Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात रात्री वन डिश मिलचा मस्त पर्याय मसूरभात! प्रचंड उकाड्यात स्वयंपाकाचा चविष्ट शॉर्टकट

उन्हाळ्यात रात्री वन डिश मिलचा मस्त पर्याय मसूरभात! प्रचंड उकाड्यात स्वयंपाकाचा चविष्ट शॉर्टकट

सारखा वरण भात नाहीतर आमटी भात खाण्यापेक्षा मूगाच्या डाळीच्या खिचडीला उत्तम पर्याय मसूर भात, घ्या सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2022 12:08 PM2022-04-17T12:08:03+5:302022-04-17T12:18:34+5:30

सारखा वरण भात नाहीतर आमटी भात खाण्यापेक्षा मूगाच्या डाळीच्या खिचडीला उत्तम पर्याय मसूर भात, घ्या सोपी रेसिपी...

A great alternative to One Dish Mill on a summer night in Masurbhat! A delicious shortcut to cooking in a huge Ukada | उन्हाळ्यात रात्री वन डिश मिलचा मस्त पर्याय मसूरभात! प्रचंड उकाड्यात स्वयंपाकाचा चविष्ट शॉर्टकट

उन्हाळ्यात रात्री वन डिश मिलचा मस्त पर्याय मसूरभात! प्रचंड उकाड्यात स्वयंपाकाचा चविष्ट शॉर्टकट

Highlightsभातावर तूप घालून दही घातलेल्या एखाद्या सॅलेडसोबत भात खायचा. नेहमीपेक्षा वेगळा आणि पौष्टीक पर्याय एकदा नक्की ट्राय करा

दुपारी आपल्यातील अनेक जण ऑफीसला जातात. त्यामुळे आपण फक्त पोळी भाजी आणि फारतर कोशिंबीर, चटणी असं काहीतरी करतो. पण रात्रीच्या जेवणासाठी मात्र आपण आवर्जून भाताचा कुकर लावतो. रात्रीच्या जेवणात गरम भात खाल्ल्यावर आपल्याला मस्त वाटते. आता नेहमी भआत आमटी किंवा भात वरण खाऊन आपल्याला कंटाळा आला की आपण कधीतरी मूगाच्या डाळीची खिचडी नाहीतर पुलाव असे प्रकार करतो. पण असाच एक आणखी हेल्दी आणि टेस्टी पर्याय तुम्ही रात्रीच्या जेवणाला किंवा अगदी दुपारीही आवर्जून करु शकता. हा प्रकार म्हणजे मसूर भात. मसूर हे आपल्याकडे आवर्जून खाल्ले जाणारे कडधान्य. आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असणारे मसूर आहारात असायलाच हवेत. पण सतत त्याची भाजी नाहीतर आमटी खाऊन आणि करुन आपल्याला कंटाळा येऊ शकतो. अशावेळी मसूराचा भात हा अतिशय उत्तम पर्याय ठरु शकतो. एखादी कोशिंबीर किंवा सॅलेड केले की त्यासोबत हा भात अतिशय उत्तम लागतो. पाहूया झटपट होणारा हा भात कसा करायचा....

(Image : Google)
(Image : Google)

साहित्य - 

१. अख्खा मसूर - १ वाटी
२. तांदूळ - १ ते १.५ वाटी
३. कांदा - १ 
४. टोमॅठो - १ 
५. आलं मिरची लसूण पेस्ट - अर्धा चमचा 
६. गरम मसाला - पाव चमचा
७. तिखट - आवडीनुसार 
८. मीठ -  आवडीनुसार 
९. फोडणीचे साहित्य 
१०. कोथिंबीर - अर्धी वाटी

(Image : Google)
(Image : Google)

कृती - 

१. रात्री मसूर भात करायचा असेल तर सकाळी मसूर पाण्यात भिजवायला टाकायचे. मसूर लवकर भिजत असल्याने आदल्या दिवशी नाही टाकले तरी चालते. 

२. कांदा, टोमॅटो उभा चिरुन घ्यायचा, आलं मिरची लसूण पोस्ट करुन घ्यायची.

४. कढईमध्ये फोड़णी घालून त्यामध्ये आलं मिरची लसूण पेस्ट घालायची.

५. त्यामध्ये कांदा आणि मग टोमॅटो घालून चांगले परतून घ्यायचे. 

६. त्य़ानंतर यामध्ये तांदूळ घालून पुन्हा परतून घ्यायचे.

७. पाणी घालून त्यामध्ये गोडा मसाला, तिखट, मीठ आणि आवडत असेल तर चवीपुरती साखर घालायची. 

८. भात शिजला की गॅस बंद करुन त्या वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. 

९. भातावर तूप घालून दही घातलेल्या एखाद्या सॅलेडसोबत भात खायचा. 
 

Web Title: A great alternative to One Dish Mill on a summer night in Masurbhat! A delicious shortcut to cooking in a huge Ukada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.