आपण बऱ्याचदा कोणत्याही रोड साईड ढाब्यावर गेलो की छोले - भटुरे हमखास ऑर्डर करतो. छोले - भटुरे ही उत्तर भारतातील एक प्रसिद्ध डिश आहे. आजकाल प्रत्येक हॉटेल, रेस्टोरंट आणि ढाब्यावर छोले - भटुरे सहज मिळतात. छोले म्हणजे काबुली चणे एका विशिष्ट पद्धतीने बनवले जातात आणि त्याबरोबर खाण्यासाठी मैदा – बटाटा एकत्र करून बनवलेल्या पुऱ्या म्हणजेच भटुरे दिले जातात. छोले - भटुरे हे कांदा, टोमॅटो किंवा काकडी कापून या सलाडसोबत मस्त सर्व्ह केले जातात. हे ढाबा स्टाईल छोले - भटुरे आपण घरी सुद्धा बनविण्याचा प्रयत्न करतो. छोले तर बनतात परंतु कितीही प्रयत्न करूनही ढाबा स्टाईल भटुरे बनवू शकत नाही. घरी मात्र भटुरे बनवताना ते ढाब्यांवर मिळतात तशा चवीचे बनत नाहीत, तेलात नीट फुगत नाहीत, अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. तेव्हा घरच्या घरी भटुरे बनविण्यासाठी काही खास टीप्स(Bhatura Recipe : How to Make Best Bhatura Dhaba Style at Home).
भटुरे बनविण्याचे साहित्य -
१. मैदा – १ वाटी
२. बटाटे – ३ उकडलेले
३. तेल - तळण्यासाठी
४. मीठ - चवीनुसार
कृती -
१. मैदा आणि उकडलेले बटाटे एकत्र कुस्करून त्याचे मिश्रण बनवा. त्यात एक चमचा तेल घाला. चांगली घट्ट कणीक मळून घ्या.
२. छोटे गोळे बनवून भटुरे लाटून घ्या. कढईत तेल गरम करून सर्व भटुरे तळून घ्या.
ढाबा स्टाईल परफेक्ट भटुरे बनवण्यासाठी लक्षात ठेवा -
१. भटुरे बनवताना तुम्ही त्यात ७ ते ८ ब्रेडचे स्लाइस कुस्करून घालू शकता. असे केल्याने तुम्हाला भटूऱ्याचे पीठ रात्रभर फरमेंटेड करून ठेवण्याची गरज नाही भासणार.
२. भटूऱ्याचे कणीक मळताना त्यात दही घातल्याने भटुरे मऊसूत बनतात.
३. भटुरे ढाबास्टाईल मऊ आणि कुरकुरीत करण्यासाठी पीठ मळताना त्यात उकडलेला बटाटा किंवा पनीर कुस्करून घालावे.
४. भटुरे तळताना तेल व्यवस्थित गरम झाले आहे की नाही हे आधी तपासून पाहा आणि मगच भटुरे तळा. भटुरे तळताना ते दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या.
५. भटुरे कुरकुरीत व क्रिस्पी बनविण्यासाठी कणीक मळताना त्यात थोडा रवा घाला.