भाजी चिकट होण्याची शक्यता कमी होते, व क्रिस्पी बनते.