Join us  

वांग्याचे काप करण्याची पारंपरिक खमंग रेसिपी! तोंडाला चव येईल असा मस्त झटपट पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2023 12:54 PM

Roasted Eggplant Recipe (The Easiest!) - Wholesome Yum वांग्याचे काप करायला अगदी सोपे आणि साध्या वरणभातासहही जेवण एकदम मस्त होते.

वांग्याची भाजी काहींना प्रचंड आवडते तर काहींना नाही. वांग्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. वांग्याची भाजी, वांग्याची आमटी, वांग्याचे भरीत, वांग्याचे काप. वांग्यामध्ये  भरपूर प्रमाणत फायबर्स आढळतात. वांगी लो कॅलरीज, लो फॅटयुक्त असल्यामुळे शरीरासाठी उत्तम आहेत, वांग्याचे काप हा पदार्थ महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय पारंपरिक पदार्थ आहे. हा पदार्थ कमी साहित्यात - झटपट बनतो. वरण भात, वांग्याचे काप असे झटपट जेवण सहज चविष्ट बनू शकते.

वांग्याचे पारंपारिक काप या रेसिपीसाठी लागणारं साहित्य

वांगी

रवा

गरम मसाला

धणे पूड

लाल तिखट

चवीनुसार मीठ

पाणी

तेल

कृती

एका बाऊलमध्ये गरम मसाला, धणे पूड, लाल तिखट, चवीनुसार मीठ, घालून मसाले मिक्स करा. मसाले मिक्स केल्यानंतर पाणी घाला.  मिश्रण जास्त घट्ट अथवा पातळ बनवायचे नाही. पेस्ट प्रमाणे मिश्रण बनवा. आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.दुसरीकडे एका बाऊलमध्ये बारीक रवा घ्या. रव्यामध्ये लाल तिखट घालून मिश्रण मिक्स करा.

आता एक मोठं वांग घ्या. चांगले धुवून घ्या. सुरीच्या मदतीने वांग्याचे मध्यम आकाराचे गोलाकार काप करून घ्या. वांग्याचे काप करून झाल्यानंतर, त्यावर मसाल्यांची पेस्ट दोन्ही बाजूने लावा. पेस्ट लावल्यानंतर वांग्याच्या कापांना रव्याच्या मिश्रणात मिक्स करा. रवा दोन्ही बाजूने चांगले लावा. रवा लावून झाल्यानंतर काप प्लेटमध्ये ठेवा.

साबुदाणा बटाटा चकलीची झटपट रेसिपी, चकल्या होणार नाहीत अजिबात कडक - फुलतील मस्त

गॅसवर नॉन - स्टिक पॅन गरम करत ठेवा. त्यावर तेल पसरवा. आता वांग्याचे काप तव्यावर ठेवा. वांग्याच्या कापाच्या वरून आणि बाजूने तेल लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. शिजले की नाही हे ओळखण्यासाठी टूथपिकने तपासून पाहा. शिजल्यानंतर काप प्लेटमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे वांग्याचे खमंग क्रिस्पी काप खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.